लुका 4

4
येशूची परीक्षा
(मत्तय 4:1-11; मार्क 1:12-13)
1मंग येशू पवित्र आत्मानं भरून, यरदन नदी पासून वापस आला; अन् देवाच्या आत्म्याच्या अगुवाईत सुनसान जागी फिरत रायला; 2-3अन् चाळीस दिवस अन् चाळीस रात्र परेंत सैतान त्याची परीक्षा घेत रायला. त्या दिवसात येशूने काई हि खायाले नाई, अन् जवा दिवस पुरे झाले, तवा त्याले भूक लागली. तवा सैतानान येशूले म्हतलं, “जर तू देवाचा पोरगा असशीन, तर ह्या गोट्याले मन, कि भाकर बनून जाय.” 4येशूनं त्याले उत्तर देलं, “पवित्रशास्त्रात असं लिवलेल हाय, कि माणूस फक्त भाकरीन जिवंत रायणार नाई.” 5मंग सैतान त्याले एका मोठ्या उंच पहाडावर घेऊन गेला, अन् एका क्षणात सर्व्या जगाचे राज्य दाखवलं 6तवा सैतानान येशूले म्हतलं, “मी हे सगळा अधिकार अन् त्याचं वैभव तुले देईन, कावून की हे माह्याल्या हाती देलं हाय, अन् माह्या मनात येईन त्याले मी देऊ शकतो. 7म्हणून, जर तू वाकून माह्याली आराधना करशीन, तर मी हे सगळे तुले देऊन देईन.” 8तवा येशूनं त्याले उत्तर देलं, हे सैतान माह्यापासून निघून जा, “पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, कि तू फक्त प्रभू आपल्या देवाचीच आराधना कर, अन् फक्त त्याचीचं सेवा कर.” 9-11मंग सैतानाने येशूले पवित्र शहर यरुशलेम शहरात नेऊन देवळाच्या काटावर उभं केलं; अन् त्याले म्हतलं, “जर तू देवाचा पोरगा असशीन, तर आपल्या स्वताले खाली पाडून सिद्ध कर, तुले मार नाई लागीन कावून कि पवित्रशास्त्रात असं लिवलेले हाय, कि तो आपल्या देवदूतायले आज्ञा करीन, कि तुह्यावाली रक्षा करावी, अन् ते तुह्याले पाय गोट्यावर आपटू नये म्हणून आपल्या हातावर झेलून घेतीन.” 12तवा येशूनं त्याले उत्तर देलं, “हे पण पवित्रशास्त्रात सांगतलेले हाय, कि तू प्रभू आपल्या देवाची परीक्षा पाऊ नको.” 13जवा सैतानान येशूची सगळी परीक्षा केली तवा तो त्याच्यापासून काई वेळासाठी चालला गेला.
गालील प्रांतात सेवाकार्य
(मत्तय 4:12-17; मार्क 1:14-15)
14नंतर येशू देवाच्या आत्म्याच्या सामर्थात भरून गालील प्रांतात वापस आला, अन् त्याची चर्चा आजूबाजूच्या लय देशात पसरली. 15अन् येशू धार्मिक सभास्थानात जाऊन प्रचार करत जाय, अन् सरे जन त्याची प्रशंसा करत होते.
नासरत गावात येशूचा नकार
(मत्तय 13:53-58; मार्क 6:1-6)
16मंग येशू नासरत नगरात वापस आला; जती तो लायण्याचा मोठा झाला होता; अन् आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे आरामाच्या दिवशी धार्मिक सभास्थानात जाऊन पवित्रशास्त्रातून वाचाले उभा रायला. 17तवा यशया भविष्यवक्ताची पुस्तक त्याले देल्या गेली, अन् त्यानं पुस्तक खोलून त्या भागातून वाचलं जती लिवलं होतं: 18“देवाचा आत्मा माह्यावर आला हाय, म्हणून त्यानं गरीब लोकायले सुवार्था सांग्याले माह्याला अभिषेक केला हाय, अन् मले यासाठी पाठवलं हाय, कि सैतानाच्या बंधनातल्या लोकायले मोकळे करायचा अन् फुटक्यायले परत दिसासाठी सुवार्था प्रचार करू अन् ठेचले जात हायत त्यायले मोकळे करू अन् हे सांग्याले कि प्रभूची कृपा दाखवण्याचा वेळ आला हाय. 19अन् प्रभूच्या प्रसन्न रायाच्या वर्षाचा प्रचार करू.” 20तवा त्यानं पुस्तक बंद करून सेवादाराचा हातात देली, अन् खाली बसून गेला: तवा धार्मिक सभास्थानात सरे लोकं हापचक होऊन त्याच्याकडे पायत रायले. 