युहन्ना 4
4
येशू अन् सामरी बाई
1मंग जवा प्रभू येशूला मालूम झालं, कि परुशी लोकायन त्याच्या बाऱ्यात आयकलं हाय, कि तो योहान बाप्तिस्मा देणाऱ्याऊन जास्त शिष्य बनवते, अन् त्यायले बाप्तिस्मा देते. 2जरी येशू स्वता नाई, पण त्याचे शिष्य बाप्तिस्मा देत होते, 3तवा तो यहुदीया प्रांताले सोडून परत गालील प्रांतात चालला गेला. 4अन् त्याले सामरीया प्रांतातून जाणं आवश्यक होतं. 5मंग तो सुखार नावाच्या सामरीया प्रांताच्या एका गावा परेंत आला, जे त्या जागेच्या जवळ हाय, जिले याकोबान त्याचा पोरगा योसेफले देली होती. 6अन् याकोबनं जे विहीर खंदली होती. ते आता पण ततीच होती, तो दुपारचा वेळ होता, अन् येशू रस्त्यानं येतांना थकला होता. अन् त्या विहीरीवर असाच बसला. 7तेवढ्यात एक सामरीया प्रांतातली बाई पाणी भऱ्याले विहीरीवर आली, तवा येशूनं तिले म्हतलं, “मले पियाले पाणी दे.” 8अन् त्याचे शिष्य तर नगरात जेवण विकत घीयाले गेले होते. 9त्या सामरी बाईन येशूला म्हतलं, “तू एक यहुदी हाय, अन् मी सामरी प्रांताची बाई हाय, तू मले पाणी कायले मांगते#4:9 तू मले पाणी कायले मांगते कावून कि यहुदी लोकं सामरी लोकाय संग कोणत्याचं गोष्टीचा समंध ठेवत नसत?” 10येशूनं तिले उत्तर देलं, “तुले नाई माईत कि देव तुले काय द्याची इच्छा ठेवते, अन् तुले नाई माईत कि कोण तुले पाणी मांगून रायला, जर तुले माईत असतं तर तू मले हे मांगतलं असतं अन् मी तुले तो पाणी देला असता जो जीवन देते.” 11तीन येशूले म्हतलं, “हे स्वामी, तुह्यापासी पाणी भऱ्याले तर काईच नाई हाय, अन् विहीर लय खोल हाय; तर मंग ते जीवनाच पाणी तुह्यापासी कुठून आलं? 12काय तू आमचा पूर्वज याकोबाऊन मोठा हाय, ज्याने आमाले हे विहीर देली; अन् तो सोता, त्याचे लेकरं, अन् त्याच्या जनावरा सोबत त्याच्यातून पेले?” 13येशूनं तिले उत्तर देलं, “जो कोणी हे पाणी पेईन त्याले अजून ताहान लागीन, 14पण जो कोणी त्या पाण्यातून पेईन जे मी त्याले देईन, त्याले मंग अनंत काळापरेंत तहान लागणार नाई, पण जे पाणी मी त्याले देईन, तो त्याच्यात एक झरा बनून जाईन, जो त्यायले जीवन देणारा पाणी देईन अन् त्यायले अनंत जीवन देईन.” 15बाईनं त्याले म्हतलं, “हे प्रभू, ते पाणी मले दे, कि मले तहान लागली नाई पायजे, अन् मी पाणी भऱ्याले एवढ्या दूर आली नाई पायजे” 16येशूनं तिले म्हतलं, “जाय, आपल्या नवऱ्याले अती बलावून आणं.” 