YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 146

146
स्तोत्र 146
1याहवेहचे स्तवन करा.
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
2आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन;
माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
3तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत;
तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही.
4कारण जेव्हा त्यांचे प्राण जातात, त्यांचे शरीर भूमीत परत जाऊन मिळते;
त्या दिवशी त्यांनी केलेल्या सर्व योजना नष्ट होतात.
5तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे,
आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे,
6कारण त्यांनीच आकाश, पृथ्वी, सागर,
आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले;
ते सदासर्वदा विश्वासयोग्य आहेत.
7गरीब व गांजलेले यांना तेच योग्य न्याय देतात;
तसेच भुकेल्यांस ते अन्न देतात;
याहवेहच बंदिवानांना मुक्त करतात,
8ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात,
याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात,
परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत.
9याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात,
आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात,
परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.
10याहवेह सर्वकाळ राज्य करतील,
हे सीयोना, तुझे परमेश्वर पिढ्यान् पिढ्या राज्य करतील.
याहवेहचे स्तवन करा.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 146: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन