लुका 9
9
बारा शिष्यायले पाठवणे
(मत्तय 10:5-15; मार्क 6:7-13)
1मंग येशूनं आपल्या बारा शिष्यायले आपल्यापासी बलावलं अन् त्यायले भुत आत्मा काढ्याचा अन् बिमारीले दूर कऱ्याचा सामर्थ अन् अधिकार देला. 2मंग येशूनं आपल्या बारा शिष्यायले आपल्यापासी बलावलं अन् त्यायले देवाच्या राज्याच्या प्रचार कराले, अन् बिमारायले चांगलं कराले पाठवलं. 3येशूनं शिष्यायले म्हतलं, “रस्त्यान जातान सोबत काई घेऊ नका: संग थयली पण नका घेऊ, भाकर पण नका घेऊ, आपल्या खिशात पैसे पण नका घेऊ अन् दोन मनिले पण नका घेऊ.
4ज्या कोण्या घरी तुमाले आमंत्रण करीन, जोपरेंत तुमी त्या गावात रायता, तोपर्यंत त्याचे पावने बनून राहा. अन् ततूनच दुसरी कडे जा. 5जे कोणी तुमचं स्वागत करत नाई, तवा त्या गावातून निग्याच्या वाक्ती आपल्या पायाचा धुल्ळा पण ततीच झटकवा, ह्या साठी कि त्यायच्या विरुद्ध साक्ष व्हावी.” 6तवा ते निगाले अन् गावगावी सऱ्या इकडे सुवार्था प्रचार करून, लोकायले चांगले करत फिरले.
हेरोद राजाच घाबरण
(मत्तय 14:1-12; मार्क 6:14-29)
7अन् हेरोद राजा येशूच्या कामाच्या बाऱ्यात आयकून भेला, कावून कि कईक लोकं असं म्हणत होते, कि योहान बाप्तिस्मा देणारा मेलेल्यातून जिवंत झाला हाय. 8अन् अजून काई लोकायन म्हतलं, की हा एलिया भविष्यवक्ता देवाचा संदेश देणारा हाय, व अजून काई लोकायन म्हतलं, की भविष्यवक्त्याय मधून कोणी तरी जिवंत झाला हाय. 9पण हेरोद राजानं हे आयकून म्हतलं, “योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचं तर मी मुंण्डक कापलं होतं, पण आता हा कोण हाय ज्याच्या बाऱ्यात अश्या गोष्टी आयकतो?” तवा त्यानं येशूले पायण्याची इच्छा केली.
पाच हजार लोकायले जेवण देणं
(मत्तय 14:13-21; मार्क 6:30-44; योहान 6:1-14)
10तवा प्रेषित वापस येशू पासी येऊन एकत्र झाले, अन् त्यायनं जे काई केलं होतं ते-ते सर्व येशूले सांगतल, तवा त्यानं त्यायले आपल्या संग बेथसैदा शहरात घेऊन गेला. 11हे आयकल्यावर लोकायची गर्दी त्याच्या मांग गेली, अन् येशू आनंदाने त्यायले भेटला, अन् देवाच्या राज्याच्या बाऱ्यात बोलू लागला, अन् ज्यायले चांगलं व्हायचं होतं त्यायले चांगलं करत होता. 12त्याचदिवशी जवा दिवस डुबून रायला होता, तवा त्याचे बारा शिष्य त्याच्यापासी आले, अन् म्हतलं “हे सुनसान जागा हाय अन् दिवस लय डुबला हाय. त्या लोकायले जाऊ दे, की ते आजूबाजूच्या खेड्यापाड्यात जाऊन, आपआपल्या साठी खायाले काई विकत घेतील, अन् राहायले जागा पायतीन, कावून कि आपण जंगलातल्या जागी हाओ.”
13पण त्यानं त्यायले म्हतलं, “तुमीच त्यायले जेव्याले द्या,” तवा त्यायनं म्हतलं, “आमच्यापासी पाच भाकरी अन् दोन मासोया पेक्षा जास्त नाई, जर आमाले या सगळ्या लोकायले जेवण द्यायचं हाय, तर आमाले जेवण विकत घ्यायले जावं लागीन, तवा होऊ शकते.” (कावून कि तती गर्दीत जवळपास पाच हजार माणसं होते) 14तवा येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, “त्यायले पन्नास-पन्नासच्या पंगतीनं बसवा.”