17बाईनं त्याले उत्तर देलं, “मी बिना नवऱ्याची हाय.” येशूनं तिले म्हतलं, कि “तू ठिक सांगते, कि मी बिना नवऱ्याची हाय.” 18कावून कि तुह्ये पाच नवरे झाले हाय, अन् ज्या माणसापासी तू आता हाय तो पण तुह्या नवरा नाई हाय; हे तू खरं सांगतल हाय. 19बाईनं त्याले म्हतलं, “हे प्रभू मले वाटते कि तू भविष्यवक्ता हाय. 20आमच्या बापदादायन याचं पहाडावर आराधना केली, अन् तुमी यहुदी लोकं म्हणता, कि ते जागा जती आराधना केली पायजे, ते यरुशलेम शहर हाय.” 21येशूनं तिले म्हतलं, “हे बाई माह्या गोष्टीचा विश्वास कर कि तो वेळ येत हाय, कि तुमी नाई या पहाडावर अन् नाई यरुशलेम शहरात पण देवबापाची आराधना करसान. 22तुमी सामरी लोकं ज्याले नाई ओयखत, त्याची आराधना करता; अन् आमी यहुदी लोकं ज्याले ओयखतो, त्याची आराधना करतो, कावून कि तारण यहुदी लोकायतून हाय. 23पण तो दिवस येत हाय, अन् आता पण हाय, ज्याच्यात खरे भक्त देवाची आराधना आत्म्यान अन् खरे पणान करतीन, कावून कि देवबाप आपल्यासाठी अशीच आराधना करणाऱ्यायले बघत हाय. 24देव आत्मा हाय, म्हणून हे आवश्यक हाय, कि त्याची आराधना करणारे, आत्माने अन् खरे पणान आराधना करावं.” 25बाईनं त्याले म्हतलं, “मले मालूम हाय, मसीहा ज्याले ख्रिस्त म्हणतात, येणार हाय; जवा तो येईन, तवा तो आमाले सगळ्या गोष्टी सांगीन.” 26येशूनं तिले म्हतलं, “मी जो तुह्या संग बोलून रायलो, तोच हावो.”
शिष्यायचे परत येणे
27तेवढ्यातच त्याचे शिष्य आले, अन् ते हापचक कऱ्याले लागले कि तो त्या बाई संग गोष्ट करून रायला हाय; तरी पण कोण विचारलं नाई, कि “तुह्यी काय इच्छा हाय?” या “तू कायले तिच्या संग गोष्टी करून रायला?” 28तवा ती बाई आपला माट सोडून गावात चालली गेली, अन् लोकायले सांगू लागली, 29“चला, एका माणसाले पाहा, त्यानं माह्या बद्दल सगळं काई जे मी केलं होतं सांगतल; काय हा तर ख्रिस्त नाई हाय?” 30तवा गावातून लय लोकं निघून येशूले पाह्याले त्याच्यापासी जाऊ लागले. 31तेवढ्यात येशूचे शिष्य त्याले हे विनंती करून म्हणत होते, “हे गुरुजी, काई तरी खाऊन घ्या.” 32पण त्यानं त्यायले म्हतलं, “माह्यापासी खाण्यासाठी असं जेवण हाय, जे तुमाले मालूम नाई.” 33तवा शिष्य आपसात एकामेका संग हे बोलत होते, “कोणी दुसऱ्यानं त्याच्यासाठी काई जेवाले आणलं काय?” 34येशूनं त्यायले म्हतलं, “माह्याले जेवण त्या देवाच्या इच्छेचे पालन करणे हाय ज्यानं मले पाठवलं हाय, अन् त्याच्या कामाले पूर्ण कराच हाय जे त्यानं मले सोपवले हाय.” 35काय तुमी हे नाई म्हणत, सोंगनी कऱ्याले आता पण चार महिने रायलेले हाय? “मी तुमाले म्हणतो, कि आपले डोये उघडा येणाऱ्या लोकायले पाहा, ते एका वावरा सारखे हाय जे कापणी साठी तयार हाय. 36कापणारा मजुरी मिळवतो व अनंत जीवनासाठी पीकं एकत्र करतो; ह्या साठी की, पेरणार्याने व कापणार्यान पण एकत्र आनंद करावा. 37कावून कि याच्यावर हे म्हण ठिक बसते, पेरणारा दुसरा हाय अन् कापणारा दुसरा हाय. 38मी तुमाले ते वावर काप्याले पाठवलं, त्याच्यात तुमी काही कष्ट नाई केलं, दुसऱ्यायन कष्ट केले, अन् तुमी त्यायच्या पिकाले जमा करसान.”
