युहन्ना 1
1
प्रारंभी शब्द होता
1ह्या सगळ्या जगाच्या बन्याच्या पयले शब्द होता, अन् हा शब्द देवासोबत होता, अन् हा शब्दचं देव होता. 2अन् तोच सुरवाती पासून देवासोबत होता. 3सगळं काई शब्दापासून निर्माण झालं, अन् जे काई या जगात निर्माण झालं होतं, सगळं काई त्याच्या पासूनच निर्माण झालं होतं. 4तो शब्द सगळ्या जीवनाचा स्त्रोत हाय, जो सगळ्या लोकायले ऊजीळ देते. 5अन् ऊजीळ अंधारात चमकते, अन् अंधार त्याले दाबू नाई शकला. 6देवानं योहान नावाच्या एका माणसाले पाठवलं. 7तो ऊजीळाच्या बाऱ्यात सांगाले आला, कि ऊजीळाच्या साक्षी व्दारे विश्वास करावा. 8योहान सोता ऊजीळ नव्हता, पण तो ऊजीळाची साक्षी द्यायले आला होता. 9तो जो खरा ऊजीळ होता जो हरएक माणसाला प्रकाशित करते, जगात येणार होता. 10तो जगात होता, अन् जग त्याच्या व्दारे निर्माण झालं, पण जगातल्या लोकायन त्याले नाई ओयखलं . 11तो आपल्या देशात आला, पण त्याच्या आपल्या देशातल्या लोकायन त्याचा तिरस्कार केला. 12पण जेवड्या लोकायन त्याले स्वीकार केलं, अन् त्याच्यावर विश्वास केला त्या सगळ्यायले त्यानं देवाचे लेकरं होण्याचा अधिकार देला. 13त्यायचा जन्म रक्त किंवा शरीराची इच्छा किंवा माणसाची इच्छा पासून झाला नाई, पण देवानं स्वता त्यायले आपले लेकरं ठरवलं 14तो शब्द मनुष्य बनला; त्यानं कृपा अन् सत्य मध्ये परिपूर्ण होऊन आमच्या मधात वस्ती केली. अन् आमी त्याचा असा गौरव पायला, जसं देवबापाच्या कडून आलेल्या एकुलत्या एक पोराचं गौरव. 15योहान बाप्तिस्मा देणाऱ्यान त्याच्याविषयी साक्ष देली, अन् मोठ्या आवाजाने म्हतलं, “कि हा तोच हाय ज्याच्या बाऱ्यात मी वर्णन सांगतल, कि जो माह्या मांगून येऊन रायला, तो माह्याऊन पण चांगला मोठा हाय, कावून कि तो माह्या पयले पासून अस्तित्वात होता.” 16कृपेने त्याच्या परिपूर्णताण त्यानं आपल्या सगळ्यायले आशीर्वादावर आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलं हाय. 17कावून कि मोशेच्या नियमशास्त्र तर देल्या गेली होती, पण देवानं येशू ख्रिस्ताच्या व्दारे कृपा अन् सत्य दाखवलं. 18देवाले कोणी कधीच पायलं नाई, पण फक्त देवाच्या एकुलत्या एक पोरानं, जो देवाच्या जवळ हाय, त्यानचं आपल्यावर देवाले प्रगट केलं.
योहान बाप्तिस्मा देणाऱ्याची साक्षी
(मत्तय 3:1-12; मार्क 1:1-8; लूका 3:1-9,15-17)
19योहान बाप्तिस्मा देणाऱ्याची साक्षी हे हाय, जवा यहुदी पुढाऱ्यायन यरुशलेम शहरातून याजकायले त्याच्यापासी पाठवलं, कि देवळात मदत करणारे लैवी लोकं त्याले हे विचारायले सोबत आले, कि तू कोण हायस? 20तवा योहानान उत्तर द्याले मना नाई केलं, पण सरळ सांगतल, “मी ख्रिस्त नाई हाय?” 21तवा त्यायनं त्याले विचारलं, “तर मंग तू कोण हायस? काय तू एलिया भविष्यवक्ता हायस?” त्यानं म्हतलं कि “मी नाई हावो.” “तर तू काय देवा कडून बोलणारा भविष्यवक्ता हायस?” त्यानं उत्तर देलं, कि “नाई.” 22तवा त्यायनं त्याले विचारलं, “मंग तू कोण हायस? कावून कि आमाले आमच्या पाठवणाऱ्यायले उत्तर द्याच हाय. तू आपल्या बाऱ्यात काय म्हणत?” 23त्यानं म्हतलं, “जसं यशया भविष्यवक्तान म्हतलं, मी सुनसान जागेतून एका आवाज देणाऱ्याचा शब्द आयकून रायलो हाय, कि तुमी प्रभूचा मार्ग सरखा करा.” 24हे परुशी लोकायकडून पाठवले गेले होते, 25त्यायनं त्याले हा प्रश्न विचारला, “जर तू ख्रिस्त नाई हायस, अन् एलिया भविष्यवक्ता पण नाई, अन् भविष्यवक्ता पण नाई तर मंग तू बाप्तिस्मा कायले देत?” 26योहान बाप्तिस्मा देणाऱ्यान त्यायले उत्तर देलं, “मी तर पाण्यानं बाप्तिस्मा देतो, पण तुमच्या मधात एक माणूस उभा हाय, ज्याले तुमी नाई ओयखत. 27म्हणजे तो माह्या बाद येईन, ज्याच्या जोड्यायचा लेसा खोलू शकू, पण मी योग्य नाई.”
