1
उत्पत्ती 17:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.
Ṣe Àfiwé
Ṣàwárí उत्पत्ती 17:1
2
उत्पत्ती 17:5
आता येथून पुढे तुझे नाव अब्राम असे राहणार नाही, तर ते अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.
Ṣàwárí उत्पत्ती 17:5
3
उत्पत्ती 17:7
तुझ्या व तुझ्या येणार्या पिढीबरोबर मी असा शाश्वत करार स्थापित करेन की, तुझा व तुझ्यानंतर तुझ्या संतानांचा मी परमेश्वर होईन.
Ṣàwárí उत्पत्ती 17:7
4
उत्पत्ती 17:4
“मी तुझ्याशी हा करार करतो: तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील.
Ṣàwárí उत्पत्ती 17:4
5
उत्पत्ती 17:19
परमेश्वराने उत्तर दिले, “होय, परंतु तुझी पत्नी साराह हिच्यापासून तुला एक पुत्र होईल आणि तू त्याचे नाव इसहाक असे ठेवावेस. मी त्याच्याबरोबर आणि त्याच्यानंतर त्याच्या वंशजांबरोबरही अनंतकाळचा करार स्थापित करेन.
Ṣàwárí उत्पत्ती 17:19
6
उत्पत्ती 17:8
ज्या देशात आज तू परका आहेस, तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन; आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.”
Ṣàwárí उत्पत्ती 17:8
7
उत्पत्ती 17:17
अब्राहामाने लवून नमस्कार केला; आणि तो हसला व स्वतःशी म्हणाला, “शंभर वर्षांच्या माणसालाही मुले होतील का? नव्वद वर्षांच्या साराहच्या पोटी बाळ जन्माला येऊ शकेल काय?”
Ṣàwárí उत्पत्ती 17:17
8
उत्पत्ती 17:15
मग परमेश्वराने अब्राहामालाही म्हटले, “तुझी पत्नी साराय हिचे नाव आता साराय राहणार नाही, तर तिचे नाव साराह असे होईल.
Ṣàwárí उत्पत्ती 17:15
9
उत्पत्ती 17:11
ही सुंता, तुझ्या आणि माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह होईल.
Ṣàwárí उत्पत्ती 17:11
10
उत्पत्ती 17:21
पण माझा करार मी इसहाकाबरोबर स्थापित करेन. ज्याला पुढील वर्षी याच सुमारास साराह तुझ्यासाठी प्रसवेल.”
Ṣàwárí उत्पत्ती 17:21
11
उत्पत्ती 17:12-13
पुत्र जन्मल्यानंतर आठव्या दिवशी त्याची सुंता केली पाहिजे. सुंतेची ही अट तू पैसे देऊन विकत घेतलेल्या परदेशीय गुलामांना आणि तुझ्या घराण्यात जन्मलेल्या प्रत्येकाला, जी तुझी संतती नाही त्यांनाही लागू आहे. तुझ्या घराण्यात जन्मलेल्या किंवा तू पैसे देऊन विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाची सुंता केली जावो. तुझ्या शरीराशी केलेला हा करार सदासर्वकाळचा आहे.
Ṣàwárí उत्पत्ती 17:12-13
Ilé
Bíbélì
Àwon ètò
Àwon Fídíò