मरकुस 16

16
येशूचे पुनरुत्थान
(मत्तय 28:1-8; लूका 24:1-12; योहान 20:1-10)
1मंग आरामाचा दिवस सरल्यावर त्या संध्याकाळी, मगदला गावची मरिया, अन् याकोबची माय मरिया अन् सलोमी ह्यायनं तिकडे जाऊन येशूच्या शरीराले लाव्यासाठी सुगंधित वस्तु#16:1 सुगंधित वस्तु यहुदी लोकं मेलेल्या माणसाच्या शरीराले हे सुगंध वस्तु लावायचे जेणे करून त्यायचं शरीर सडल्यावर वास येऊ नये.रोयासाठी विकत घेऊन आल्या. 2अन् रविवारच्या दिवशी हपत्याच्या पयला दिवस मोठ्या सकाळी, जवा सुर्य निगालाच होता, तवा त्या कबरे पासी आल्या. 3तवा त्या एकमेकीले म्हणत होत्या “आपल्यासाठी, कबरेच्या दरवाज्याचा गोटा कोण ढकलीन?” 4जवा त्यायनं डोये वरते केले, तर पायलं कि गोटा ढकलवला हाय कावून कि तो लय मोठा होता. 5मंग त्या कबरेच्या अंदर जाऊन, त्यायनं एका देवदूताले जवानाच्या रुपात पांढरे कपडे घालून उजव्या बाजूनं बसलेलं पाऊन त्या हापचक झाल्या.
6जवान माणसानं बायाईले म्हतलं, “भेऊ नका, तुमी नासरत नगरचा येशू जो वधस्तंभावर चढवल्या गेला होता, त्याले पाऊ रायल्या काय? तो जिवंत झाला हाय, तो अती नाई हाय, पाऊन घ्या, हेच ते जागा हाय, जती त्यायनं त्याले ठेवलं होतं. 7पण तुमी जा, अन् पतरसले अन् येशूच्या शिष्यायले हे सांगा, येशू तुमच्या पयले गालील प्रांतात जाईन, जसं त्यानं तुमाले सांगतल होतं, तुमी तती त्याले पायसान.” 8जवा त्यायनं हे आयकलं, त्या बायर निघून कबरे पासून पयाल्या कावून की त्या कापत-कापत भेऊन हापचक झाल्या होत्या, त्यायनं रस्त्यात कोणाले काईच सांगतल नाई, कावून कि त्या लय भेल्या होत्या.
मरिया मकदलीले येशू दिसला
(मत्तय 28:9-10; योहान 20:11-18)
9येशू मेलेल्यातून जिवंत झाल्यावर रविवारी सकाळी, पयले मगदला गावची मरिया जिचातून त्यानं सात भुत काढली होती, तिले दिसला 10मरियानं जाऊन येशूच्या शिष्यायले जे दुखी होऊन रडू रायले होते, त्यायले ही बातमी सांगतली. 11अन् त्यायनं हे आयकून कि येशू परत जिवंत झाला हाय, अन् तिनं त्याले पायलं, ह्या गोष्टीवर विश्वास केला नाई.
दोन शिष्यायले येशू दिसला
(लूका 24:13-35)
12ह्या नंतर तो दुसऱ्या रुपात त्यायच्यातून दोन शिष्यायले जवा ते यरुशलेमातून त्यायच्या गावाच्या इकडे जाऊ रायले होते, तवा दिसून आला. 13जवा त्यायनं ओयखलं तवा यरुशलेमात जाऊन दोन शिष्यायले सांगतल अन् त्यायनं दुसऱ्या शिष्यायले सांगतल तरी त्यायनं त्यायच्यावर पण विश्वास केला नाई.
अकरा जनायले येशू दिसला
(मत्तय 28:16-20; लूका 24:36-49; योहान 20:19-23; प्रेषित 1:6-8)
14मंग तो त्या अकरा शिष्यायले, जवा ते जेव्याले बसले होते, दिसून आला, पण त्यायच्या अविश्वास अन् मनाचा कठीनपणा ह्या बद्दल त्यायले दोष लावला, कावून कि ज्यायनं त्याले जिवंत झाल्यावर पायलं होतं त्यायनं त्यायच्यावर विश्वास केला नव्हता. 15मंग येशूनं शिष्यायले म्हतलं, “तुमी सऱ्या जगात जाऊन सगळ्या पृथ्वीच्या लोकाईत सुवार्था प्रचार करा.
16जो माह्यावर विश्वास करीन, अन् बाप्तिस्मा घेईन, त्याचचं अन् तारण होईन, पण जो विश्वास करीन नाई, तो शिक्षेस पात्र ठरीन. 17अन् जो माह्यावर विश्वास करीन, त्यायच्या व्दारे हे चमत्कार होतीन, ते माह्या नावानं भुत काढतीन, व अलग-अलग भाषेत बोलतीन. 18सर्पायले उचलतील, अन् जरी ते कोणताही जीवघेणा पदार्थ पेले तरी त्यायचं काईच नुकसान होणार नाई, ते बिमार लोकायवर हात ठेवतील अन् ते चांगले होऊन जातीन.”
येशूच स्वर्गात जाणं
(लूका 24:50-53; प्रेषित 1:9-11)
19या प्रमाणे आपल्या शिष्याबरोबर बोलल्या नंतर, प्रभू येशू स्वर्गात वापस वर उचल्या गेला, अन् देवाच्या उजव्या बाजूनं जाऊन बसला. 20तवा शिष्यायनं ततून निघून गेल्यावर त्यायनं सऱ्या इकडे सुवार्था प्रचार केला, अन् प्रभू त्यायच्या संग काम करत होता, अन् घडणाऱ्या चमत्कारानं वचनाले खरे ठरवत होते. आमेन.

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录