“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”नमुना

वर पहा
खिळलेल्या दृष्टीचे सामर्थ्य
ज्या क्षणी पेत्राने तारवातून पाऊल बाहेर टाकले, त्याने अशा क्षेत्रात प्रवेश केला जेथे निसर्गाचे नियम लागू नव्हते. ज्या पाण्याने त्याला गिळून टाकावयास हवे होते, ते त्याच्या पायाखाली मज़बूत ज़मीन बनले. कोणत्या गोष्टीने हा फरक घडला? त्याची दृष्टी येशूवर खिळली होती.
त्या दृश्याचा विचार करा: काळोखलेली रात्र, सोसाट्याचा वारा, बेफाम लहरी. तरीही मत्तयाच्या वर्णनात फक्त असे म्हटलेले आहे, “तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला.” या वर्णनाचा साधेपणा एक गंभीर सत्य प्रकट करतो: जेव्हा आमचे डोळे येशूवर खिळलेले असतात, तेव्हा अशक्य गोष्ट देखील त्याच्याप्रत जाणाऱ्या प्रवासात केवल एक तपशील ठरते.
“कडे जाण्यासाठी” उपयोग केला जाणारा ग्रीक शब्द सतत कृती दर्शवितो. पेत्र फक्त पावले टाकत नव्हता; तर तो वेगाने चालत होता. प्रत्येक पाऊल वस्तुस्थितीवर विश्वासाचा, भौतिक अशक्यतेवर आध्यात्मिक वास्तविकतेचा विजय होता.
प्रार्थनेचे मुद्दे:
कोणत्या गोष्टी तुमचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत?
येशूकडे पाहण्याच्या तुलनेत तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे पाहण्यात किती वेळ घालवता?
देवाला विनंती करा की त्याच्यावर तुमचे लक्ष केंद्रित ठेवण्यात त्याने तुमची मदत करावी.
कोणती गोष्ट तुमचे लक्ष येशूपासून दूर करते हे ओळखण्यासाठी विवेकबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करा.
व्यावहारिक अभ्यास:
आजच एक “दृष्टी दैनिकी” ठेवा:
तुम्ही येशूवर लक्ष केंद्रित केले असे क्षण नमूद करा
कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही विचलित झाला ते लिहा.
तुम्ही कोठे पाहत होता त्या अधारे तुमचा दृष्टिकोन कसा बदलला ते लिहा.
चिंतन प्रश्न:
तुम्ही मागे कधी येशूवर इतके लक्ष खिळवून ठेवले होते की तुम्हाला तुमच्या परिस्थितींबद्दल विसर पडला होता?
कठीण काळांत ख्रिस्तावर तुमचे लक्ष केंद्रित ठेवण्यास तुम्हाला कोणती गोष्ट मदत करते?
जेव्हा तुमची दृष्टी येशूवर केंद्रित होते तेव्हा तुमचे वातावरण कसे बदलते?
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

दळी वाऱ्याने हेलकावे खाणाऱ्या तारवातून घोंघावणाऱ्या पाण्यात पाऊल टाकतांना पेत्राने म्हटले, “मला आज्ञा द्या.” या दोन शब्दांनी त्याचे जीवन बदलून टाकले. तारवापासून येशूपर्यंतचा त्याचा प्रवास विश्वास, लक्ष आणि परिवर्तन याबद्दल कालातीत सत्ये प्रकट करतो. हा 4 दिवसांचा भक्तीबोध मत्तय 14:28-33 चे विवेचन करतो, तुम्हाला येशूचे पाचारण ओळखण्यास, विश्वासाने भीतीवर मात करण्यास आणि त्याच्यावर अढळ दृष्टी टिकवून ठेवण्यास मार्गदर्शन करतो. तुम्ही तुमच्या तारवाच्या काठावर असाल किंवा पाण्यावर चालायला शिकत असाल, तेव्हा सामान्य विश्वासणारे “मला सांगा” असे म्हणण्याचे धाडस करतात तेव्हा काय होते ते शोधा.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल Zero चे आभार मानू इच्छितो अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: www.zeroconferences.com/india