YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 24

24
स्तोत्र 24
दावीदाचे एक स्तोत्र.
1पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे.
जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.
2कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला,
आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले.
3याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल?
त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील?
4ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे,
जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही,
जो खोटी शपथ वाहत नाही.#24:4 किंवा खोट्या दैवतांची
5त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल.
त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल.
6हीच अशी पिढी आहे जी याहवेहचा शोध घेत आहे,
याकोबाच्या परमेश्वरा, जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत. सेला
7अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा;
प्राचीन द्वारांनो, उच्च व्हा;
गौरवाच्या राजाला आत प्रवेश करू द्या.
8असा गौरवशाली राजा कोण आहेत?
याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत,
जे युद्धात पराक्रमी आहेत.
9अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा;
प्राचीन द्वारांनो, सताड उघडा;
महातेजस्वी महाराज आत येतील.
10हा गौरवशाली राजा कोण आहेत?
सर्वशक्तिमान याहवेह—
तेच आहेत गौरवशाली राजा. सेला

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 24: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन