लुका 8
8
येशूच्या शिकवणी
1मंग येशू देवाच्या वचनाची शिकवण देत नगर-नगर अन् गाव-गावात हिंडला. अन् देवाच्या राज्याच्या बद्दल सुवार्था सांगत फिरू लागला, अन् ते बारा शिष्य पण त्याच्या सोबत होते. 2अन् काई बाया जे भुत आत्माने अन् बिमारीने मुक्त झाल्या होत्या, अन् त्यायच्यातून एक हाय मरिया जे मगदला गावची होती, जिच्यातून सात भुत आत्मे निघाले होते. 3अन् हेरोद राजाचा खजिनदार खोजाची बायको, योहान्ना अन् सुसन्नाह अन् बऱ्याचं दुसऱ्या बाया, आपल्या पैशातून येशू अन् त्याच्या शिष्यायची सेवा करत होत्या.
बिया पेरणी करणाऱ्याची कथा
(मत्तय 13:1-17; मार्क 4:1-12)
4जवा लय लोकं जमा झाले, अन् गावा-गावातून लोकं त्याच्यापासी येत होते, तवा त्यानं कथेतून सांगतल: 5“पाहा एक शेतकरी आपल्या वावरात बिया पेरणी करायला निघाला: पेरायच्या वाक्ती काई बिया रस्त्याच्या काटावर पडल्या, अन् पायान तुडवल्या गेल्या, अन् अभायातले पाखराईन येऊन खाऊन टाकल्या. 6काई बिया खडकावर पडल्या, तती त्यायले नरम माती नाई मिळाल्यानं, ते लवकर उगवले, जवा सुर्याची गर्मी वाढली तवा ते झाड जळून गेलं.
7काई बिया अशा जागी पडल्या जती काटेरी झाड उगवले होते, पण काटेरी झाडाने ते दाबून टाकले, म्हणून ते वाढू शकले नाई.” 8“अन् काई बिया चांगल्या काळ्या मातीवर पडल्या, अन् ते झाड चांगले उगवले व मोठेहुन काई झाडायले तीसपट, काईले साठपट, काईले शंभरपट पीकं आले.” हे म्हणून त्यानं मोठ्यानं म्हतलं, “ज्या कोणाले माह्यावाला आवाज आयकू येते त्यानं हे समज्याचा प्रयत्न करा.”
कथेचा अर्थ
(मत्तय 13:18-23; मार्क 4:13-20)
9त्याच्या शिष्यायनं त्याले विचारलं, “ह्या कथेचा अर्थ काय हाय?” 10त्यानं म्हतलं, “तुमाले तर देवाच्या राज्याच रहस्य समजून घ्यायची समज देली हाय पण जे लोकं माह्यावर विश्वास नाई करत त्यायच्यासाठी हे सगळ्या गोष्टी कथेतुनच सांगतल्या जातात कि पवित्रशास्त्राच वचन पूर्ण व्हावं. ते दररोज पायतं असतीन पण त्यायले स्पष्ट दिसीन नाई, ते दररोज आयकतं असतीन, पण त्यायले समजीन नाई.”
बिया पेरनाऱ्याची कथेचा अर्थ
11-12“कथेचा अर्थ हे हाय: बिया देवाच वचन हाय. एक शेतकरी जसा बिया पेरतो तसचं पण देवाच वचन पेरतो. काई लोकं त्या रस्त्या सारखे हायत, ज्याच्यावर बिया पळल्या, जवा ते लोकं देवाच वचन आयकतात, तवा सैतान पटकन येते, अन् त्यायले ह्या सगळ्या गोष्टी भुलवून टाकते, असं नाई झालं पायजे कि त्यायनं विश्वास करावं अन् त्यायचं चांगलं व्हावं. 13अन् काई लोकं असे हायत, ज्याची बरोबरी त्या बिया सोबत केली जाऊ शकते, ज्या खळखाळ जमिनीत पडल्या, हे लोकं देवाच्या वचनाले आयकून लवकर स्वीकार करतात. पण ते देवाच्या वचनाले आपल्या मनात मुया पर्यंत वाढू देत नाई, व काई दिवसानं वचनाच्यान त्यायच्यावर परीक्षा किंवा सताव होते, तवा ते लवकरच नाराज होऊन जातात.