21तवा त्यानं त्यायले म्हतलं, “आजचं हा लेख पवित्रशास्त्रातून जवा तुमी माह्या गोष्टी आयकतं होते, पूर्ण झालं हाय.” 22अन् सगळ्यानं त्याची वाहवा केली, अन् ज्या कृपावचनाच्या गोष्टी त्याच्या मुखातून निघत होत्या त्याबद्दल ते लोकं आश्चर्य करू लागले; अन् म्हणू लागले, “हा तर योसेफाचा पोरगा हाय.” 23येशूनं त्यायले म्हतलं, “तुमी माह्यावर हे म्हण खरचं म्हणान, कि हे वैद्या, तू स्वताले चांगलं कर! जे काई आमी आयकलं हाय, कि तू कफरनहूम शहरात केलं हाय, त्या गोष्टी आपल्या गावात पण कर.” 24अन् मंग येशूनं त्यायले म्हतलं, मी तुमाले खरं सांगतो, “कोणत्याही भविष्यवक्त्याले आपल्या देशात मान-सन्मान भेटत नाई. 25माह्या गोष्टी आयका, हे खरं हाय कि एलिया भविष्यवक्त्याच्या काठी साडे तीन वर्ष अभायातून पाऊस पडला नाई, अन् सऱ्या इस्राएल देशात मोठा दुष्काळ पडला होता, त्यावाक्ती इस्राएल देशात लय विधवा बाया होत्या, 26तरी पण एलिया भविष्यवक्त्याले त्यातल्या एकीच्याही पासी पाठवलं नाई, फक्त सिदोन शहरातल्या सारफथ गावात एका अन्यजाती विधवा बाई पासी पाठवलं होतं. 27तसचं एलीशा भविष्यवक्ताच्या काठी इस्राएल देशात लय कुष्ठरोगी होते, तरी पण सिरीया देशातल्या अन्यजाती नामान ले सोडून कोणीचं कुष्ठरोगा पासून बरा नाई केला गेला.” 28ह्या गोष्टी आयकून, जेवढे लोकं धार्मिक सभास्थानात होते, सगळे रागानं भरले. 29तवा ते उठले अन् येशूले गावाबायर काढलं, अन् ज्या टेकडीवर त्यायच्या गावाची वस्ती होती, त्याचं टेकडीवरून त्याले खाली फेक्याले घेऊन गेले, कि त्याले ततून खाली फेकून द्यावं. 30पण येशू त्यायच्यातून निघून चालला गेला.
भुत आत्माले बायर काढण
(मार्क 1:21-28)
31मंग तो गालील प्रांतातल्या कफरनहूम शहरात गेला, अन् आरामाच्या दिवशी लोकायले शिकवण देऊ रायला होता. 32अन् ते त्याच्या उपदेशानं हापचक झाले, कावून की त्याचं बोलणं अधिकाऱ्या सारखं होतं. 33धार्मिक सभास्थानात एक माणूस होता, ज्याले भुत आत्मा लागलेला होता. 34त्यानं जोऱ्यानं आवाज देऊन म्हतलं, “हे येशू नासरतवासी, तू आमच्या मधात कायले पडत? काय तू आमाले नाश कराले आला हाय? मी तुले ओयखतो तू कोण हायस, तू देवाचा पवित्र पोरगा हायस.” 35येशूने त्या भुताले दटावून म्हतलं, “तू शांत राय अन् त्याच्यातून निघून जाय!” तवा त्याच्यातल्या भुतानं त्याले खाली आपटून, त्याचं काईच नुकसान न कर्ता त्याच्यातून निघून गेला. 36या गोष्टीवर सगळे लोकं जे सभास्थानात जमा होते, हापचक होऊन एकदुसऱ्या संग गोष्टी करू लागले, “हे कसं बोलणं हाय? कि तो अधिकारानं अन् सामर्थानं भुतायले आज्ञा देते, अन् ते निघून जातेत.” 37नंतर अवताल-भवताल सऱ्या ठिकाणी त्याची चर्चा होऊ लागली.
पतरसची सासू अन् दुसऱ्या लोकायले चांगलं करणे
(मत्तय 8:14-17; मार्क 1:29-34)
38मंग येशू धार्मिक सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला अन् तती सिमोनाच्या सासूले लय ताप आला होता, अन् त्यायनं येशूले तिच्यासाठी प्रार्थना कऱ्याले विनंती केली. 39तवा येशूनं तिच्या समोर उभं राहून, तापाले दटावलं अन् तवाच तिचा ताप उतरला, अन् तवा तिनं उठून त्यायले जेवण देऊन त्यायची सेवा केली. 40त्याचदिवशी संध्याकाळच्या वाक्ती म्हणजे सुर्य डूबल्यावर जवा आरामाचा दिवस झाला, बऱ्याचं बिमार लोकायले, अन् भुत लागलेल्या लोकायले, येशू पासी आणले, अन् त्यानं एका-एकावर हात ठेऊन त्यायले चांगलं केलं. 41तवा भुत आत्मा कल्ला करून अन् हे म्हणत, “तू देवाच्या पोरगा हाय,” लय झणायतून निगाले, तवा तो त्यायले दाटत होता अन् बोलू देत नव्हता, कावून कि त्या भुतायले मालूम होतं, कि तो देवाचा पोरगा ख्रिस्त हाय.
गालील प्रांतात उपदेश
(मार्क 1:35-39)
42मंग येशू दिवस निघाच्या पयले लवकर उठून बायर सुनसान जाग्यावर गेला, तवा लोकायची मोठी गर्दी त्याले पायतं-पायतं त्याच्यापासी आली, अन् त्याले अडवत म्हणू लागली आमच्या पासून दूर नको जाऊ. 43पण येशूनं त्यायले म्हतलं, “या आपण जवळपासच्या गावात जाऊ, की तती पण देवाच्या वचनाची सुवार्था सांगू, कावून की मी याचं कामासाठी जगात आलो हाय.” 44मंग येशू यहुदीया प्रांताच्या धार्मिक सभास्थानात जाऊन उपदेश देत रायला.

目前选定:

लुका 4: VAHNT

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录