15त्यायनं तसचं केलं, अन् सऱ्या जनायले बसवलं, 16तवा येशूनं त्या पाच भाकरी अन् दोन मासोया घेतल्या, अन् स्वर्गाकडे पाऊन देवाले धन्यवाद देला, अन् त्या तोडून लोकायले वाढ्यासाठी शिष्यायपासी देल्या. 17तवा ते सरेझण जेवण करून तृप्त झाले, अन् उरलेल्या तुकड़्याचे बारा टोपल्या भरून उचलून घेतल्या.
पतरसच येशूले ख्रिस्त म्हणून स्वीकारण
(मत्तय 16:13-19; मार्क 8:27-29)
18जवा येशू एकांतात प्रार्थना करून रायला होता, अन् शिष्य त्याच्या संग होते, तवा त्यानं शिष्यायले विचारलं, कि “लोकं माह्या बाऱ्यात काय म्हणतात?” 19शिष्यायनं त्याले उत्तर देलं, “योहान बाप्तिस्मा देणारा, कोणी म्हणतात एलिया भविष्यवक्ता देवाचा संदेश देणारा, अन् कोणी म्हणतेत जुन्या काळातल्या भविष्यवक्त्या मधून एक जिवंत झाला हाय.” 20पण येशूनं त्यायले म्हतलं, “तुमी मले काय म्हणता?” तवा पतरसन उत्तर देलं “तू देवापासून पाठवलेला ख्रिस्त हाय.” 21तवा येशूनं शिष्यायले चिताऊन म्हतलं, “माह्या बद्दल कोणाले सांगू नका.”
येशू कडून आपल्या मरणाची भविष्यवाणी
22अन् येशूनं म्हतलं, “माणसाच्या पोराले आवश्यक हाय कि लय दुख भोगावं, अन् यहुदी पुढारी, मुख्ययाजक अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकं त्याले तुच्छ समजून जीवानं मारून टाकतीन, अन् तो तिसऱ्या दिवशी परत जिवंत होईन.”
येशूच्या मांग चाल्याचा अर्थ
(मत्तय 16:21-28; मार्क 8:30-9:1)
23येशूनं सर्वायले म्हतलं, “ज्या कोणाले माह्य अनुकरण कराचं हाय, त्यानं स्वताच्या त्याग करून, दररोज आपला वधस्तंभ उचलावा अन् माह्या मांग यावं. 24कावून कि जो कोणी आपला जीव वाचवायचा इच्छा ठेवतो, तो त्याले गमाविन, पण जो माह्ये शिष्य होयाच्या कारणान आपला जीव गमाविन, तोच त्याले वाचविन. 25जर माणसानं आपल्या इच्छा प्रमाण सगळं मिळवलं अन् शेवटी त्यानं आपल्या जीवाले नाश केलं तर काय फायदा होईन? 26जो कोण माह्या, अन् माह्या वचनाच्या बद्दल लाज धरते; माणसाचा पोरगा पण जवा आपल्या सोताच्या अन् देवबापाच्या अन् पवित्र देवदूताईच्या गौरवानं येईन तवा त्याले पण लाज वाटीन. 27अन् मी तुमाले खरं सांगतो, कि अती उभे असणाऱ्या पैकी, काई जन असे हायत, की जवा पर्यंत देवाचं राज्य सामर्थ्यानिशी आलेले पायतीन नाई तवा पर्यंत ते मरणार नाई.”
