लुका 11

11
प्रार्थनाची शिकवण
(मत्तय 6:9-15)
1एक दिवस येशू एका ठिकाणी प्रार्थना करून रायला होता, अन् जवा प्रार्थना झाली, तवा त्याच्या शिष्यायतून एकानं त्याले म्हतलं, “हे प्रभू, जसं योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने आपल्या शिष्यायले प्रार्थना कऱ्याले शिकवलं, तसचं आमाले पण शिकव.” 2तवा त्यानं त्यायले म्हतलं, “जवा तुमी प्रार्थना करसान, तवा असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातल्या देवबापा, तू जो स्वर्गात हायस, तुह्यालं नाव पवित्र मानलं जावं. तुह्यालं राज्य येवो 3आमची दिवसभऱ्याची भाकर रोज आमाले देत जा, 4अन् आमी जे पाप केलं हाय, त्याची आमाले क्षमा दे, कावून कि आमी पण आमच्या अपराध्यायले क्षमा करतो, अन् आमाले परीक्षेत पाडू नको, पण सगळ्या सैतानापासून वाचव.”
मांगत राहा
(मत्तय 7:7-11)
5आणखी येशूनं त्यायले म्हतलं, “समजा तुमच्याईत कोणता असा हाय, कि त्याले एक दोस्त हाय अन् तो अर्ध्याराती त्याच्या घरी जाऊन त्याले म्हणते, हे दोस्ता मले तीन भाकरी उसन्या दे. 6कावून कि, माह्या एक दोस्त प्रवास करून माह्याल्या जवळ आला हाय, अन् त्याले वाढ्याले माह्याल्या पासी काई नाई हाय. 7अन् तुह्या दोस्त तुले अंदरून उत्तर देते, मले तरास देऊ नको, आता दरवाजा लावला हाय, अन् माह्याले लेकरं बाकरं माह्यापासी रजईत हायत, म्हणून मी उठून तुले देवू शकत नाई. 8मी तुमाले सांगतो, जरी तो तुह्या दोस्त असून पण तुह्यासाठी उठून देत नशीन, तरी पण तुह्या लाज सोडून आग्रहाने मांगतल्यामुळे तो उठून तुले जितक्याची गरज हाय तितके तुले देईन. 9अन् मी तुमाले सांगतो, मांगसान तर तुमाले देलं जाईन, पायसान तर तुमाले सापडीन, ठोकसान तर तुमच्यासाठी उघडलं जाईन, 10कावून कि जो कोणी मांगते त्याले मिळते, अन् जो कोणी शोधते त्याले सापडते, अन् जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईन. 11-12तुमच्याईत असा कोणता बाप हाय, कि जवा त्याच्या पोरगा भाकर मांगीण तर तो त्याले दगड देईन? अशाचं प्रकाराने त्याचा पोरगा मासोई मांगणार तर बदल्यात त्याले सर्प देईन? जर अंडे मांग न तर इंचू देईन? 13जर तुमी बेकार असूनहि तुमी तुमच्या लेकरायले चांगली वस्तु देता, तवा तुमच्या स्वर्गातला देवबाप आपल्या मांगणाऱ्यायले पवित्र आत्मा कावून नाई देईन.”
येशू अन् भुत आत्म्यायचा सरदार
(मत्तय 12:22-30; मार्क 3:20-27)
14मंग त्यानं एका मुक्या भुत आत्म्याले काढलं, जवा भुत आत्मा निगाली, तवा तो मुका बोलू लागला, तवा लोकायन आश्चर्य केलं. 15पण त्यायच्यातल्या कईकायनं म्हतलं, “हा तर भुत आत्म्याच्या सरदार सैतानाच्या ताकतीने भुतायले काळतो.” 16अन् दुसऱ्या कईकायनं त्याची परीक्षा पाह्यासाठी स्वर्गातलं चिन्ह चमत्काराची मांग केली. 17तवा येशूनं त्यायच्या मनातली गोष्ट ओयखून त्यायले म्हतलं, “ज्या-ज्या राज्यात फुट पडते, ते राज्य ओसाड पडते, तसचं ज्या-ज्या घरात फुट पडते ते घर नाश हून जाते. 18अन् जर सैतान आपल्याचं विरोधात होईन, तर त्याचं राज्य कसं ठिकीन? कावून कि तुमी माह्याल्या बद्दल म्हणता, कि हा सैतानाच्या साह्यानं भुत काढते. 19अन् मी जर सैतानाच्या साह्याने भुत आत्म्यायले काढतो, तर तुमचे लोकं कोणाच्या साह्याने काढते, म्हणून तेच तुमचे न्याय करतीन. 20पण जर मी देवाच्या सामर्थ्यान भुत आत्म्याले काढत अशीन, तर देवाचं राज्य तुमच्यापासी आलं हाय. 21जर बलवान माणूस अवजार घेऊन आपल्या घराची रखवाली करते, तवा त्याची संपती सुरक्षित रायते. 22पण त्याच्याहूनहि ताकतवान माणूस त्याच्यावर चढाई करून त्याले जिकते, अन् त्याचे ते हथियार ज्याच्यावर त्याले भरोसा होता ते हिसकावून घेईन अन् त्याची संपत्ती लुटून वाटून देते. 23जो माह्याल्या संग नाई, तो माह्याल्या विरोधात हाय, अन् जो माह्याल्या संग गोळा करत नाई तो पसरवतो.”
