लुका 3
3
योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचा संदेश
(मत्तय 3:1-12; मार्क 1:1-8; योहान 1:19-28)
1हा रोमी सम्राट तिबिर्यच्या राज्याच्या शासनाचा पंधरावा वर्ष होता; पुन्तियुस पिलातुस हा यहुदीया प्रांताचा राज्यपाल होता, अन् गालील प्रांतात हेरोद राजा शासक होता, अन् त्याचे भाऊ फिलिप्पुस, इतूरैया, अन् त्रखोनीतिस, प्रांताचे शासक होते, अन् लिसानियास, अबिलेने प्रांताचा शासक होता. 2जवा हन्ना अन् कैफा महायाजक होते, त्यावाक्ती देवाच वचन सुनसान जागी जखऱ्याचा पोरगा योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले प्राप्त झाले. 3अन् तो यरदन नदीच्या अवताल-भवंतालच्या सर्व्या भागात जाऊन, हा संदेश देत होता, कि आपआपल्या पापांपासून मन फिरवा अन् बाप्तिस्मा घ्या तवा देव तुमाले तुमच्या पापांपासून क्षमा देईन. 4जसं यशया भविष्यवक्ताच्या पुस्तकात लिवलेल हाय: ते असं कि सुनसान जागेत एका ओरडण्याऱ्याचा शब्द झाला, कि “देवाचा रस्ता तयार करा, त्याचे रस्ते सरके करा. 5सगळ्या खोऱ्या भरल्या जातीन, सगळे पहाड अन् टेकड्या खाली केल्या जातीन, अन् जे हेकोडं हाय ते सरख केलं जाईन, अन् जे खाल-उंच हाय ते सफाट होईन. 6अन् सगळे मनुष्य प्राणी देवाच तारण पायतीन.” 7ज्या लोकायची भीड़ ची भीड़ त्याच्यापासी बाप्तिस्मा घेयाले जात होती, त्यायले तो म्हणत होता, “अरे जहरील्या सर्पासारख्या दुष्ट लोकायनो, तुमचं असं विचार करनं चुकीचे हाय, कि फक्त बाप्तिस्मा घेतल्याने तुमी आपल्या पापासाठी देवाच्या व्दारे दंड भोगण्यापासून वाचू शकता. 8तर आपल्या कामाच्या व्दारे तुमी हे दाखवा कि तुमी खरोखर पश्चाताप केला हाय, अन् आपल्या-आपल्या मनात हे विचार करू नका, कि तुमचे पूर्वज अब्राहामाच्या खानदानीतले हायत, कावून कि मी तुमाले सांगतो, कि देव या गोट्यायपासुन अब्राहामासाठी लेकरं करायला समर्थ हाय. 9अन् देव हरएकाचा न्याय करण्यासाठी तयार हाय, जे पश्चाताप नाई करत, ठिक त्याचं प्रकारे जसे कुऱ्हाडीवाला एक माणूस त्या झाडाच्या मुया कापण्यासाठी तयार हाय, जे चांगले फळ देत नाईत; म्हणून हरएक माणूस जो त्या झाडासारखा हाय, जो चांगलं फळ देत नाई, त्याले देवापासून दोषी ठरवलं जाईन, अन् आगीत फेकल्या जाईन.” 10तवा लोकायन त्याले विचारलं “आमी देवाच्या दंडापासून वाचण्यासाठी काय करावं?” 11योहानान त्यायले उत्तर देलं, “ज्याच्यापासी दोन मनिले हायत, त्यानं ज्याच्या जवळ मनिले नाईत हायत त्याले वाटून द्या अन् ज्याच्यापासी जेवण हाय, त्यानं पण असचं करावं.” 12मंग जकातदार पण बाप्तिस्मा घीयाले आले, अन् त्याले विचारलं, “हे गुरुजी, आमी काय करावं?” 13योहानान त्यायले म्हतलं, “तुमाले जे अधिकाऱ्याय कडून ठरवलं हाय, त्याच्याहून जास्त जकात कर घेऊ नका.” 14तवा काई शिपायायनं पण त्याले विचारलं, “आमी काय करावं?” येशूनं त्यायले म्हतलं, “कोणावर उपद्रव करू नका, अन् कोणावर खोटा आरोप लाऊ नका तर आपल्या पगारावर तृप्त रहा.” 15जवा लोकं ख्रिस्ताची लवकर यायची वाट पायतं होते, अन् सगळे आपल्या-आपल्या मनात योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या बाऱ्यात विचार करून रायले होते, कि हाचं तर ख्रिस्त नाई? 16तवा योहानान सर्व्याले उत्तर देऊन म्हतलं, “मी तुमाले पाण्यानं बाप्तिस्मा देतो, पण जो येणारा हाय, तो माह्याहून पण शक्तिशाली हाय; मी तर ह्या योग्य पण नाई, कि त्याच्या जोड्यायचा लेसा खोलू शकू, तो तुमाले पवित्र आत्म्याच्या आगीने बाप्तिस्मा देईन.” 17त्याची सुफळी त्याच्यावाल्या हातात हाय; अन् तो आपले खडे चांगल्या प्रकारे सपा करीन; अन् आपल्या गव्हाले तर कोठारीत साठविण, पण भुसा कधी न ईजणाऱ्या इस्तवात जाळून टाकीन. 18शेवटी योहान बाप्तिस्मा देणारा बऱ्याचं गोष्टी शिकवून लोकायले सुवार्था सांगत रायला.