देवाच मेंढरू
28ह्या गोष्टी यरदन नदीच्या तिकडच्या बाजुले बेथानी गावात झाल्या, जती योहान बाप्तिस्मा देणारा लोकायले बाप्तिस्मा देत होता. 29दुसऱ्या दिवशी त्यानं येशूले त्याच्या इकळे येतांना पाऊन म्हतलं, “पाहा हा देवाचा मेंढरू हाय, जो जगाच्या लोकायच्या पापायले उचलून घेऊन जाते. 30तो हाचं हाय, ज्याच्या बाऱ्यात मी सांगतल होतं, कि एक माणूस माह्या मांगून येत हाय, तो माह्याहून उत्तम हाय, कावून कि तो माह्या पयले होता. 31अन् मी तर त्याले ओयखत नाई होतो, कि तो ख्रिस्त होता, पण मी याच्यासाठी पाण्यानं बाप्तिस्मा देत आलो, कि इस्राएल देशाच्या लोकायले हे सांग्याले कि तो कोण हाय, मी पाण्यानं बाप्तिस्मा देत आलो.” 32अन् योहान बाप्तिस्मा देणाऱ्यान हे साक्ष देलं, “मी देवाच्या आत्म्याले कबुतराच्या रुपात अभायातून उतरताने पायलं, अन् तो त्याच्यावर थांबला. 33अन् मी तर त्याले ओयखत नाई होतो, पण ज्यानं मले पाण्यानं बाप्तिस्मा द्यायले पाठवलं, त्यानचं मले म्हतलं, ज्याच्यावर तू देवाच्या आत्म्याले उतरलेलं अन् थांबलेलं पायशीन. तोच पवित्र आत्म्यान बाप्तिस्मा देणारा हाय. 34अन् मी पायलं अन् खरोखर तुमाले सांगतो कि हाचं देवाचा पोरगा#1:34 देवाचा पोरगा येशूला अती मुख्य पदाच्या रुपात म्हतल्या गेला हाय, हाय.”
येशूचे पयले शिष्य
35दुसऱ्या दिवशी योहान बाप्तिस्मा देणारा अन् त्याच्या शिष्याय मधून दोघं जन उभे झाले होते. 36अन् त्यानं येशूवर तो जो चालला होता, त्याच्याकडे पाऊन म्हतलं, “पाहा, हा देवाचा मेंढरू हाय.” 37तवा ते दोघं शिष्य त्याचं आयकून येशूच्या मांग निघाले. 38येशूनं पलटून व त्यायले मांग येतांना पाऊन त्यायले म्हतलं, “तुमी कोणाले पाऊन रायले?” त्यायनं त्याले म्हतलं, “हे गुरुजी तू कुठी रायत.” 39येशूनं त्यायले म्हतलं, “चलसान, तवा पायसान.” तवा त्यायनं येऊन त्याची रायाची जागा पायली, अन् त्या दिवशी ते त्याच्या संग रायले; अन् तो जवळपास दुपारी चार वाजताचा वेळ होता. 40त्या दोघायतून जे योहानाची गोष्ट आयकून येशूच्या मांग चालू लागले होते, त्याच्यातून एक शिमोन पतरसचा भाऊ आंद्रियास होता. 41आंद्रियासन पयले आपल्या सक्खा भाऊ शिमोनले भेटून त्याले म्हतलं, “आमाले ख्रिस्त म्हणजे देवाचा अभिषिक्त सापडला हाय.” 42आंद्रियासन शिमोनले येशूच्या जवळ आणलं, येशूनं त्याच्याकडे पावून म्हतलं, “तू योहानाचा पोरगा शिमोन हायस तुले कैफा म्हणजे पतरस म्हणतीन.” 43दुसऱ्या दिवशी येशूनं गालील प्रांतात जायचा विचार केला, अन् फिलिप्पुसले भेटून म्हतलं, “माह्ये शिष्य बण्यासाठी माह्य अनुकरण कर.” 44फिलिप्पुस, हा आंद्रियास, अन् पतरसच्या नगर बेथसैदा शहराचा रायणारा होता. 45फिलिप्पुसन नथनीयेलले भेटून त्याले म्हतलं, “ज्याच्या बाऱ्यात मोशेच्या नियमशास्त्रात अन् भविष्यवक्तायन जे लिवलं हाय, ते आमाले भेटलं, तो योसेफाचा पोरगा नासरत नगराचा येशू हाय.” 46नथनीयेलन त्याले विचारलं, “काय कोणती चांगली वस्तु नासरत नगरातून निगु शकते?” फिलिप्पुसन त्याले म्हतलं, “माह्या संग येऊन पावून घे.” 47येशूनं नथनीयेलले आपल्या इकडे येतांना पाऊन, त्याच्या विषयात म्हतलं, “पाहा, हा खरचं इस्राएलचा इमानदार माणूस हाय, याच्यात कपट नाई.” 48नथनीयेलन त्याले विचारलं, “तू मले कसं ओयखत?” येशूनं त्याले उत्तर देलं, “याच्या पयले कि फिलिप्पुसन तुले बलावलं, जवा तू अंजीराच्या झाडाच्या खाली होता, तवा मी तुले पायलं होतं.” 49नथनीयेलन त्याले म्हतलं, “हे गुरुजी, तू देवाचा पोरगा हाय, तू इस्राएल देशाचा महाराज हाय.” 50येशूनं त्याले म्हतलं, “मी जे तुले म्हतलं, कि मी तुले अंजीराच्या झाडा खाली पायलं, म्हणून तू विश्वास करत काय; तू याच्याऊन पण मोठे-मोठे काम पायशीन.” 51मंग त्याले म्हतलं, “कि मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि तुमी स्वर्गाले उघडलेल, अन् देवाच्या देवदूतायले वरते जातान अन् मी, माणसाच्या पोराच्या वरती उतरताने पायसान.”
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.