1
उपदेशक 2:26
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जो व्यक्ती परमेश्वराला संतुष्ट करतो, त्याला परमेश्वर ज्ञान, बुद्धी आणि आनंद देतात, परंतु पाप्यांना संपत्ती गोळा करून ती जो व्यक्ती परमेश्वराला प्रसन्न करतो त्याच्या हाती सोपविण्याचे कार्य दिले आहे. हे सुद्धा वार्याचा पाठलाग करण्यासारखे व्यर्थ आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 2:26
2
उपदेशक 2:24-25
खाणे आणि पिणे करून स्वतःच्या कष्टामधून समाधान मिळविणे यापेक्षा मानव अधिक चांगले काय करू शकतो आणि मी पाहतो की, हे सुद्धा परमेश्वराच्याच हातात आहे, कारण परमेश्वराशिवाय कोण उत्तम भोजन करेल व कोणाला आनंदाचा उपभोग घेता येईल?
एक्सप्लोर करा उपदेशक 2:24-25
3
उपदेशक 2:11
तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, तर सर्वकाही व्यर्थ, वार्याचा पाठलाग करण्यासारखे होते; सूर्याखाली काहीच लाभले नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 2:11
4
उपदेशक 2:10
माझ्या नेत्रांनी जे इच्छिले असे काहीही मी नाकारले नाही; माझ्या हृदयाला कोणत्याही सुखासाठी नकार दिला नाही. माझ्या सर्व कष्टसाध्य कार्याने माझे अंतःकरण हर्षित होत असे, हाच माझ्या सर्व परिश्रमांचा मोबदला होता.
एक्सप्लोर करा उपदेशक 2:10
5
उपदेशक 2:13
मी पाहिले की सुज्ञान मूर्खतेपेक्षा अधिक चांगले आहे, जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे.
एक्सप्लोर करा उपदेशक 2:13
6
उपदेशक 2:14
सुज्ञ व्यक्तीच्या मस्तकावर नेत्र आहेत, तर मूर्ख अंधारात चालत असतो; परंतु मला समजले की अंतिम परिणाम त्या दोघांवर मात करतो.
एक्सप्लोर करा उपदेशक 2:14
7
उपदेशक 2:21
कारण एखादी व्यक्ती सुज्ञान, विद्या आणि कौशल्य यांच्या साहाय्याने कष्ट करते आणि ते अशा व्यक्तीच्या हाती सोडते, की ज्याने त्यासाठी काहीही श्रम केलेले नाहीत. हे सुद्धा निरर्थक आणि मोठ्या दुर्भाग्याचे आहेत.
एक्सप्लोर करा उपदेशक 2:21
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