लुका भूमिका

भूमिका
लूकाची सुवार्था येशूले इस्राएलच्या प्रतिज्ञात तारणकर्ता अन् सगळ्या मानव जातीचा तारणाहारा, दोन्ही रुपात प्रस्तुत करते. लूका लिवते कि येशूले कंगाल लोकायले सुवार्था सांगायले प्रभूच्या आत्म्येने बलावलं होतं. याचं कारण ही सुवार्था अलग प्रकारच्या समस्यामध्ये पडलेल्या लोकायच्या चिंतेन भरून पडलेला हाय. लूकाच्या सुवार्था मध्ये आनंदाच्या बाऱ्यात पण सांगतलेले हाय, विशेष करून सुरवातीच्या अध्याय मध्ये ज्याच्यात येशूच्या येण्याची घोषणा केली हाय, अन् आखरी मध्ये पण जती येशूच्या स्वर्गारोहणचं वर्णन हाय. येशूच्या स्वर्गारोहणाच्या नंतर ख्रिस्तावरचा विश्वासाचा विकासाचे विवरण याचं लेखकापासून प्रेषितायच्या पुस्तकात देल्या गेलं हाय.
दुसऱ्या अन् सहाव्या भागात, वर्णन केलेले बऱ्याचं गोष्टी फक्त याचं सुवार्था मध्ये दिसून येते, उदा, येशूच्या जन्मावर देवदूतायचे गाणे, मेंढपाळायचे येशूले पायाले जाणे, यरुशलेमच्या देवळात बाळ येशू, अन् दयाळू सामरी, अन् उडाऊ पोराची कथा, इत्यादी, सगळ्या सुवार्था मध्ये प्रार्थना, देवाचा आत्मा, येशूच्या जनसेवा मध्ये बायायची भूमिका, अन् देवापासून पापाची क्षमावर खूप जोर देला हाय.
रूप-रेखा :
भूमिका 1:1-4
योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचा अन् येशूचा जन्म अन् लहानपण 1:5-2:52
योहान बाप्तिस्मा देणाऱ्याची जनसेवा 3:1-20
येशूचा बाप्तिस्मा अन् परीक्षा 3:21-4:13
गालीलात येशूची जनसेवा 4:14-9:50
गालीलातून यरुशलेम परेंत यात्रा 9:51-19:27
यरुशलेम मध्ये आखरी हप्ता 19:28-23:56
प्रभूचे पुनरुत्थान, दिसणे, अन् स्वर्गारोहण 24:1-53

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录