लुका 10

10
सत्तर शिष्यायले पाठवन
1या गोष्टी नंतर प्रभू येशूनं अजून सत्तर जनायले निवडलं, अन् ज्या-ज्या नगरात व ज्या-ज्या ठिकाणी तो स्वता जाणार होता, तती त्यायले दोघा-दोघायची जोडीने आपल्या पयले पाठवलं. 2तवा त्यानं आपल्या शिष्यायले म्हतलं, “जसे शेतीत पीकं लय असते; तसेच लोकं लय हायत जे देवाच्या संदेश आयक्याले तयार हायत, पण देवाच्या राज्याच्या बाऱ्यात सांगणारे लोकं कमी हायत, म्हणून वावराच्या मालकाले प्रार्थना करा, कि तो आपल्या वावरातले पीकं काढ्यासाठी मजुरायले पाठवावे. 3जा; पाहा मी तुमाले जंगली लांडग्या मधे मेंढरासारखे पाठवतो. 4म्हणून संग थयली पण नका घेऊ, अन् आपल्या खिशात पैसे पण नका घेऊ, आपल्या पायात चप्पल पण नका घेऊ, अन् रस्त्यानं कोणाले नमस्कार नका करू. 5-6अन् ज्या कोण्या घरात जासान त्या घरच्या लोकायले आशीर्वाद देजा. त्या घरचे लोकं तुमाले स्वीकारतीन तर तुमचं आशीर्वाद त्यायच्यावर जाईन, पण जर ते तुमाले स्वीकार करतीन नाई तर तुमचा आशीर्वाद त्यायच्या पासून वापस येईन. 7अन् तुमी त्याचं घरी रायसान ते देतीन ते खासान पेसान कावून कि लोकं तुमाले द्याले पायजे ज्याची तुमाले आवशक्ता हाय; घरोघरी फिरू नका. 8अन् ज्या गावात तुमी जासानं अन् ततचे लोकं तुमचे स्वागत करतीन, तवा ते जे-जे तुमच्या समोर जेव्याले देतीन तेच खासान. 9अन् ततच्या बिमार लोकायले चांगलं करसान, अन् त्यायले सांगजा कि देवाचं राज्य तुमच्यापासी आलं हाय, 10पण तुमी ज्या गावात जासानं, अन् ततचे लोकं तुमाले ग्रहण करत नसतीन तर त्यायले बजारात जाऊन म्हणा, 11तुमच्या गावाच्या धुंळ्या पण, जे आमच्या पायाले लागला हाय, ते आमी तुमच्या समोर झटकून टाकतो, तरी हे जाणून घ्या कि देवाचं राज्य तुमच्यापासी आले हाय, 12पण मी तुमाले सांगतो, ज्या दिवशी देव न्याय करीन तवा तुमची दशा सदोम शहराहून पण भयंकर होईन.”
मन नाई फिरवण्या वाल्यावर हाय
(मत्तय 11:20-24)
13“हाय खुराजीन नगराच्या लोकायनो, तुमचा धिक्कार असो, हे बेथसैदा शहराच्या लोकायनो जे चमत्काराचे काम तुमच्यात झाले होते, ते जर सूर अन् सैदा नगरात झाले असते तर त्यांनी पयलेच तरट ओडून अन् राखोंडीवर बसून पश्चाताप केला असता. 14पण मी तुमाले सांगतो, ज्या दिवशी देव न्याय करीन तवा तुमची दशा सूर सैदा नगराहून पण भयंकर होईन. 15हे कफरनहूम शहराचे लोकायनो काय तुमाले स्वर्गात आदर भेटन, तुमी तर नरकात खाली पाडले जासान. 16जो तुमचे आयकतो, तो माह्य आयकतो, अन् जो तुमाले नकारते, तो मले नकारते, अन् जो मले नकारते तो ज्यानं मले पाठवलं त्याले नकारते.”
सत्तर शिष्यायचं वापस येणं
17नंतर ते सत्तर शिष्य आनंदाने वापस येऊन म्हणाले, “हे प्रभू, भुत आत्म्यायन पण आमची गोष्ट आयकली जवा आमी त्यायले तुह्या नावान आदेश देला.” 18तवा येशूनं त्यायले म्हतलं, “मी सैतानाले अचानक विजे सारखं स्वर्गातून पडतानं पायलं. 19पाहा, मी तुमाले सर्पाले अन् इचूले तुडवण्याचा, अन् वैऱ्याच्या सऱ्या सामर्थवर अधिकार देला हाय, अन् कोणत्याही वस्तुनं तुमची हानी नाई होईन. 20तरी पण याच्यात आनंद करू नका, कि भुत आत्मा तुमचा आदेश आयकतात, पण याच्यात आनंद करा कि स्वर्गात तुमचं नाव लिवलेल हाय.”
पोराकडून बापाले प्रगट करणे
(मत्तय 11:25-27; 13:16-17)
