1
योहान 4:24
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व सत्याने केली पाहिजे.”
Ṣe Àfiwé
Ṣàwárí योहान 4:24
2
योहान 4:23
मात्र खरे उपासक आत्म्याने व सत्याने पित्याची उपासना करतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण अशा उपासकांनी त्याची उपासना करावी, हे त्याला अभिप्रेत आहे.
Ṣàwárí योहान 4:23
3
योहान 4:14
परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल, त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्या ठायी शाश्वत जीवन देणाऱ्या पाण्याचा उसळता झरा होईल.”
Ṣàwárí योहान 4:14
4
योहान 4:10
येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे वरदान म्हणजे काय, आणि ‘मला प्यायला दे’, असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते, तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जीवनदायक पाणी दिले असते.”
Ṣàwárí योहान 4:10
5
योहान 4:34
येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने दिलेले कार्य पूर्ण करावे, हेच माझे अन्न आहे.
Ṣàwárí योहान 4:34
6
योहान 4:11
ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जीवनदायक पाणी आपल्याजवळ कुठून येणार?
Ṣàwárí योहान 4:11
7
योहान 4:25-26
ती स्त्री त्याला म्हणाली, “ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो मसिहा येणार आहे आणि तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल, हे मला ठाऊक आहे.” येशू तिला म्हणाला, “तुझ्याबरोबर बोलणारा मी, तो आहे.”
Ṣàwárí योहान 4:25-26
8
योहान 4:29
“चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पाहा, तोच ख्रिस्त असेल काय?”
Ṣàwárí योहान 4:29
Ilé
Bíbélì
Àwon ètò
Àwon Fídíò