YouVersion लोगो
सर्च आयकॉन

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”नमुना

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”

4 पैकी 3 दिवस

मोठा बदल

जेव्हा भीतीचा विश्वासाशी सामना होतो

“पण जेव्हा त्याने वारा पाहिला तेव्हा तो घाबरला आणि बुडू लागला आणि ओरडला, ‘प्रभु, मला वाचवा!’” हा महत्त्वाचा क्षण आपल्याला भीती आणि विश्वासाबद्दल काहीतरी गंभीर असे शिकवतो. लक्षात घ्या की वारा अचानक मजबूत झाला नव्हता. येशूपेक्षा पेत्राला त्याची अधिक जाणीव झाली होती.

मूळ पाठात “पाहून” हा शब्द केवळ दृश्य निरीक्षणापेक्षा जास्त सूचित करतो; तो सूचित करते की पेत्र विचार करू लागला, चिंतन करू लागला आणि वाऱ्याला महत्त्व देऊ लागला. त्याचे लक्ष विचलित झाल्यामुळे तात्काळ परिणाम निर्माण झाला: भीतीने विश्वासाची जागा घेतली आणि बुडण्याने चालण्याची जागा घेतली.

पण पेत्राच्या अवनतीतही सौंदर्य आहे. “प्रभुजी, मला वाचवा!” हा त्याचा आक्रोश मराठीत फक्त तीन शब्दांचा होता (आणि ग्रीकमध्ये त्यापेक्षा कमी), तरीही त्यावरून दिसून येते की संकटाच्या क्षणी कोठे वळावे हे पेत्राला माहित होते. त्याची संक्षिप्त प्रार्थना आपल्याला आठवण करून देते की हलाखीच्या क्षणांत अलंकारयुक्त शब्दांची गरज नसते - फक्त येशूकडे वळणारे प्रामाणिक हृदय हवे.

प्रार्थनेचे मुद्दे:

कुठली भिती तुम्हाला रोखून धरत आहे?

जेव्हा तुम्ही बुडू लागता तेव्हा तुम्ही किती लवकर येशूला हाक मारता?

भीतीच्या क्षणी तुमचा विश्वास बळकट करण्यासाठी देवाजवळ विनंती करा.

जेव्हा तुम्ही बुडू लागता तेव्हा हे ओळखण्यासाठी विवेक मिळावा म्हणून प्रार्थना करा.

व्यावहारिक अभ्यास:

भीती-विश्वासाचे प्रतिचित्रण:

1. दोन स्तंभ तयार करा:

भीती स्तंभ: तुम्हाला सध्या कसली भीती वाटते त्याची यादी तयार करा.

विश्वास स्तंभ: देवाच्या वचनातून एक सत्य लिहा जे प्रत्येक भीतीला तोंड देईल.

2. ही यादी दिवसभर तुमच्या जवळ सहज मिळेल अशी ठेवा.

चिंतन प्रश्न:

येशूने पेत्राला वाचवण्यापूर्वी त्याला थोडेसे बुडू का दिले असे तुम्हाला वाटते?

पेत्राच्या आक्रोशाला येशूने ज्या वेगाने प्रतिसाद दिला त्यावरून आपल्याला काय शिकता येते?

देवाने तुमच्या भूतकाळातील भीतीच्या क्षणांचा उपयोग तुमचा विश्वास मजबूत करण्यासाठी कसा केला आहे?

दिवस 2दिवस 4

या योजनेविषयी

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”

दळी वाऱ्याने हेलकावे खाणाऱ्या तारवातून घोंघावणाऱ्या पाण्यात पाऊल टाकतांना पेत्राने म्हटले, “मला आज्ञा द्या.” या दोन शब्दांनी त्याचे जीवन बदलून टाकले. तारवापासून येशूपर्यंतचा त्याचा प्रवास विश्वास, लक्ष आणि परिवर्तन याबद्दल कालातीत सत्ये प्रकट करतो. हा 4 दिवसांचा भक्तीबोध मत्तय 14:28-33 चे विवेचन करतो, तुम्हाला येशूचे पाचारण ओळखण्यास, विश्वासाने भीतीवर मात करण्यास आणि त्याच्यावर अढळ दृष्टी टिकवून ठेवण्यास मार्गदर्शन करतो. तुम्ही तुमच्या तारवाच्या काठावर असाल किंवा पाण्यावर चालायला शिकत असाल, तेव्हा सामान्य विश्वासणारे “मला सांगा” असे म्हणण्याचे धाडस करतात तेव्हा काय होते ते शोधा.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल Zero चे आभार मानू इच्छितो अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: www.zeroconferences.com/india