1
लुका 14:26
वऱ्हाडी नवा करार
“जो कोणी माह्यापासी येईन, ते तोपर्यंत माह्याले शिष्य होऊ शकत नाई, जोपर्यंत आपल्या माय-बाप अन् व बायको-लेकरं अन् भाऊ-बहिण अन् आपल्या स्वताच्या पेक्षा जास्त प्रेम मले करणार.
对照
探索 लुका 14:26
2
लुका 14:27
अन् जो कोणी माह्याला अनुसरण कऱ्यासाठी वधस्तंभाच दुख सहन कराले तयार हाय, अन् मऱ्याले पण तयार हाय तेच माह्यावाले शिष्य बनू शकते.”
探索 लुका 14:27
3
लुका 14:11
कावून कि जो कोणी आपल्या स्वताले मोठा बनविण, त्याले लायना केलं जाईन, अन् जो कोणी आपल्या स्वताले लहान बनविण, त्याले मोठं केलं जाईन.”
探索 लुका 14:11
4
लुका 14:33
ह्याच प्रकारे तुमच्याईतला जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाई, तो माह्याल्या शिष्य होऊ शकत नाई.”
探索 लुका 14:33
5
लुका 14:28-30
“तुमच्यात असा कोण हाय, जो मोठी इमारत बांधण्याची इच्छा करते पण पयले बसून किती खर्च येईन याचा हिशोब करते कि तेवढा पैसा त्याच्याकडे हाय कि नाई? तर असे नाई झाले पायजे, कि जवा पाया घातल्यावर बांधू नाई शकला, तर सगळे पायणारे त्याची मजाक करतीन. अन् हे म्हणतीन हा माणूस बांधाले तर लागला पण त्याले ते पूर्ण करू शकला नाई.
探索 लुका 14:28-30
6
लुका 14:13-14
पण जवा तू पंगत ठेवसीन, तवा गोरगरिबायले, व्यंगायले, लंगड्यायले, अन् फुटक्यायले बलाव. तवा तू आशीर्वादित होशीन, कावून कि त्याच्यापासी तुले बदला घ्याले काई नाई, तवा तुले जे धर्मी लोकं वापस मरणातून परत जिवंत होतीन, त्याचं फळ देईन.”
探索 लुका 14:13-14
7
लुका 14:34-35
“मीठ तर चांगलं हाय, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याले खारटपणा कायनं आणावा? ते तर वावरा साठी अन् खता साठी पण कामाचं नाई, त्या मिठाले लोकं बायर फेकून देतात, ज्या कोणाले माह्यावाला आवाज आयकू येते त्यानं हे समज्याचा प्रयत्न करा.”
探索 लुका 14:34-35
主页
圣经
计划
视频