21त्याचं वाक्ती येशूने पवित्र आत्म्यात आनंदात केला, अन् म्हतलं, “हे देवा अभाय अन् पृथ्वीच्या प्रभू मी तुह्याला धन्यवाद करतो, कि तू या गोष्टी ज्ञानी अन् समजदार लोकायपासून लपवून ठेवल्या, अन् आपल्या लेकरायवर प्रगट केल्या हायत, हो, माह्याल्या देवबापा, तुले हेच चांगलं वाटलं. 22माह्याल्या देवबापान मले सगळे अधिकार सोपून देले हाय, अन् कोणी पोराले ओयखत नाई, फक्त देवबापच, अन् कोणी बापाले ओयखत नाई, फक्त पोरगाच, अन् तो ज्याच्यावर पोराले प्रगट कराची इच्छा हाय. 23तवा त्यानं शिष्याकडे फिरून एकट्यात म्हतलं, धन्य हायत ते डोये जे ह्या गोष्टी पायतात. 24कावून कि मी तुमाले सांगतो, लय भविष्यवक्त्यांनी अन् राजे लोकायन इच्छा ठेवली, की ज्या गोष्टी तुमी पायता, ते त्यायनं पण पहाव, पण पाऊ शकले नाई, अन् ज्या गोष्टी तुमी आयकता, त्यायनं पण आयकावे, पण आयकू शकले नाई.”
एक चांगल्या सामरीची कथा
25एक दिवस जवा येशू लोकायले शिकवून रायला होता तवा एक मोशेच्या नियमशास्त्राचा शिक्षक उभा झाला अन् हे म्हणून येशूची परीक्षा करायले लागला, “हे गुरुजी, अनंत जीवन भेट्याले मी काय करू?” 26मंग येशूनं त्याले म्हतलं, “मोशेच्या नियमशास्त्रात काय लिवलेल हाय? तू ते कसं समजतो?” 27तवा त्यानं उत्तर देऊन म्हतलं, “तू प्रभू, आपल्या देवाले आपल्या सर्व्या मनान अन् आपल्या सर्व्या जीवानं अन् आपल्या सर्व्या शक्तीन अन् आपल्या बुद्धीनं प्रेम कर अन् आपल्या सोतावर जसं प्रेम करतो तसचं आपल्या शेजारच्यावर पण प्रेम कर.” 28मंग येशूनं त्याले म्हतलं, “तू बरोबर उत्तर देलं हाय, हेच कर म्हणजे तुले अनंत जीवन भेटन.” 29पण त्यानं हे सोताले न्यायवान होयाच्या इच्छेन, येशूले विचारलं, “तर माह्याल्या शेजारी कोण.” 30येशूनं उत्तर देऊन म्हतलं, “एक माणूस यरुशलेम शहरातून यरीहो शहरात जाऊ रायला होता, पण डाकूंच्या घेऱ्यात तो सापडला, तवा त्यायनं त्याचे कपडे काडून त्याले मारपीट करून अधमुस करून ते सोडून गेले. 31अन् असं झालं, कि त्याचं रस्त्यानं एक याजक जाऊ रायला होता, तवा त्यानं त्याले तो पाऊन दुसऱ्या बाजूनं निघून गेला. 32अन् तसाचं एक लैवी त्या ठिकाणी आल्यावर, त्याले पाऊन दुसऱ्या बाजूनं निघून गेला. 33तवा एक सामरी प्रांताचा माणूस प्रवास करत असतांना त्या ठिकाणी आला अन् त्याले पाऊन दया आली. 34अन् त्याच्यापासी येऊन अन् त्याच्या जखमांवर किंमती तेल अन् अंगुराचा रस ओतून त्यावर पट्टी बांधली अन् त्याले आपल्या गध्यावर बसून सरायात आणलं, अन् त्याची सेवा केली, 35अन् दुसऱ्या दिवशी जवा तो निघून रायला होता तवा त्यानं, दोन दिनार (जवळपास दोन दिवसाची मजुरी) त्या सरायाच्या घरधन्याले देल्या, अन् म्हतलं, याची सेवा करजोक अन् जे काई तू खर्च करशीन ते मी तुले वापस येतान देऊन देईन. 36आता तुह्या विचारानं, या तिघांयतुन त्याच्या शेजारी कोण झाला?” 37तवा त्यानं म्हतलं, “तोच ज्यानं त्याच्यावर दया केली होती.” तवा येशूनं त्याले म्हतलं, “तू जाऊन तसचं कर.”
मार्था अन् मरिया
38जवा येशू अन् त्याचे शिष्य जाऊ रायले होते, तवा ते एका गावात गेले, तवा मार्था नावाच्या बाईनं त्याले आपल्या घरात त्याचे स्वागत केले. 39अन् मरिया नावाची तिची एक बहिण होती, ते पण प्रभूच्या पायापासी बसून त्याचं बोलणं आयकतं होती. 40पण मार्था सेवा करता-करता चिंतेत पडली अन् येशू पासी येऊन म्हणाले लागली, “हे गुरुजी, माह्या बहिणीन मले सेवा कऱ्यासाठी एकटीलेचं सोडलं हाय, तिले म्हण कि माह्यावाली मदत कर.” 41तवा येशूनं उत्तर देऊन म्हतलं, “मार्था हे मार्था तू बऱ्याचं गोष्टीची चिंता कावून करते अन् का घाबरतं. 42पण एक गोष्ट अवश्य हाय, अन् त्या उत्तम भागाले मरियानं निवडलं हाय: ते तिच्यापासून हिसकावलं नाई जाईन.”

目前选定:

लुका 10: VAHNT

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录