मंग येशूनं म्हतलं, “कि देवाच राज्य असं हाय, कि जसा कोणता शेतकरी एका वावरात बिया टाकतो. अन् शेतकऱ्याने त्या इकळे ध्यान देले नाई, अन् आपले रोजचे काम करत रायला, पण त्यानं टाकलेलं बियाले कोम आले व ते मोठे झाले पण त्याले मालूम नाई होतं, की ते कसे काय मोठं झालं.