लुका 14

14
आरामाच्या दिवशी बरं करणे
1अन् असं झालं, कि आरामाच्या दिवशी येशू परुशी लोकायच्या अधिकाऱ्याच्या घरी जेव्याले गेला, अन् तवा ते त्याले ध्यान देऊन पाऊ लागले, कि काई असं करावं, ज्याच्यान सगळ्या लोकायन त्याच्यावर दोष लावला पायजे. 2पाहा, तती एक माणूस त्यायच्या समोर बसला होता, ज्याले हात पाय सुजण्याचा रोग होता. 3तवा येशूनं मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् परुशी लोकायले म्हतलं, “काय आरामाच्या दिवशी लोकायले चांगलं करायची अनुमती हाय?” 4पण ते चुपचाप रायले, तवा येशूनं त्याले हात पकडून बरं केलं, अन् जाऊ देलं. 5अन् येशूनं त्यायले म्हतलं, “तुमच्याईतून असा कोण हाय, ज्याचा गधा, पोरगा, नाई तर बैल, विरीत पडला, तर त्याले आरामाच्या दिवशी पटकन बायर काढणार नाई?” 6तवा ते त्यायले या गोष्टीचं काईच उत्तर देऊ शकले नाई.
पावण्यायचा सत्कार
7जवा येशूनं पायलं कि ज्यायले आमंत्रण देले होते, ते लोकं कसे मुख्य-मुख्य जागा निवडून बसून रायले होते, तवा त्यानं त्यायले एक कथा सांगतली, 8“जवा तुले कोणी लग्नाच्या जेवणात बलावीन, तवा मुख्य-मुख्य जागा निवडून नका बसू, असं नाई व्हावं कि तुह्यापेक्षा कोण्या मोठ्या एका पावण्याले बलावलं अशीन. 9अन् ज्यानं तुले अन् त्याले दोघायले आमंत्रण देलं अशीन, तो येऊन तुले मनीनं कि त्याले जागा दे, अन् तवा तू लाजशीन, अन् सऱ्यात खालच्या जागी तुले बसा लागीन. 10पण जवा तुले आमंत्रण देलं जाईन, तवा सर्व्यात खालच्या जागी बस, ह्या साठी कि ज्यानं तुले आमंत्रण देलं हाय, तो येऊन तुले मनीनं, हे मित्रा समोर महत्वपूर्ण जाग्यावर जाऊन बस, तवा तुह्या संग बसलेल्या मध्ये तुह्याल्या मान मोठा होईन. 11कावून कि जो कोणी आपल्या स्वताले मोठा बनविण, त्याले लायना केलं जाईन, अन् जो कोणी आपल्या स्वताले लहान बनविण, त्याले मोठं केलं जाईन.”
प्रतिफळ
12तवा त्यानं आपल्या आमंत्रण देणाऱ्याले म्हतलं, “जवा तू दिवसा किंवा रात्रीची पंगत ठेवसीन, तवा आपल्या मित्रायले अन् भावायले अन् नातलगायले किंवा धनवान शेजाऱ्यालें नको बलाऊ, नाई तर तो तुले पण बलाऊन त्याचा बदला घेईन. 13पण जवा तू पंगत ठेवसीन, तवा गोरगरिबायले, व्यंगायले, लंगड्यायले, अन् फुटक्यायले बलाव. 14तवा तू आशीर्वादित होशीन, कावून कि त्याच्यापासी तुले बदला घ्याले काई नाई, तवा तुले जे धर्मी लोकं वापस मरणातून परत जिवंत होतीन, त्याचं फळ देईन.”
मोठ्या जेवणारची कथा
(मत्तय 22:1-10)
15तवा त्याच्या संग जे जेव्याले बसले होते त्यायच्यातून कोण्या एकानं ह्या गोष्टी आयकून त्याले म्हतलं, “आशीर्वादित हायत ते, जे देवाच्या राज्यात जेवण करतीन.” 16तवा येशूनं त्याले म्हतलं, “कोण्या एका माणसानं खूप मोठी पंगत ठेवली अन् लय लोकायले बलावलं. 