हेरोद कडून योहानाले जेलात टाकणं
(मत्तय 3:13-17; मार्क 1:9-11)
19पण त्या देशातल्या हेरोद राजानं आपला सक्का भाऊ फिलिप, याची बायको हेरोदियास इच्या संग लग्न केलं होतं, अन् ह्या बेकार कामाच्या बाऱ्यात योहानान त्याले चेतावणी देली होती, की त्यानं आपल्या भावाची बायको संग कायले लग्न केलं, व हे जे त्यानं केलं ते नियमाच्या विरुध्य हाय. 20म्हणून हेरोद राजानं त्याचावून पण बेकार काम केलं कि त्यानं योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले धरून जेलात टाकून देलं
योहान कडून येशूचा बाप्तिस्मा
21जवा सगळ्या लोकायन बाप्तिस्मा घेतला, अन् येशू पण योहान पासून बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करू रायला होता, तवा अभाय मोकळं झालं, 22अन् पवित्र आत्मा शरीरिक रुपान कबुतरा सारखं त्याच्यावर उतरला, अन् अभायातून असा शब्द झाला “तू माह्याला प्रिय पोरगा हाय, मी तुह्यावर प्रसन्न हाय.”
येशूची वंशावली
(मत्तय 1:1-17)
23जवा येशूनं लोकायले शिकवण देणे सुरु केले, तवा त्याचं वय जवळपास तीस वर्षाचं होतं अन् असं समजल्या जात होतं, कि तो योसेफाचा पोरगा होता, अन् योसेफ एलिचा पोरगा होता. 24अन् एलि मत्तययाचा पोरगा होता, मत्तय लैवीचा पोरगा होता, लैवी मलखीचा पोरगा होता, मलखी यन्नयाचा पोरगा होता, यन्नय योसेफाचा पोरगा होता, 25अन् योसेफ मत्तयाचा पोरगा होता, मत्तय आमोसाचा पोरगा होता, आमोस नहुमाचा पोरगा होता, नहुम हेस्लीचा पोरगा होता, हेस्ली नग्गयाचा पोरगा होता, 26अन् नग्गय महथाचा पोरगा होता, महथ मत्तययाचा पोरगा होता, मत्तय शिमयीचा पोरगा होता, शिमयी योसेफाचा पोरगा होता, योसेफ योदाचा पोरगा होता, 27अन् योदा योहानाचा पोरगा होता, योहान रेशाचा पोरगा होता, रेशा जरुबाबेलाचा पोरगा होता, जरूबाबेल शालतीराचा पोरगा होता, शालतीर नेरीचा पोरगा होता, 28अन् नेरी मलखीचा पोरगा होता, मलखी अद्दीचा पोरगा होता, अद्दी कोसोमाचा पोरगा होता, कोसोम एल्मदामाचा पोरगा होता, एल्मदाम एराचा पोरगा होता, 29अन् एरा येशूचा पोरगा होता, येशू अलीयेजराचा पोरगा होता, अलीयेजर योरीमाचा पोरगा होता, योरीम मत्ताथाचा पोरगा होता, मत्ताथ लैवीचा पोरगा होता, 30अन् लैवी शिमोनाचा पोरगा होता, शिमोन यहुदाचा पोरगा होता, यहुदा योसेफाचा पोरगा होता, योसेफ योनामाचा पोरगा होता, योनाम एल्याकीमाचा पोरगा होता, 31अन् एल्याकीम मल्याचा पोरगा होता, मल्या मिन्नाचा पोरगा होता, मिन्ना मत्तयाचा पोरगा होता, मत्तय नाथानाचा पोरगा होता, नाथान दाविद राजाच्या पोरगा होता, 32अन् दाविद इशायाचा पोरगा होता, इशाय ओबेदाचा पोरगा होता, ओबेद बवाजाचा पोरगा होता, बवाज सुलैमानाचा पोरगा होता, सुलैमान नहशोनाचा पोरगा होता, 33अन् नहशोन अम्मीनादाबाचा पोरगा होता, अम्मीन अर्णयाचा पोरगा होता, अर्णय हेस्रोनाचा पोरगा होता, हेस्रोन पेरेसाचा पोरगा होता, पेरेस यहुदाचा पोरगा होता, 34अन् यहुदा याकोबाचा पोरगा होता, याकोब इसहाकाचा पोरगा होता, इसहाक अब्राहामाचा पोरगा होता, अब्राहाम तेरहाचा पोरगा होता, तेरह नाहोराचा पोरगा होता, 35अन् नाहोर सरूगाचा पोरगा होता, सरूग रऊचा पोरगा होता, रऊ पेलेगाचा पोरगा होता, पेलेग एबरचा पोरगा होता, एबर शेलहाचा पोरगा होता, 36अन् शेलह केनानाचा पोरगा होता, केनान अर्पक्षदाचा पोरगा होता, अर्पक्ष शेमाचा पोरगा होता, शेम नोहोचा पोरगा होता, नुह लामेखाचा पोरगा होता, 37अन् लामेख मथुशलहाचा पोरगा होता, मथुशलह हनोकचा पोरगा होता, हनोक यारेदाचा पोरगा होता, यारेद महललेलाचा पोरगा होता, महललेल केनानाचा पोरगा होता, 38अन् केनान अनोशाचा पोरगा होता, अनोश शेथाचा पोरगा होता, शेथा आदमाचा पोरगा होता, अन् आदाम देवाचा पोरगा होता.
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.