मोशे अन् एलियाच्या सोबत येशू
(मत्तय 17:1-8; मार्क 9:2-8)
28ह्या गोष्टी झाल्यावर जवळपास आठ दिवसानंतर येशू पतरस, याकोब अन् योहान यायले प्रार्थना कऱ्याले संग घेऊन एका उंच पहाडावर एकांतात गेला. 29जवा येशू प्रार्थना कराले लागलाच होता, तवा त्याच्या चेहऱ्याचं रूप बदलून गेलं अन् त्याचे कपडे पांढरे अन् चमकदार झाले. 30अन् पाहा, अन् त्यायले मोशे अन् एलिया भविष्यवक्ता दिसला अन् ते दोघं येशू संग बोलतं होते. 31ते गौरवाच्या रूपाने दिसले, अन् त्याच्या मरणाच्या विषयात चर्चा करू रायले होते, जे यरुशलेम शहरात होणार होतं. 32तवा पतरस अन् त्याच्या संग जे होते ते झोपेच्या गुंगीत होते, जवा ते पूर्ण पणे जागी झाले तवा त्यायनं येशूचा तेज अन् जे दोन माणसं त्याच्यापासी उभे होते त्यायले पण पायलं. 33जवा ते त्याच्यापासून जाऊ लागले, तवा पतरसन येशूले म्हतलं, “हे गुरुजी, आमी अती हावो हे चांगलं हाय: तर आमी तीन मंडप बनवतो, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी, एक एलिया भविष्यवक्ता साठी.” कावून कि ते भेले होते म्हणून काय बोलावं हे त्यायले सुचतं नाई जाय. 34तो ह्या गोष्टी बोलत होता, तवा एका ढगानं त्यायच्यावर येवून सावली करू लागला, जवा ते पुऱ्या ढगात समवू लागले तवा ते लय भेले. 35अन् त्या ढगातून आवाज आला “हा माह्याला आवडता पोरगा हाय याचं आयका.” 36तो आवाज झाल्यावर येशूले एकटाचं दिसला, अन् ते चूप रायले, अन् जे काई पायलं होतं, त्यातल्या काईच गोष्टी त्या दिवसात कोणाले सांगतल्या नाई.
पोराले भुत आत्म्यापासून मोकळं करणे
(मत्तय 17:14-18; मार्क 9:14-27)
37अन् दुसऱ्या दिवशी ते पहाडावून उतरल्यावर लोकायची मोठी गर्दी त्याले भेटली. 38तवा लोकायच्या गर्दीमधून एक माणूस जोऱ्यानं आवाज देऊन म्हणाला, “हे गुरुजी, मी तुले विनंती करतो कि माह्याल्या पोरावर कृपादुष्टी कर, कावून कि तो माह्यावाला एकुलता पोरगा हाय. 39अन् पाह्य, एक भुत आत्मा त्याले पकडते, मंग तो एकदमचं कल्ला करते; अन् तो त्याले असं पीडून टाकते कि त्याच्या तोंडात फेस आणते, अन् त्याले खाली आपटून मोठ्या कठीनाईनं सोडून जाते. 40अन् मी तुह्यावाल्या शिष्यायले विनंती केली होती कि त्याच्यातून त्या भुत आत्म्याले काढून टाका, पण त्यायले काढता आला नाई.” 41तवा येशूनं उत्तर देऊन म्हतलं, “हे अविश्वासी लोकं हो मी कुठपरेंत तुमच्या संग रायणार, कुठपरेंत तुमाले वागवणार, त्याले माह्यापासी आणा.” 42मंग तो येऊ रायला होता, तितक्यात भुत आत्मा त्याले खाली आपटून, जोऱ्यानं पीडून टाकलं, पण येशूनं भुत आत्म्याले दटावलं, अन् पोराले चांगलं करून त्याच्या बापाच्या पासी देऊन देलं. 43तवा सरे लोकं देवाच्या महासामर्थ्यान हापचक झाले, पण सरे लोकं, जे काम तो करत होता, आश्चर्य करत होते तवा येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, 44“ह्या गोष्टी तुमी ध्यान देऊन आयका, कावून कि माणसाचा पोरगा माणसाच्या हाती पकडला जाणार हाय.” 45पण शिष्यायले या बोलण्याचा अर्थ समजला नाई, अन् ह्या गोष्टी त्यायच्या पासून लपवून ठेवली कि ते त्याले समजले नाई पायजे, अन् ते त्या बोलण्या बद्दल येशूले विचाऱ्याले भेत होते.
