तवा त्यानं आपल्या शिष्यायले म्हतलं, “जसे शेतीत पीकं लय असते; तसेच लोकं लय हायत जे देवाच्या संदेश आयक्याले तयार हायत, पण देवाच्या राज्याच्या बाऱ्यात सांगणारे लोकं कमी हायत, म्हणून वावराच्या मालकाले प्रार्थना करा, कि तो आपल्या वावरातले पीकं काढ्यासाठी मजुरायले पाठवावे.