YouVersion Logo
Search Icon

लूक 8

8
येशु नि शिक्षा
1एना नंतर तो नगर-नगर आणि गाव-गाव प्रवचन सांगत, आणि परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता आयकाळत फिराले लागणा. आणि त्या बारा शिष्य तेना संगे होतात. 2काही बाया बी ज्या दुष्ट आत्मास कण आणि आजारस कण सोळावा मा एयेल होत्या. तेस्ना मधून एक मरिया जी मग्दालीया गाव तून होती, जेना मधून सात दुष्ट आत्मा निघेल होत्या. 3राजा हेरोद ना भंडारी खोजा नि बायको योहान्ना आणि सूसान्ना आणि गैऱ्या आखो बाया, आपली संपत्ती कण येशु आणि तेना शिष्यस्नी सेवा करत होती.
बी पेरणारा ना दाखला
(मत्तय 13:1-9; मार्क 4:1-9)
4जव मोठ्ठी गर्दी एकत्र हुईनी, आणि नगर-नगर ना लोक तेना कळे येत होतात, त तेनी दाखला मा सांग. 5“देखा एक माणुस आपला वावर मा काही बीज पेरासाठे निघना. पेरतांना काही बीज रस्ता ना किनारा वर पळणा, आणि चेनदाई ग्या, आणि आकाश ना पक्षी तेले खाई ग्यात. 6आणि काही दगडसवाली जमीन वर पळणा, आणि उगणा, पण माती नई भेटा मुळे सुखी ग्यात. 7काही काटावाला झाळीस्मा पळणा, आणि झाळ वाळीसन तेले दाबी लीनात.” 8“आणि काही बीज सुपीक जमीन वर पळणा, आणि उगीसन शंभर पट पिक लयना,” हय सांगीसन तेनी जोरमा सांग, “ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या येले समजाना प्रयत्न करा.”
दाखलास्ना उद्देश्य
(मत्तय 13:10-17; मार्क 4:10-12)
9तेना शिष्यस्नी तेले विचार कि “ह्या दाखला ना अर्थ काय शे?” 10तेनी सांग, “तुमले परमेश्वर ना राज्यांनी समज दियेल शे, पण दुसरास्ले दाखलास्मा आयकाळा मा येस, एनासाठे कि त्या देखीसन बी नई देखोत, आणि आयकतांना आयकोत बी आणि नई समजोत.”
बी पेरणारा दाखला ना अर्थ
(मत्तय 13:18-23; मार्क 4:13-20)
11दाखला ना अर्थ हई शे, बी त परमेश्वर ना वचन शे. 12रस्ता ना किनारा वरला त्या शेतस, जेस्नी आयक, त सैतान लगेच ईसन, वचन ले जो तेस्ना मा पेरायेल होत, काळी लीजास, कि कदी असा नई हुई जावो कि त्या विश्वास करीसन तारण ली लेवोत. 13दघळस वाली जमीन वरला त्या शेतस, कि जव आयकतस, त खुशी मा वचन ले मानी लेतस, पण मुया नई धरा मुळे त्या थोळा टाईम लगून विश्वास ठेवतस, आणि परीक्षा ना टाईम वर, विश्वास कराले बंद करी देतस. 14ज्या काटेरी झाळीस्मा पळणा, त्या ह्या शेतस, ज्या आयकतस पण पुळे चालीसन चिंता, आणि धन, आणि जीवन ना सुख विलास मा फशी जातस, आणि तेस्ना फय नई पिकत. 15पण चांगली जमीन वरला त्या ह्या शेतस, ज्या परमेश्वर ना वचन ले आयकीसन चांगल्या आणि उत्तम मन मा समाईसन ठेवतस, आणि धीर धरीसन फय लयतस.
दिवा ना दाखला
(मार्क 4:21-25)
16कोणी बी एक दिवाले पेटाळीसन तेले एक कटोरा व खाट ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवामा एस कि मधमा येनारस्ले उजाया भेटो. 17जे काही दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्त्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन. 18एनासाठे सावधान राहा, कि तुमी कोणत्या प्रकारे आयकतस? कारण कि जेना कळे शे, तेले देवामा ईन, आणि जेना कळे नई शे, तेना पासून ते बी लेवाय जाईन जेले तो आपला समजस.
