युहन्ना भूमिका

भूमिका
योहानाची सुवार्था भूमिका योहानान लिवलेली सुवार्था, मी येशूले देवाच्या न सरणाऱ्या वचनाच्या रुपात समोर मांडल्या गेला हाय, ज्यानं देहधारी होऊन आमच्यात त्यानं वस्ती केली. या पुस्तकामध्ये सपा सांगतल हाय कि हि सुवार्था, यासाठी लिवल्या गेली हाय कि वाचणाऱ्यायन त्याच्यावर विश्वास केला पायजे, कि प्रतिज्ञा तर तारणारा अर्थात देवाचा पोरगा हाय. अन् ते येशूवर विश्वासाच्या व्दारे जीवन भेटलं पायजे 20:31 भुमिकेमध्ये येशूले देवाच्या न सरणाऱ्या अनंत वचनाच्या रुपात दाखवल्या गेलं हाय, याच्या पयले सुवार्थाच्या पयल्या भागात सात चमत्कार अन् चिन्हायच्या बाऱ्यात हाय, त्यानं हे प्रगट होते कि, येशू प्रतिज्ञाचा तारणारा म्हणजे देवाचा पोरगा हाय, दुसऱ्या भागात उपदेश हाय, अन् त्याच्यात हे समजावल्या गेलं हाय कि चमत्कारा अर्थ काय हाय. या भागात हे सांगतलल्या गेलं कि काई, लोकायन येशूवर विश्वास केला. व त्याचे शिष्य बनून गेले, जवा दुसऱ्या लोकायन त्याचा विरोध केला, अन् विश्वास कऱ्यासाठी नाकार केला. 13-17 अध्याय मध्ये येशूले पकडल्या जायाच्या पयल्या राती, येशूची त्याच्या शिष्याय संग घनिष्ट सहभागीता, अन् वधस्तंभावर चढव्याच्या पयल्या संध्याकाळी शिष्यायले तयार करणे, अन् त्यायले प्रोत्साहित करणारे येशूचे वचनाचे विस्तार पूर्ण वर्णन हाय. आखरीच्या अध्याय मध्ये येशूला पकडने अन् मुकदमे, त्याले वधस्तंभावर चढवणे अन् रोयल्या जाणे, पुनरुत्थान, पुनरुत्थानाच्या नंतर शिष्यायवर प्रगट होण्याचा वर्णन हाय.
योहान ख्रिस्ता व्दारे कधीही न सरणारा जीवनाच्या दानावर जोर देते. हा एक असा दान हाय, जे आता सुरु होते, अन् त्यायले प्राप्त होते, जे येशूले एक रस्ता अन् सत्य अन् जीवन हाय या रुपात स्वीकार करतात. आत्मिक गोष्टीला दाखव्यासाठी रोजच्या जीवनाचा साधारण वस्तुले प्रतीकाच्या रुपात प्रयोग हे योहानाची एक प्रमुख विशेषता हाय, जसं पाणी, भाकर, ज्योती, मेंढपाळ अन् त्याचे मेंढरं, अंगुराचा वेल अन् त्याचं फळ.
रूप-रेखा :
भूमिका 1:1-18
योहान बाप्तिस्मा देणारा अन् येशूचे पयला शिष्य 1:19-51
येशूची जनसेवा 2:1-12:50
यरुशलेम आखरीचे दिवस 13:1-19:42
प्रभूचे पुनरुत्थान अन् त्याचे दिसणे 20:1-31
उपसंहार : गालीलात परत दिसणे 21:1-25

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录