युहन्ना 5

5
अडोव्तीस वर्षाच्या रोग्याला बरं करणे
1या गोष्टीच्या बाद येशू यहुदी लोकायचा एका सणाच्या वाक्ती यरुशलेम शहरात गेला. 2यरुशलेम शहरात मेंढरे-फाटकापासी एक कुंड होता ज्याले इब्रानी भाषेत बैतहसदा म्हणतात, अन् तो पाच छपराच्या दरवाज्यान घेरलेला होता. 3त्याच्यात लय बिमार, फुटके, लंगळे, अन् लकवा झालेले पाण्याले हालवल्या जायचा आशेने पडून रायत होते. 4कावून कि नेमलेल्या वेळेवर देवदूत कुंडात उतरून पाणी हालवत होता पाणी हालताच जो कोणी पयले त्या मध्ये उतरत होता, तो चांगला होऊन जात होता, मंग त्याले कोणतीही बिमारी असो. 5तती एक माणूस होता, जो अडोतीस वर्षापासून बिमारीनं पडलेला होता. 6येशूनं आराधनालयात त्याले पडलेला पाऊन अन् हे समजून कि तो लय दिवसापासून याचं दशेत पडलेला हाय, त्याले विचारलं, “तुले चांगलं व्हायची इच्छा हाय काय?” 7त्या बिमारान त्याले उत्तर देलं, “हे स्वामी, माह्यापासी कोणताच माणूस नाई, कि जवा पाणी हालीन तवा मले त्या कुंडात उतरवाले मदत कऱ्याले कोणीचं नाई; पण माह्या कुंडात उतराच्या पयलेच कोणी दुसरा माह्या पयले त्या कुंडात उतरून जाते.” 8येशूनं त्याले म्हतलं, “उठ, अन् आपली चटई उचलून चाल फिर.” 9ज्या दिवशी हे झालं तो आरामाचा दिवस होता, तो माणूस लवकरच चांगला झाला, अन् आपली चटई उचलून चालाले फिराले लागला. 10म्हणून यहुदी पुढारी त्याले जो चांगला झाला होता, म्हणाले लागले “मोशेच्या नियमाप्रमाणे आज तर आरामाचा दिवस हाय, म्हणून तुले आपली चटई उचलनं ठिक नाई.” 11त्यानं त्याले उत्तर देलं कि “ज्यानं मले चांगलं केलं, त्यानचं मले म्हतलं कि आपली चटई उचलून चाल फिर.” 12त्यायनं त्याले विचारलं, “तो कोणता माणूस हाय, ज्यानं तुले म्हतलं, चटई उचलून चाल फिर?” 13पण जो चांगला झाला होता, त्याले मालूम नाई होतं कि तो कोण हाय; कावून कि त्या जागी लोकायची गर्दी असल्याने येशू ततून बाजुले होऊन गेलता. 14ह्या गोष्टी झाल्यावर तो येशूले देवळाच्या आंगणात भेटला, तवा त्यानं त्याले म्हतलं, “पाय तू तर चांगला झाला हाय; परत पाप करू नोको, असं नाई झालं पायजे कि कोणते भारी संकट तुह्यावर येऊन पडो.” 15त्या माणसानं जाऊन यहुदी पुढाऱ्यायले सांगतल, कि ज्यानं मले चांगलं केलं, तो येशू हाय. 16म्हणून यहुदी पुढारी येशूले तरास द्याले पायत होते, कावून कि तो असे-असे काम आरामाच्या दिवशी करत होता. 17याच्यावर येशूनं त्याले उत्तर देलं, “माह्या देवबाप आतापरेंत काम करून रायला हाय, अन् मले पण काम करायले पायजे.” 18कावून कि येशूनं हे शब्द म्हतलं होते म्हणून यहुदी पुढारी अजून त्याले मारून टाक्याचा प्रयत्न कराले लागले, कि तो फक्त आरामाच्या दिवसाच्या नियमालेच तोडत नाई, पण देवाले आपला बाप म्हणून, स्वताले देवासारखा ठरवते.
पोराचा अधिकार
19याच्यावर येशूनं त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो कि मी, पोरगा स्वता काईच नाई करू शकत, फक्त तेच जे देवबापाले करतांना पायते, कावून कि ज्या-ज्या कामाले तो करते, त्याले मी, पोरगा पण तसाचं करतो. 20कावून कि देवबाप पोरावर प्रेम करते, अन् जे-जे काम तो स्वता करते, ते सगळं त्याले दाखवते; अन् तो त्याले याच्याऊन पण मोठे काम दाखविन, कि तुमी हापचप झाले पायजे. 21कावून कि जसा देवबाप मेलेल्या लोकायले परत जिवंत करते, तसचं मी, पोरगा पण ज्याले पायजे त्यायले जिवंत करते. 22अन् देवबाप कोणाचा न्याय पण करत नाई, पण न्याय कऱ्याच सगळं काम मले, पोराले सोपून देलं हाय. 23यासाठी कि सगळे लोकं देवबापाचा आदर करतात, तसाचं माह्या, म्हणजे पोराचा पण आदर करावं; जो पोराचा आदर नाई करत, तो देवबापाचा ज्यानं त्याले पाठवलं, त्याच्या आदर करत नाई. 24मी तुमाले खरं-खरं सांगतो, जो माह्य वचन आयकून माह्या पाठवण्याऱ्यावर विश्वास करतो, अनंत जीवन त्याचचं हाय, अन् त्याला दंड देल्या जाणार नाई, कावून कि त्यायनं नरकाच्या मरणापासून वाचून कधीही न सरणाऱ्या जीवनात प्रवेश करून घेतला. 