भुत आत्म्याले घराचा शोध
(मत्तय 12:43-45)
24“जवा भुत आत्मा माणसातून निघून जाते, तवा ते सुख्या जागेत आराम पायाले फिरते पण भेटत नाई, तवा ते स्वताले म्हणते कि मी ज्या माणसातून बायर आली हाय त्याचं माणसात वापस जाईन. 25अन् ते त्या माणसाच्या शरीराले त्या घरा सारखं पायते जे साप सपा केलं हाय. 26तवा ते भुत आत्मा जाऊन आपल्या संग अजून सात भुत आत्म्यायले घेऊन येते, अन् त्या माणसात बसून तती रायते तवा त्या माणसाची दशा मांगच्या दशेपेक्षा पण बेकार होऊन जाते. तसचं या काळाच्या बेकार लोकायची दशा पण अशीच होईन.” 27जवा येशू ह्या गोष्टी बोलून रायलाच होता, तवा लोकायच्या गर्दीतून कोणत्या एका बाईनं मोठ्यानं बोलून म्हतलं, “धन्य ती बाई जिने तुले जन्म देला अन् तुले दुध पाजला.” 28येशूनं म्हतलं, “हो, हे खरं हाय, पण धन्य ते हायत जे देवाच वचन आयकतात अन् मानतात.”
स्वर्गीय चिन्ह मागण
(मत्तय 12:38-42; मार्क 8:12)
29जवा मोठी गर्दी त्याच्यापासी जमा होऊन रायली होती तवा येशूनं म्हतलं, “ह्या पिढ्यातल्या लोकायले चमत्कार नाई मांग्याले पायजे, मी तुमाले खरं सांगतो कि ह्या पिढीले योना भविष्यवक्त्याचं चमत्कार सोडून दुसरं कोणता चमत्कार मुळींच देलं जाणार नाई. 30कावून कि जसा योना भविष्यवक्ता नीनवे शहराच्या लोकायसाठी चिन्ह झाला, तसा माणसाचा पोरगा ह्या युगाच्या लोकायसाठी चिन्ह होईन, 31दक्षिण दिशेची राणी न्यायाच्या दिवशी या युगाच्या लोकाय संग उठून त्यायले दोषी ठरविन, कावून कि ते सुलैमानचं ज्ञान आयक्यासाठी लय दुरून आली, अन् पाहा, अती जो हाय तो शलमोनहून पण मोठा हाय, पण तरी तुमी पश्चाताप कऱ्याले नाकारता. 32नीनवे शहरातले रायणारे लोकं न्यायाच्या दिवशी या काळातल्या लोकाय संग उठून त्यायले दोषी ठरवतीन, कावून कि त्यायनं योनाचा प्रचार आयकून मन फिरवलं, अन् पाहा, जो अती हाय तो योना भविष्यवक्त्याहून मोठा हाय पण तरी तुमी पश्चाताप कऱ्याले नाकारता.”
शरीराचा दिवा
(मत्तय 5:15; 6:22-23)
33“कोणी माणूस दिवा लावून कटोऱ्याखाली ठेवत नाई, पण दिव्याले टेबलावर ठेवतात, कावून की त्याचा ऊजीळ सगळ्या इकडे पळला पायजे. 34तुह्याल्या शरीराचा दिवा तुह्या डोया हाय, म्हणून जर तुह्याला डोया शुद्ध हाय, तवा तुह्यालं सर्व शरीर पण ऊजीळमय होईन, पण ते जर बेकार अशीन तर शरीर पण अंधारमय असते. 35म्हणून सावध राहा, कि जो ऊजीळ तुह्यात हाय, तो अंधारमय न हून जावं. 36म्हणून जर तुह्य सर्व शरीर ऊजीळमय हाय, अन् त्याच्या कोणताही भाग अंधारमय नाई हाय, तवा सर्वाच्या सर्व शरीर असा ऊजीळमय होईन, जसा एक दिवा आपल्या ऊजीळान तुले ऊजीळ देते.”