14काई बिया काटेरी झाडावर पडल्या, अशा लोकायची बरोबरी काट्याच्या झाडाय बरोबर केली हाय, जवा ते देवाच वचन आयकतात अन् त्यायले संसाराची कायजी असते व पैशावर अधिक प्रेम अन् अलग-अलग वस्तुची आवड त्यायच्या जीवनात येते, अन् देवाच्या वचनात अडथळा आणते, अन् त्याच्या जीवनात फळ येत नाई. 15अन् चांगल्या मातीत पेरलेल्या बिया अशा हाय, जे लोकं देवाच वचन आयकून स्विकारतात मंग त्यायच्या जीवनात चांगले परिणाम येते, कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे फळ आणते.”
दिव्याची कथा
(मार्क 4:21-25)
16“कोणी दिवा लावून बाजी खाली ठेवत नाई, पण दिव्याले टेबलावर ठेवतात, कावून की त्याचा ऊजीळ सगळ्या इकडे पळला पायजे. 17अन् काई लपलेलं नाई जे दिसीन नाई, अन् जे काही गुप्त गोष्ट हाय ते ऊजीळात माईत होईन, अन् सगळं लपवलेली गोष्ट दाखवल्या जाईन. 18यासाठी चौकस राहा, कि तुमी कसे आयकता, कावून की, ज्याच्यापासी देवाच्या वचनाच ज्ञान हाय, त्याले अजून दिल्या जाईन अन् ज्याच्यापासी नाई हाय, जे काई त्याच्यापासी अशीन ते पण वापस घेतल्या जाईन, ज्याले तो आपलं समजते.”
येशूचा खरा कुटुंब
(मत्तय 12:46-50; मार्क 3:31-35)
19येशूची माय अन् त्याचा भाऊ ततीसाक आले, अन् बायरून निरोप पाठून त्यायनं त्याले बलावलं. कारण गर्दीच्यानं ते अंदर जाऊ शकत नव्हते. 20अन् येशूच्या आजूबाजून लय लोकं बसले होते, काई लोकायन येऊन त्याले म्हतलं, कि “तुमची माय व लायना भाऊ बायर तुमाले पाऊन रायले हाय.” 21त्यानं उत्तरात त्यायले म्हतलं कि, “माह्यी माय व माह्ये भाऊ हे हायत जे देवाचं वचन आयकतात, अन् मानतात.”
वारावायद्णाले शान्त करणे
(मत्तय 8:23-27; मार्क 4:35-41)
22मंग एका दिवशी येशू अन् त्याचे शिष्य डोंग्यात चढले, अन् येशूनं त्यायले म्हतलं, “चला आपण समुद्राच्या तिकळच्या बाजूनं जाऊ,” तवा त्यायनं जा साठी डोंगा खोलला. 23पण जवा डोंगा समुद्रातून जात होता तवा समुद्रात लय वारावायद्न सुरु झाले, अन् लाटा डोंग्यावर आल्या, अन् पाणी पण डोंग्यात येऊन रायलं होते, अन् तो डोंगा डुबून रायला होता. अन् येशू डोंग्याच्या खालच्या भागात झोपला होता.
24तवा शिष्याईन त्याच्यापासी येऊन त्याले उठवलं, अन् म्हतलं, कि “गुरुजी-गुरुजी आपण पाण्यात डूबत हावो,” तवा येशूनं उठून वारावायद्णाले दटाऊन म्हतलं “शांत राय! थांबून जाय!” तवा वारावायद् थांबले! 25अन् त्यानं त्यायले म्हतलं, कि “तुमचा विश्वास कुठं गेला,” पण ते भेऊन गेले, अन् हापचक होऊन एकमेकाय संग बोलू लागले, कि “हा कोण हाय, की वारावायद्न अन् समुद्र पण त्याची आज्ञा मानते.”