25मी तुमाले खरं-खरं सांगतो कि, ते वेळ येते अन् आता पण हाय, ज्याच्यात मेलेले माह्या, देवाच्या पोराचा आवाज आयकतीन अन् जे आयकतीन ते नेहमी साठी जिवंत रायतीन. 26कावून कि ज्याप्रकारे देवबाप आपल्या स्वताचं जीवन ठेवते, त्याचं प्रकारे त्यानं मले, पोराले पण हा अधिकार देला हाय कि आपल्या स्वतामध्ये जीवन ठेवावं; 27कावून कि मी, माणसाचा पोरगा हावो देवबापान मले सगळ्या लोकायच्या न्याय करायचा अधिकार देला हाय.” 28याच्यासाठी आश्चर्य करू नका; कावून कि तो वेळ येत हाय, कि त्याच्यात ते सगळे लोकं जे मेले हाय, त्याची आवाज आयकतीन अन् जिवंत होतीन. 29ज्यायच्या जवळ चांगलं जीवन होतं, ते कधी न संपणार जीवन भेटायसाठी जिवंत होतीन अन् ज्या लोकायन बेकार जीवन जगले हाय ते दोषी ठरवल्या जाण्यासाठी परत जिवंत होतीन.
येशूच्या बाऱ्यात साक्ष
30“मी स्वताऊन काई नाई करू शकत; जे देवबाप म्हणते त्याच्याच आधारावर मी न्याय करतो, अन् माह्या न्याय खरा हाय; कावून कि मी आपल्या इच्छेन नाई, पण आपल्या पाठवनाऱ्याची इच्छा पूर्ण करतो. 31जर मी स्वताच आपली साक्षी देईन; तर माह्यी साक्ष स्वीकार योग्य नाई. 32एक अजून हाय जो माह्या देवबाप हाय, तो पण माह्याली साक्षी देते, कि ते खरी हाय. 33तुमी योहान बाप्तिस्मा देणाऱ्या कडे संदेश वाहकाले पाठऊन विचारलं, अन् त्यानं खऱ्याची साक्षी देली हाय. 34पण मले आपल्या विषयात माणसाची साक्ष नाई पायजे, तरी पण मी तुमाले त्या साक्षीच्या बाऱ्यात सांगते जे योहान बाप्तिस्मा देणाऱ्यान देली होती, कि तुमाले तारण भेटलं पायजे. 35योहान बाप्तिस्मा देणारा एका जळत्या व चमकत्या दिव्या सारखा होता, अन् तुमाले काई वेळा परेंत त्याच्या ऊजीळात मग्न होणं चांगलं वाटलं. 36पण माह्यापासी योहान बाप्तिस्मा देणाऱ्या पेक्षाही मोठी साक्ष हाय, कावून कि जे काम देवबापान मले पूर कऱ्याले देलं हाय, म्हणजेच हेच काम जे मी करतो, तेच माह्यी साक्ष हाय कि देवबापान मले पाठवलं हाय. 37अन् देवबाप ज्यानं मले पाठवलं हाय, त्यानचं माही साक्ष देली हाय: तुमी नाई तर कधी त्याचा आवाज आयकला हाय अन् नाई कधी त्याले अमोरा-समोर पायलं हाय; 38अन् त्याच्या शिकवणीले आपल्या मनात स्थिर नाई ठेवत, कावून कि तुमी माह्यावर विश्वास नाई ठेवत, ज्याले पाठवलं हाय. 39तुमी पवित्रशास्त्रात पायता, अन् समजता कि अनंत जीवन तुमाले भेटन, अन् हा तोच हाय, जो माह्यी साक्षी देते; 40तरी पण तुमी अनंत जीवन भेट्यासाठी माह्यापासी येत नाई. 41मी माणसापासून आदराची आशा नाई करत. 42पण मी तुमाले ओयखतो, कि तुमच्या मनात देवासाठी प्रेम नाई. 43मी आपल्या देवबापाच्या अधिकारानं आलो हाव, अन् तुमी मले स्वीकार नाई करत; अन् जर कोण आपल्याचं अधिकारानं आला तर तुमी त्याले स्वीकार करता. 44तुमी माह्यावर विश्वास नाई करू शकत, कावून कि तुमाले एक-दुसऱ्या कडून आदर पायजे, अन् तुमी एकमात्र देवा कडून आदर घेण्याचा प्रयत्न नाई करत. 45हे नका समजू, कि मी देवबापाच्या समोर तुमच्यावर दोष लावीन, पण मोशे ज्याच्यावर तुमी आपली आशा ठेवली हाय तोच तुमच्यावर आरोप लावीन. 46जर तुमी मोशेवर विश्वास केला असता तर माह्यावर पण विश्वास केला असता, कावून कि त्यानं माह्या विषयात लिवलेल हाय. 47पण तुमी त्याच्या लिवलेल्या नियमशास्त्रावर विश्वास नाई करत, तर पक्कं हाय कि तुमी ह्याच्यावर पण विश्वास नाई करसान कि मी काय म्हणतो.”

ప్రస్తుతం ఎంపిక చేయబడింది:

युहन्ना 5: VAHNT

హైలైట్

షేర్ చేయి

కాపీ

None

మీ పరికరాలన్నింటి వ్యాప్తంగా మీ హైలైట్స్ సేవ్ చేయబడాలనుకుంటున్నారా? సైన్ అప్ చేయండి లేదా సైన్ ఇన్ చేయండి