सामरी लोकायचे विश्वास करणे
39अन् त्या गावातल्या लय सामरी प्रांताच्या लोकायन त्या बाईच्या म्हणन्यावर येशूवर विश्वास केला; जिने हे म्हतलं होतं कि त्यानं सगळं काई जे काई मी केलं होतं, ते मले सांगतल. 40जवा ते सामरी प्रांताच्या लोकायच्या पासी आले, तवा त्याले विनंती करू लागले कि आमच्या अती राय, अन् तो तती दोन दिवस रायला. 41अन् त्याच्या उपदेशानं अजून लय लोकायन येशूवर विश्वास केला. 42अन् त्या बाईले म्हतलं, “आमी आता तुह्या म्हतल्यानच विश्वास नाई करत; कावून कि आमी स्वता आयकलं, अन् आमाले माईत हाय कि हा खरचं जगातल्या लोकायचं तारण करणारा, ख्रिस्त हाय.” 43मंग त्या दोन दिवसाच्या बाद येशू ततून निघून गालील प्रांतात चालला गेला. 44कावून कि येशूनं त्यायले म्हतलं, मी तुमाले खरं सांगतो, “कोणत्याही भविष्यवक्त्याले आपल्या देशात मान-सन्मान भेटत नाई.” 45जवा तो गालील प्रांतात आला, तवा गालील प्रांताचे लोकं त्याले आनंदाने भेटले; कावून कि जेवळे काम त्यानं यरुशलेम शहरात सणाच्या दिवशी केले होते, त्यायनं ते सगळं पायलं होतं, कावून कि ते पण सणात गेले होते.
राजाच्या सेवकाच्या पोराले बरं करने
46मंग जवा येशू परत गालील प्रांताच्या काना गावात आला, जती त्यानं पाण्याले अंगुराचा रस बनवला होता, तती राज्याचा एक सेवक होता, ज्याचा पोरगा कफरनहूम शहरात बिमार होता. 47तो ते आयकून कि येशू यहुदीया प्रांतातून गालील प्रांतात आला हाय, त्याच्यापासी गेला, अन् त्याले विनंती करू लागला कि चलून त्याच्या पोराले बरं करून दे: कावून कि तो मऱ्याले टेकला होता. 48येशूनं त्याले म्हतलं, “जवा परेंत तुमी चमत्कार अन् अद्भभुत काम नाई पायसान तवा परेंत तुमी कधीच माह्यावर ख्रिस्त म्हणून विश्वास नाई करसान.” 49राज्याच्या सेवकान त्याले म्हतलं, “हे प्रभू, माह्य पोरगं मऱ्याच्या पयले चल.” 50येशूनं त्याले म्हतलं, “जाय तुह्या पोरगा जिवंत हाय.” त्या माणसानं येशूच्या म्हतलेल्या गोष्टीवर विश्वास केला, अन् चालला गेला. 51तो रस्त्यान जाऊनच रायला होता, कि त्याचे सेवक येऊन त्याले भेटले, अन् सांग्याले लागले, “तुह्या पोरगा जिवंत हाय.” 52त्यानं त्याले विचारलं “कोण्या वाक्ती तो चांगला होऊन रायला होता?” त्यायनं त्याले म्हतलं, “काल दुपारी एक वाजता त्याच्या ताप उतरला.” 53तवा पोराच्या बापाले मालूम पडलं कि हे त्याचं वाक्ती झालं जवा येशूनं त्याले म्हतलं, “तुह्या पोरगा जिवंत हाय,” अन् त्यानं व त्याच्या साऱ्या घरातल्या सगळ्या लोकायन येशूवर विश्वास केला. 54हा दुसरा चमत्कारिक चिन्ह होता जो येशूनं यहुदीया प्रांतातून वापस येऊन गालील प्रांतात दाखवला.
Zvasarudzwa nguva ino
युहन्ना 4: VAHNT
Sarudza vhesi
Pakurirana nevamwe
Sarudza zvinyorwa izvi
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fsn.png&w=128&q=75)
Unoda kuti zviratidziro zvako zvichengetedzwe pamidziyo yako yose? Nyoresa kana kuti pinda
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.