येशु नि माय आणि भाऊ
(मत्तय 12:46-50; मार्क 3:31-35)
19येशु नि माय आणि तेना लहान भाऊ तेना जोळे उनात, पण गर्दी मुळे तेले भेटू नई सकनात. 20आणि तेले सांगामा उन, कि “तुनी माय आणि तुना भाऊ बाहेर उभा ऱ्हायसन तुले भेटाना देखी ऱ्हायनात.” 21तेनी तेना उत्तर मा तेस्ले सांग, कि “मना माय आणि मना भाऊ ह्याच शेतस, ज्या परमेश्वर ना वचन आयकतस आणि मानतस.”
वारा वांधी ले शांत करन
(मत्तय 8:23-27; मार्क 4:35-41)
22नंतर तो आणि तेना शिष्य नाव वर चळनात, आणि तेनी तेस्ले सांग, कि “या समुद्र ना त्या पार जावूत,” त तेस्नी नाव सोळी टाकी. 23पण जव नाव चालीऱ्हायंती, त तो जपी ग्या, आणि समुद्र वर वारा वांधी उणी, आणि नाव पाणी कण भराले लागणी आणि त्या धोका मा होतात. 24तव तेस्नी तेले जागाळीसन सांग, “गुरुजी! गुरुजी! आमी नाश हुई चालनुत,” तव तेनी उठीसन वारा वांधी ले आणि पाणी ना लाठास्ले धमकाव, आणि त्या थांबी ग्यात, आणि शांती हुईगी. 25आणि तेनी तेस्ले सांग, “तुमना विश्वास कोठे होता?” पण त्या भ्याय ग्यात, आणि चकित हुईसन आपस मा सांगाले लागनात, “हवू कोण शे? जो वारा वांधी आणि पाणी ले बी आदन्या देस, आणि त्या तेनी आयकतस.”
दुष्ट आत्मा लागेल माणुस ले बर करन
(मत्तय 8:28-34; मार्क 5:1-20)
26येशु आणि तेना शिष्य समुद्र ना पार गरसेकर प्रांत मा पोचनात, जो त्या पार गालील जिल्हा ना सोमोर शे. 27जव तो तठ वर उतरणा, त त्या नगर ना एक माणुस तेले भेटणा, जो दुष्ट आत्मा कण ग्रसित होता, आणि गैरा दिनस पासून कापळा नई घालेल होता, आणि नईत घर मा राहत होता, पण मसानखाई मा राहात होता. 28तो येशु ले देखीसन वोरळना, आणि तेना समोर पळीसन जोरमा सांग, “ओ सर्वशक्तिमान परमेश्वर ना पोऱ्या येशु! तुना मना शी काय काम शे. मी तुले विनंती करस, कि मले दुख नको देवू.” 29कारण कि तो त्या दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून निघानी आज्ञा दि ऱ्हायंता, एनासाठे कि ती तेनावर घळी-घळी हाबी होत होती, कदी लोक तेले साकयस आणि बेळीस कण जरी बांधत होतात, तरी बी तो त्या बंधनस्ले तोळी टाकत होता, आणि दुष्ट आत्मा तेले उजाळ जागास्मा पयाळत फिरत होती. 30येशु नि तेले विचार, “तुना नाव काय शे?” तेनी सांग, “सैन्य,” कारण कि गैरा दुष्ट आत्मा तेनामा घुसेल होत्यात. 31आणि तेस्नी तेले विनंती करी, कि “आमले अग्नीकुंड मा जावानी आज्ञा नको देवू.” 32तेस्ना तून काही दूर गैराच डुक्करस्ना गवारा चरत होता, त दुष्ट आत्मास्नी येशु ले विनंती करीसन सांग, कि आमले तेस्ना मा घुसू दे, त तेनी तेस्ले जावू दिधा. 33तव दुष्ट आत्मा तेना मधून निघीसन डुक्करस्मा ग्यात, आणि तो गवारा किनारा ना उतार नि जगावरुन पयत तलाव मा पळी गया, आणि डुबी मरणात. 34चारणारास्नि हय जे हुयेल होत देखीसन पयनात, आणि नगर मा, आणि गावस्मा जाईसन तेस्नी हई बातमी आयकाळी. 35आणि लोक हय जे हुयेल होत, तेले देखाले निघनात, आणि येशु जोळे ईसन ज्या माणुस मधून गैरा सावटा दुष्ट आत्मा निघेल होतात, तेले येशु ना समोर जमीन वर कपळा घालेल, आणि शुद्धी मा देखीसन भ्याय ग्यात. 36आणि देखणारस्नि तेस्ले सांग, कि तो दुष्ट आत्मा कण त्रासेल माणुस कसा बरा हुईना. 37तव गरसेकर प्रांत ना आंगे-पांगे ना सर्वा लोकस्नी येशु ले विनंती करी कि आमना आठून चालना जा, कारण कि तेस्ना मा बी ती घुशी जायेल होती, त तो नाव वर चळीसन परती ग्या. 38ज्या माणुस मधून दुष्ट आत्मा निघेल होती, तो तेले विनंती कराले लागणा, कि मले आपला संगे राहू दे, पण येशु नि तेले सांगीसन धाळ. 39कि “आपला घर जायीसन आपला लोकस्ले ह्या गोष्टी सांग, कि परमेश्वर नि तुना साठे कसा मोठा काम करेल शे.” तो जाईसन पुरा नगर मा सुवार्ता सांगाले लागणा, कि येशु नि मनासाठे कसा मोठा-मोठा काम करात.