17अन् जवा जेवण तयार झालं, तवा त्यानं आपल्या नौकरायले ज्या लोकायले आमंत्रण होतं, त्यायले बलव्यासाठी पाठवलं, कि या जेवण तयार हाय. 18तवा ते सगळे एकसारखेचं बाहाणे सांगू लागले, पयल्यान त्याले म्हतलं, मी वावर विकत घेतलं हाय, अन् ते मले जाऊन पायले पाईजे, मी तुले विनंती करतो मले क्षमा कर. 19अजून दुसऱ्यानं म्हतलं, मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या हायत, अन् त्यायची जाचं कराले जातो, मी तुले विनंती करतो मले क्षमा कर. 20अजून एकानं म्हतलं, मी लग्न केलं हाय, म्हणून मले येता नाई येत. 21मंग तो दास आपल्या मालकाले ह्या गोष्टी जाऊन सांगते, तवा घरमालकानं रागात येऊन आपल्या नौकराले म्हतलं, नगरातल्या रस्त्यात अन् गल्ल्याईत लवकर जाऊन, गोरगरिबायले, व्यंगायले, लंगड्यायले, अन् फुटक्यायले अती घेऊन ये. 22नंतर नौकरान मालकाले म्हतलं, हे स्वामी जसं तू म्हतलं होतं, तसचं मी केलं हाय, तरी अजून पण जागा हाय. 23मंग मालकान त्या नौकराले म्हतलं, रस्त्यावर व कुंपणामध्ये जाऊन लोकायले अंदर याले लावं, कि माह्यावालं घर भरलं पायजे. 24कावून कि मी तुमाले सांगतो, ज्यायले मी पयले आमंत्रण देलं होतं त्याच्यातून एकही माणूस माह्याल्या जेवणातले काई पण चाखणार नाई.”
कोण येशूचा शिष्य बनू शकते?
(मत्तय 10:37-38)
25अन् जवा लोकायची मोठी गर्दी येशूच्या मांग जाऊ रायली होती, तवा येशूनं मांग फिरून त्यायले म्हतलं. 26“जो कोणी माह्यापासी येईन, ते तोपर्यंत माह्याले शिष्य होऊ शकत नाई, जोपर्यंत आपल्या माय-बाप अन् व बायको-लेकरं अन् भाऊ-बहिण अन् आपल्या स्वताच्या पेक्षा जास्त प्रेम मले करणार. 27अन् जो कोणी माह्याला अनुसरण कऱ्यासाठी वधस्तंभाच दुख सहन कराले तयार हाय, अन् मऱ्याले पण तयार हाय तेच माह्यावाले शिष्य बनू शकते.”
28“तुमच्यात असा कोण हाय, जो मोठी इमारत बांधण्याची इच्छा करते पण पयले बसून किती खर्च येईन याचा हिशोब करते कि तेवढा पैसा त्याच्याकडे हाय कि नाई? 29तर असे नाई झाले पायजे, कि जवा पाया घातल्यावर बांधू नाई शकला, तर सगळे पायणारे त्याची मजाक करतीन. 30अन् हे म्हणतीन हा माणूस बांधाले तर लागला पण त्याले ते पूर्ण करू शकला नाई. 31असा कोणता राजा हाय, कि दुसऱ्या राजा संग लढाई कऱ्याले जायच्या पयले बसून विचार करत नाई, कि जे विस हजार घेऊन आपल्यावर लढाई कऱ्याले येऊ रायले हाय, काय मी दहा हजारांना घेऊन त्यायचा सामना करू शकतो कि नाई. 32जर जाता येत नशीन, तर तो दूर राऊन, आपल्या दूतायले पाठवून त्याच्या संग मेलमिलाप करून घेईन. 33ह्याच प्रकारे तुमच्याईतला जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाई, तो माह्याल्या शिष्य होऊ शकत नाई.”
चवं नसलेले मीठ
(मत्तय 5:13; मार्क 9:50)
34“मीठ तर चांगलं हाय, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याले खारटपणा कायनं आणावा? 35ते तर वावरा साठी अन् खता साठी पण कामाचं नाई, त्या मिठाले लोकं बायर फेकून देतात, ज्या कोणाले माह्यावाला आवाज आयकू येते त्यानं हे समज्याचा प्रयत्न करा.”

目前选定:

लुका 14: VAHNT

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录