YouVersion लोगो
सर्च आयकॉन

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”नमुना

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”

4 पैकी 1 दिवस

बाहेर पाऊल टाका

“मला सांगा” म्हणण्याचे धाडस

तुम्ही कधी याकडे लक्ष दिले आहे का की पेत्राची विनंती अतिशय असाधारण होती? वादळात, इतर लोक जेव्हा तारवाच्या तुलनात्मक सुरक्षिततेस बिलगून राहिले, तेव्हा पेत्राने काहीतरी वेगळे पाहिले. त्याने येशूची भेट घेण्याची संधी पाहिली जी नैसर्गिक नियमांना आणि मानवी तर्कबुद्धीस आव्हान देणार होती.

“प्रभूजी, आपण असाल” पेत्र म्हणाला, “तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.”हे शब्द विश्वासाने बाहेर पाऊल टाकण्याचे तीन सामर्थ्यवान पैलू प्रकट करतात:

ओळख (“आपण असाल तर”) - पेत्राने येशूच्या उपस्थितीची पुष्टी मागितली.

अधीनता (“मला सांगा”) - त्याने स्वतःला येशूच्या अधिकाराधीन केले.

दिशा (“आपणाकडे येण्यास”) - त्याच्या विश्वासाच्या पावलाचा एक स्पष्ट हेतू आणि इष्टस्थळ होते.

विचार करा: पेत्राने येशूला त्याच्याकडे येण्यास विनंती केली नाही. त्याने वेगळ्या चमत्काराची विनंती केली नाही. त्याने अशक्य परिस्थितीत प्रवेश करण्याची आज्ञा देण्यास विनंती केली कारण त्याला काहीतरी गहन असे समजले होते - येशूसोबत असणे जोखीम पत्करण्यायोग्य होते.

प्रार्थनेचे मुद्दे:

तुमच्या जीवनात कोठे येशू “ये” असे म्हणत आहे?

तुम्हाला आरामाच्या कोणत्या तारवातून बाहेर पडण्यास बोलविले जात आहे?

आज्ञा पाळण्यापूर्वी तुम्ही परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहत आहात का?

ज्या क्षेत्रांत तुम्ही संकोच करत आहात तेथे “मला सांगा” असे म्हणण्याचे धाडस मागा.

वैयक्तिक लागूकरण:

तुमची स्वतःची “मला सांगा” अशी प्रार्थना लिहा. खालील गोष्टींबद्दल विशिष्ट असा:

तुम्ही सध्या ज्या आरामदायी “तारवात” आहात

ज्या “पाण्यात” येशू तुम्हाला चालण्यासाठी पाचारण करीत आहे

तुम्हाला कोणत्या भीतींवर मात करायची गरज आहे

तुम्हाला जे पहिले पाऊल उचलण्याची गरज आहे

चिंतन प्रश्न:

येशूला पेत्राने दिलेल्या तात्काळ प्रतिसादाबद्दल तुम्हाला काय वाटते?

इतर शिष्य तारवात राहिले असे तुम्हाला का वाटते?

परमेश्वराच्या पाचारणाप्रत तुमच्या प्रतिसादाची पेत्राच्या प्रतिसादाशी कशी तुलना होते?

दिवस 2

या योजनेविषयी

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”

दळी वाऱ्याने हेलकावे खाणाऱ्या तारवातून घोंघावणाऱ्या पाण्यात पाऊल टाकतांना पेत्राने म्हटले, “मला आज्ञा द्या.” या दोन शब्दांनी त्याचे जीवन बदलून टाकले. तारवापासून येशूपर्यंतचा त्याचा प्रवास विश्वास, लक्ष आणि परिवर्तन याबद्दल कालातीत सत्ये प्रकट करतो. हा 4 दिवसांचा भक्तीबोध मत्तय 14:28-33 चे विवेचन करतो, तुम्हाला येशूचे पाचारण ओळखण्यास, विश्वासाने भीतीवर मात करण्यास आणि त्याच्यावर अढळ दृष्टी टिकवून ठेवण्यास मार्गदर्शन करतो. तुम्ही तुमच्या तारवाच्या काठावर असाल किंवा पाण्यावर चालायला शिकत असाल, तेव्हा सामान्य विश्वासणारे “मला सांगा” असे म्हणण्याचे धाडस करतात तेव्हा काय होते ते शोधा.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल Zero चे आभार मानू इच्छितो अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: www.zeroconferences.com/india