मत्तय प्रस्तावना

प्रस्तावना
जुन्या करारात देवाने त्याच्या प्रजेला वचन दिले होते की, तो त्यांच्याकरता तारणारा पाठवील. हे वचन येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण करण्यात आले, हे शुभवृत्त मत्तयरचित शुभवर्तमानात शद्बबद्ध केले आहे. येशू यहुदी लोकांमध्ये जन्मला व लहानाचा मोठा झाला. मात्र हे शुभवर्तमान केवळ यहुदी लोकांसाठी नसून ते अखिल विश्वासाठी आहे.
प्रस्तुत शुभवर्तमान व्यवस्थितपणे रचलेले आहे. येशूच्या जन्मापासून सुरुवात करून त्याचा बाप्तिस्मा, मोहावर विजय, सार्वजनिक कार्य, शिकवण, गालीलमधील आरोग्यदान व अद्भुत कृत्ये ह्यांचे वर्णन केले आहे. पुढे येशूने गालीलमधून निघून यरुशलेमपर्यंत केलेला प्रवास व यरुशलेममधील त्याच्या आयुष्यातील शेवटच्या आठवड्यातील नाट्यमय घटना ह्यांच्याविषयी लिहिताना येशूचे क्रुसावरील आत्मबलिदान व पुनरुत्थान या घटनांमध्ये ह्या शुभवर्तमानाचा कळस साधलेला आहे.
येशू महान गुरू आहे. तो दिव्य अधिकाराने नियमशास्त्राचा उलगडा करतो व स्वर्गाच्या राज्याविषयी शिक्षण देतो, हे या शुभवर्तमानात शद्बांकित करण्यात आले आहे. त्याच्या प्रबोधनात पुढील पाच प्रमुख विषय हाताळण्यात आले आहेत:
1) स्वर्गाच्या राज्याचे स्वरूप अभिव्यक्त करणारे डोंगरावरील प्रवचन (अध्याय 5-7)
2) बारा शिष्यांना त्यांच्या सेवाकार्याविषयी प्रशिक्षण (अध्याय 10)
3) स्वर्गाच्या राज्याविषयीचे दाखले (अध्याय 13)
4) शिष्यत्वाविषयी प्रशिक्षण (अध्याय 18)
5) सध्याच्या युगाच्या अंताविषयी व स्वर्गाच्या राज्याच्या आगमनाविषयी भाकीत (अध्याय 24-25)
रूपरेषा
येशूची वंशावळी 1:1—2:23
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे कार्य 3:1-12
येशूचा बाप्तिस्मा 3:13-17
मोहावर विजय 4:1-11
गालीलमधील येशूचे सार्वजनिक कार्य 4:12—18:35
गालीलमधून यरुशलेममध्ये 19:1—20:34
यरुशलेम परिसरातील शेवटचा आठवडा 21:1—27:66
पुनरुत्थान व दर्शने 28:1-20

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录