लुका 4:5-8

लुका 4:5-8 VAHNT

मंग सैतान त्याले एका मोठ्या उंच पहाडावर घेऊन गेला, अन् एका क्षणात सर्व्या जगाचे राज्य दाखवलं तवा सैतानान येशूले म्हतलं, “मी हे सगळा अधिकार अन् त्याचं वैभव तुले देईन, कावून की हे माह्याल्या हाती देलं हाय, अन् माह्या मनात येईन त्याले मी देऊ शकतो. म्हणून, जर तू वाकून माह्याली आराधना करशीन, तर मी हे सगळे तुले देऊन देईन.” तवा येशूनं त्याले उत्तर देलं, हे सैतान माह्यापासून निघून जा, “पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, कि तू फक्त प्रभू आपल्या देवाचीच आराधना कर, अन् फक्त त्याचीचं सेवा कर.”