नियमशास्त्राचे शिक्षक अन् परुशीले दाटने
(मत्तय 23:1-36; मार्क 12:38-40; लूका 20:45-47)
37जवा तो बोलून रायला होता, तवा एका परुशी माणसाने त्याले आपल्या संग जेव्यासाठी बशाची विनंती केली, तवा तो त्याच्या घरी अंदर जाऊन जेव्याले बसला. 38अन् परुशी माणसाने हे पाऊन आश्चर्य वाटलं, कि तो हात-पाय, न धुता जेवण कराले बसला. 39तवा प्रभू येशूनं त्याले म्हतलं, “परुशी लोकायनो तुमी असे भांडे हा जे बायरून तर साप हाय पण अंदरून अजून खराब हा म्हणजे तुमी स्वताले चांगल्या लोकायसारखे दाखविता पण तुमच्या मनात लोभ अन् स्वार्थ भरलेले हाय. 40हे मुर्खानो, ज्यानं बायरचा भाग बनवला, त्यानचं अंदरचा भाग पण बनवला हाय. 41पण अंदरच्या वस्तुले दान करून टाका, मंग पाहा तुमच्यासाठी सर्व्या वस्तु शुद्ध हून जातीन.” 42“पण हे परुशी लोकायनो, तुमच्यावर धिक्कार! कावून कि तुमी पुदिना अन् सुदाबचा अन् सर्व्या प्रकारच्या भाज्याचां दहावा भाग देता, पण न्यायले अन् देवाच्या प्रेमाले बाजूनं टाकून देता, पण तुमाले ह्या पण गोष्टी करायले पायजे होत्या, अन् त्या पण गोष्टी सोडायच्या नोत्या. 43हे परुशी लोकायनो तुमच्यावर हाय, कावून कि तुमी धार्मिक सभास्थानात मुख्य जागी अन् बजाराईत नमस्कार घेणं तुमाले आवडते. 44तुमची एवढी दुर्दशा होईन कावून कि तुमी त्या लपलेल्या कबरेच्या सारखे हा, ज्याच्यावर लोकं चालतात पण त्यायले माईत नाई.” 45तवा एका मोशेच्या नियमशास्त्राचा शिक्षकायनं त्याले उत्तर देऊन म्हतलं, “हे गुरुजी या गोष्टी बोलून तुमी आमचा कायले अपमान करू रायले हा?” 46तवा येशूनं म्हतलं, “हे मोशेच्या नियमशास्त्राचा शिक्षक, तुमच्यावर पण हायहाय! तुमी असं वजन ज्याले उचलनं कठीण हाय, ते माणसावर टाकता, पण तुमी त्याले बोट पण लावत नाही. 47तुमच्यावर धिक्कार! तुमी त्या भविष्यवक्त्याचे कबरे बनवता, ज्यायले तुमच्या बापायन मारून टाकले होते. 48म्हणून तुमी साक्षी हा, अन् आपल्या बाप दाद्यांच्या कर्मावर सहमत होता. कावून कि त्यायनं तर त्यायले मारून टाकलं होतं, पण तुमी त्यायच्याचं कब्रा बनवता. 49म्हणून देवाच्या बुद्धीने पण म्हतलं हाय, कि मी त्यायच्यापासी भविष्यवक्त्यायले अन् नेमलेल्या प्रेषितायले पाठवतो, अन् ते त्यायच्यातून कईकायले मारतीन अन् कईकायले तरास देतीन. 50कावून कि ज्या भविष्यवक्त्यायचं रक्त या जगाच्या उत्त्पतीच्या पयले सांडवल्या गेलं होतं, त्या सऱ्याचां हिशोब या युगाच्या लोकायपासून घेतला जाईन. 51हाबिलाच्या हत्येपासून तर जखऱ्या भविष्यवक्ताच्या हत्ये परेंत जे वेदी अन् देवळाच्या मधात मारल्या गेले, मी तुमाले खरं सांगतो, त्यायचा लेखा या काळाच्या लोकायपासून घेतला जाईन. 52हाय तुमी मोशेच्या नियमशास्त्राचा शिक्षक! कावून कि तुमी ज्ञानाची किल्ली तर घेऊन घेतली, पण तुमी सोता आत गेले नाई, अन् दुसऱ्या प्रवेश करणाऱ्यायले पण थांबवता.” 53जवा त्यानं ह्या गोष्टी त्यायले सांगतल्या तवा तो ततून निगाला, तवा मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् परुशी लोकं त्यायच्या लय मांग लागले अन् बऱ्याचं गोष्टीच्या बाऱ्यात वादविवाद करू लागले अन् त्यायले प्रश्न विचारू लागले. 54तवा ते टपून होते, कि येशूच्या तोंडातून निघालेली कोणती तरी गोष्ट पकडावी.

目前选定:

लुका 11: VAHNT

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录