होशे. 11

11
आपल्या स्वच्छंदी लोकांबद्दल देवाचा कळवळा
1जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले,
आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले.
2त्यांना जेवढे बोलविले तेवढे
ते माझ्यापासून दूर जात
ते बआलास बली
आणि मुर्तीस धूप जाळत.
3तरी तो मीच ज्याने एफ्राईमास चालणे शिकविले
तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले
पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो.
4मी त्यांना मानवता
आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो
मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतो
आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले.
5ते मिसरात परत येणार काय?
अश्शूर त्यावर राज्य करणार काय?
कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात?
6त्यांच्या नगरावर तलवार चालेल
आणि ती त्याच्या दाराचे अडसर नष्ट करील,
त्यांचा नाश त्यांच्या स्वत:च्या योजनांमुळे होईल.
7माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे
तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे
त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही.
8हे एफ्राईमे,
मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला,
मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ?
मी तुला अदमासारखे कसे करु?
मी तुला सबोयिमासारखे कसे करु?
माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.
9मी माझा भयानक राग अमलात
आणणार नाही मी एफ्राईमाचा पुन्हा नाश करणार
नाही कारण मी देव आहे
आणि मनुष्य नाही
तुमच्यामध्ये असणारा
मी पवित्र आहे मी क्रोधाने येणार नाही.
10ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वर
सिंहासारखी गर्जना करेन
मी खरोखर गर्जेन
आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील.
11ते मिसरातून पक्षासारखे
आणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतील
मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो.
12एफ्राईम मला लबाडीने
आणि इस्राएलचे घराणे कपटाने वेढले,
पण यहूदा आतापर्यंत देवाबरोबर,
जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे.

موجودہ انتخاب:

होशे. 11: IRVMar

سرخی

کاپی

موازنہ

شئیر

None

کیا آپ جاہتے ہیں کہ آپ کی سرکیاں آپ کی devices پر محفوظ ہوں؟ Sign up or sign in