सगळ्यात मोठा कोण?
(मत्तय 18:1-5; मार्क 9:33-37)
46अन् आपल्यात अती मोठा कोण हाय, याच्या बद्दल शिष्यात वादविवाद उठला 47तवा येशूनं त्यायच्या मनातला विचार ओयखून एका लेकराले जवळ घेऊन त्याले आपल्यापासी उभं केलं; 48अन् त्यायले म्हतलं, “जो कोणी माह्या नावान या लेकराले ग्रहण करतो, तो मले ग्रहण करतो, अन् जो कोणी मले ग्रहण करतो तो माह्या पाठवणाऱ्याले पण ग्रहण करतो, कावून कि तुमच्या सर्वात जो कोणी लायन्याऊन लायना हाय, तोच मोठा हाय.”
जो विरोधात नाई तो सोबत हाय
(मार्क 9:38-40)
49योहानान येशूले म्हतलं, “गुरुजी आमी एका माणसाले तुह्या नावाचा उपयोग करून भुत काढताने पायलं, तवा आमी त्याले मना केले, कावून की तो आपला अनुयायी नव्हता.” 50तवा येशूनं त्याले म्हतलं, “त्याले मना करू नका, कावून कि जो आमच्या विरोधात नाई तो आमच्या संग एक हाय.”
यरुशलेम शहरात यात्रा
51जवा येशूची स्वर्गात उचलायची वेळ जवळ आली, तवा त्यानं यरुशलेम शहरात जायचा विचार पक्का केला. 52अन् त्यानं आपल्या समोर संदेशवाहकायले पाठवले, ते सामरी प्रांताच्या लोकायच्या एका गावात गेले, कि त्याच्यासाठी जागा तयार करावं. 53पण त्या लोकायन त्याचा स्वागत केला नाई, कावून तो यरुशलेम शहरात जाऊन रायला होता. 54हे पाऊन त्याचे शिष्य याकोब अन् योहानान म्हतलं, “हे प्रभू, काय तुह्याली इच्छा हाय, तर आमाले आज्ञा दे कि अभायातून आग पाडून त्यायचा नाश करावं, जसं एलिया भविष्यवक्त्याने केलं होतं.” 55तवा येशूनं वळून त्यायले दटावलं, अन् म्हतलं, “तुमाले माईत नाई काय, तुमी कोणत्या आत्म्याचे हा, कावून कि माणसाचा पोरगा लोकायच्या जीवाचा नाश कराले नाई, तर त्यायले वाचव्याले आला हाय.” 56मंग ते दुसऱ्या गावात चालले गेले.
येशूच्या मांग चाल्याचा अर्थ
(मत्तय 8:19-22)
57जवा ते रस्त्यानं जाऊन रायले होते, तवा कोण्यातरी एका माणसानं येशू पासी येऊन म्हतलं, “जती कुठी तू जाशीन तती मी तुह्यावाला शिष्य बनून तुह्यावाल्या मांग येईन.” 58येशूनं त्याले म्हतलं, “कोल्ह्याले तर रायाले बिडे हायत अन् अभायातल्या पाखरायले रायाले खोपे रायते, पण माणसाच्या पोराले रायासाठी जागा नाई.” 59मंग त्यानं दुसऱ्या एकाले म्हतलं, “हे प्रभू मले पयले जाऊ दे कि मी आपल्या बापाले रोऊन येतो, अन् मंग येऊन तुह्यालं अनुकरण करतो.” 60तवा येशूने त्याले म्हतलं, “मुर्द्यायले आपले मुर्दे रोऊ दे, पण तू जाऊन देवाच्या राज्याची सुवार्था सांग.” 61तवा अजून एकाझणानं म्हतलं, “हे प्रभू, मी तुह्या मांग येईन, पण पयले मले माह्या घरच्या लोकायचा निरोप घ्याले जाऊ दे.” 62पण येशूनं त्यायले म्हतलं, “जो कोणी आपला हात नांगरावर ठेऊन मांग पायते तो देवाच्या राज्याच्या लायकीचा नाई.”
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.