याईर नि मरेल पोर आणि एक आजारी बाई
(मत्तय 9:18-26; मार्क 5:21-43)
40एक सावा परत येशु परती ऱ्हायंता, त लोक तेले खुशी मा भेटनात, कारण कि त्या सर्वा येशु नि वाट देखी ऱ्हायंतात. 41आणि देखा, याईर नाव ना एक माणुस जो प्रार्थना घर ना अधिकारी होता, उना, आणि येशु ना पायस्वर पळीसन तेले विनंती कराले लागणा, कि “मना घर चाल.” 42कारण कि तेनी बारा साल नि एकच पोर होती, आणि ती मरा वर होती. जव तो जाई ऱ्हायंता, तव आठ लगून कि लोक तेना आजू-बाजू गैरा ढकलत होतात. 43आणि एक बाई होती, जिले बारा वरीस पासून रक्तस्राव ना आजार होता, आणि तिनी गैरा डाक्टर ना हातून गैरा दुख सोसिसन तीनापा जे काही होत ते सगळ खर्ची टाकेल होती, आणि तरी बी कोणा हात कण बरी नई हुई सकेल होती. 44एनासाठे ती गर्दी मधून तेना मांगे उणी, आणि तेना कपळा ना कोणाले स्पर्श करनी. आणि लगेच तीना रक्तस्राव बंद हुईग्या. 45येशु गर्दी मा मांगे फिरणा, आणि विचारना, “मना झगा ले कोण हात लावना?” जव सर्वा नकाराले लागनात त पेत्र आणि ज्या लोक तेना संगे होतात तेस्नी तेले सांग, “गुरुजी तू देखी ऱ्हायना कि गर्दी तुले गैरी ढकली ऱ्हायनी शे, आणि तू सांगस कि कोण मले हात लायेल शे.” 46पण येशु नि सांग, “कोणी तरी मले हात लायेल शे, कारण कि मनी वयखी लीयेल शे, कि मना मधून बरा करानी सामर्थ्य निघेल शे.” 47जव बाई नि देख, कि मी लपू नई सकत, तव थरथर करत उणी, आणि पायस्मा प्रणाम करनी, आणि सर्वा लोकस समोर सांग, कि मनी कसा मुळे तुले स्पर्श कर, आणि कशी लगेच बरी हुईनी. 48तेनी तिले सांग, “पोरी हिंमत धर तुना विश्वास नि तुले बर करेल शे, शांती कण जा.” 49तो हय सांगीच ऱ्हायंता, कि कोणी प्रार्थना घर ना अधिकारी कळून ईसन सांग, “तुनी पोर त मरी गई, गुरुजी ले दुख नको देवू.” 50येशु नि आयकीसन उत्तर दिधा, “भ्यावू नको, फक्त विश्वास ठेव, त ती वाची जाईन.” 51घर मा ईसन तेनी पेत्र, आणि योहान, आणि याकोब, आणि धाकली पोर ना माय-बाप ले सोळीसन आखो कोले बी आपला संगे मधमा येवू नई दिना. 52आणि सर्वा तीना साठे रळी ऱ्हायंतात पण तेनी सांग, “रळा नका, पोर मरणी नई पण जपी ऱ्हायनी.” 53त्या हय समजीसन कि मरी जायेल शे, तेनी मजाक कराले लागनात. 54पण तेनी तीना हात धरा आणि सांग, “ओ पोर उठ.” 55तव तीना जीव परत उना आणि ती लगेच उठनी. 56नंतर येशु नि माय-बाप ले जताळीसन सांग, कि त्या, “हय गोष्ट नका पसारज्यात कि तेनी पोर ले मरेल मधून जीत्ती करेल होता, तव तेनी तीना माय-बाप ले सांग, कि तिले काही तरी खावाले द्या.”

Currently Selected:

लूक 8: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in