1
योहान 3:16
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला शाश्वत जीवन प्राप्त व्हावे.
موازنہ
تلاش योहान 3:16
2
योहान 3:17
देवाने त्याच्या पुत्राला जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
تلاش योहान 3:17
3
योहान 3:3
येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही.”
تلاش योहान 3:3
4
योहान 3:18
जो पुत्रावर श्रद्धा ठेवतो, त्याचा न्याय होत नाही, परंतु जो श्रद्धा ठेवत नाही, त्याचा न्याय होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर श्रद्धा ठेवली नाही.
تلاش योहान 3:18
5
योहान 3:19
न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे, परंतु माणसांना प्रकाशापेक्षा अंधार आवडला, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.
تلاش योहान 3:19
6
योहान 3:30
त्याची वृद्धी व्हावी व माझी घट व्हावी, हे आवश्यक आहे.
تلاش योहान 3:30
7
योहान 3:20
जो कोणी वाईट कृत्ये करतो, तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.
تلاش योहान 3:20
8
योहान 3:36
जो पुत्रावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे; जो पुत्रावर श्रद्धा ठेवत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहील.”
تلاش योहान 3:36
9
योहान 3:14
जसा मोशेने अरण्यात सर्प वर उचलला होता, तसा मनुष्याचा पुत्रही वर उचलला गेला पाहिजे.
تلاش योहान 3:14
10
योहान 3:35
पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे.
تلاش योहान 3:35
صفحہ اول
بائبل
مطالعاتی منصوبہ
Videos