1
उपदेशक 2:26
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला तो बुद्धी, ज्ञान व सुख देतो; धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लादतो, अशासाठी की, देवाच्या दृष्टीने जो चांगला त्याला ते द्यावे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 2:26
2
उपदेशक 2:24-25
मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे ह्यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही; हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले. कारण त्याच्या प्रसादाशिवाय खाणेपिणे व सुख भोगणे कोणास प्राप्त होणार?
एक्सप्लोर करा उपदेशक 2:24-25
3
उपदेशक 2:11
मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले; तर पाहा, सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग होता; भूतलावर हित असे कशातच नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 2:11
4
उपदेशक 2:10
माझे नेत्र ज्याची म्हणून वांच्छा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही; मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही; कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास हर्ष होत असे; ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले.
एक्सप्लोर करा उपदेशक 2:10
5
उपदेशक 2:13
मग माझ्या नजरेस आले की अंधकारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ.
एक्सप्लोर करा उपदेशक 2:13
6
उपदेशक 2:14
ज्ञान्याचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात; आणि मूर्ख अंधकारात चालतो; असे असून सर्वांची गती एकच आहे असे माझ्या लक्षात आले.
एक्सप्लोर करा उपदेशक 2:14
7
उपदेशक 2:21
कोणी सुज्ञता, ज्ञान व चतुराई ह्यांनी परिश्रम करून काही संपादावे, आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे; हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय.
एक्सप्लोर करा उपदेशक 2:21
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