1
मत्तय 7:7
मराठी समकालीन आवृत्ती
“मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.
Jämför
Utforska मत्तय 7:7
2
मत्तय 7:8
कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
Utforska मत्तय 7:8
3
मत्तय 7:24
“यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले.
Utforska मत्तय 7:24
4
मत्तय 7:12
तर मग सर्व ज्या इतरांनी तुमच्यासाठी कराव्यात तसेच तुम्हीही त्यांच्यासाठी करा, नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे सार हेच आहे.
Utforska मत्तय 7:12
5
मत्तय 7:14
तरी जीवनाकडे नेणारा दरवाजा लहान असून मार्गही अरुंद आहे आणि अगदी थोडक्यांना तो सापडतो.
Utforska मत्तय 7:14
6
मत्तय 7:13
“अरुंद दाराने प्रवेश करा कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद व पसरट आहे. पुष्कळ लोक त्याच दरवाजातून प्रवेश करतात.
Utforska मत्तय 7:13
7
मत्तय 7:11
जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते चांगल्या देणग्या किती विशेषकरून देतील?
Utforska मत्तय 7:11
8
मत्तय 7:1-2
“इतरांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.
Utforska मत्तय 7:1-2
9
मत्तय 7:26
जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्या मूर्ख माणसासारखा आहे.
Utforska मत्तय 7:26
10
मत्तय 7:3-4
“आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ असताना, ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुला आपल्या भावाला कसे म्हणता येईल?
Utforska मत्तय 7:3-4
11
मत्तय 7:15-16
“खोट्या संदेष्ट्यांच्या विषयी अतिशय सावधगिरी बाळगा. ते मेंढरांची वस्त्रे धारण करून तुमच्याकडे येतात पण आतून क्रूर लांडगे असतात. त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येते. लोक कधी काटेरी झुडूपांवरून अंजीर किंवा रानगुलाबाच्या झुडूपांवरून द्राक्षे काढतात काय?
Utforska मत्तय 7:15-16
12
मत्तय 7:17
प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते आणि वाईट झाड वाईट फळ देते.
Utforska मत्तय 7:17
13
मत्तय 7:18
चांगली झाडे, वाईट फळे देणार नाहीत आणि वाईट झाड, चांगले फळे देणार नाही.
Utforska मत्तय 7:18
14
मत्तय 7:19
या कारणामुळे चांगली फळे न देणारी झाडे तोडून टाकण्यात येतील व जाळून टाकली जातील.
Utforska मत्तय 7:19
Hem
Bibeln
Läsplaner
Videor