जेव्हा मी बोलू लागतो, मी आक्रोश करतो
हिंसाचार व विनाश हेच जाहीर करतो.
कारण याहवेहच्या वचनामुळे माझ्या वाट्याला
दिवसभर निंदा व अप्रतिष्ठाच आली आहे.
परंतु जर मी म्हटले, “मी त्यांचे शब्द उच्चारणार नाही
किंवा त्यांच्या नावाने संदेश देणार नाही,”
तर त्यांचे वचन माझ्या अंतःकरणात अग्नीप्रमाणे पेटते,
व तो अग्नी माझ्या हाडात बंदिस्त राहतो.
तो आतील आत इतःपर दाबून ठेवणे मला असह्य होते.
निश्चितच, मी ते करू शकत नाही.