भुत आत्म्यायले बायर काढण
(मत्तय 8:28-34; मार्क 5:1-20)
26मंग येशू व त्याचे शिष्य समुद्राच्या तिकडच्या बाजुले गरसेकर लोकायच्या प्रांतात पोहचले जे गालील प्रांताच्या समोर हाय 27अन् जवा तो डोंग्यातून खाली उतरला, तवा लगेचं एक भुत लागलेला माणूस जो कबरेच्या गुफेत रायत होता, निघून त्याच्यापासी आला., अन् तो लय दिवसापासून कपडे नेसत नव्हता अन् घरी पण रायत नोहता, पण तो कब्राईत रायत होता. 28अन् जोऱ्यानं कल्ला करून म्हतलं, “हे येशू, सर्वशक्तिमान देवाचा पोरा तू माह्या कामात अर्थळे कायले आणत, तू मले कावून तरास देतो, तुले विनंती करतो कि मले तरास देऊ नको.”
29कावून कि तो त्या भुत आत्म्याले त्या माणसातून निग्याची आज्ञा देऊन रायला होता, कावून कि तो त्याच्यावर लय वेळा प्रबळ होऊन रायला होता, अन् जरी लोकं त्याले साकई दांडान बांधत होते, तरी तो त्यायले तोडत होता, अन् भुत आत्मा त्याले सुनसान जागेत फिरवत होता. 30येशूनं त्याले विचारलं, “तुह्यावालं नाव काय हाय?” त्यानं त्याले उत्तर देलं, “माह्यावालं नाव भुतायचं सैन्य हाय,” कावून की आमी आत मध्ये “लयझण हाव.” 31अन् त्यायनं येशूले आग्रह करून विनंती केली कि “आमाले खोल गड्यात जायची आज्ञा दे.” 32पहाडाच्या बाजुले डुकरायचा एक मोठा कळप चरून रायला होता, तवा भुतायनं त्याले विनंती केली की, “आमाले त्या डुकराईत पाठवून दे,” तवा येशूनं त्यायले डुकराईत जाऊ देलं.
33तवा ते भुत आत्मे त्या माणसातून निघून डूकराईच्या अंदर घुसले, अन् तो सुमारे दोन हजार डुकरायचा कळप होता, अन् तो धावत समुद्राच्या काटावरून पयाला अन् पाण्यात डुबून मेला. 34तवा हे पाऊन डुकरं चारणारे पयाले अन् गावात व गल्लीत जाऊन त्यायनं हे गोष्ट सगळ्या इकळे पसरवली. 35हे जे झालं होतं ते पाह्याले लोकं येशू पासी आले. तवा लोकायन ज्याले भुत लागला होता तो शुद्धीवर येऊन व कपडे घालून येशू पासी बसलेला पाऊन, लोकं त्याले भेले.
36अन् त्या झालेल्या गोष्टीले पायनाऱ्या लोकायन त्यायले सांगतल, कि तो भुत आत्म्यान सतावलेला माणूस कसा चांगला झाला, 37तवा गरसेकर लोकायच्या प्रांताच्या आजूबाजूच्या लोकायन येशूले विनंती केली अन् मतलं आमच्या गावातून निघून जाय. कावून कि त्यायच्यावर लय भय पसरला होता, अन् ते डोंग्यावर बसून वापस चालले गेले. 38मंग येशू जवा डोंग्यात बसु रायला होता, तवा ज्या माणसाले भुत लागला होता त्यानं त्याले विनंती करून म्हतलं मले पण तुह्यावाल्या सोबत राऊ दे, पण येशूनं त्याले त्याच्या संग येऊ देलं नाई, अन् त्याले म्हतलं 39“तू तुह्यावाल्या घरी जाऊन तुह्या लोकायले सांग, की देवानं तुह्यासाठी कसं मोठं काम केलं हाय,” तवा तो जाऊन दिकापुलिस प्रांतात प्रचार करू लागला की येशूनं कसे मोठे-मोठे काम त्याच्यासाठी केले हाय.
बिमार बाई अन् मेलेल्या पोरीले जीवनदान
(मत्तय 9:18-26; मार्क 5:21-43)
40एकडाव वापस येशू डोंग्यात बसून गालील समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर वापस गेला, तवा लोकं त्याले आनंदाने भेटले, कावून कि लोकं त्याची वाट पाऊन रायले होते. 41अन् पाहा, याईर नावाचा माणूस जो धार्मिक सभास्थानाचा सरदार होता, व तो येशूले पावून, त्याच्या समोर टोंगे टेकून, पाया लागला त्यानं हे म्हणून येशूले विनंती केली, कि “माह्याल्या घरी चल.” 42कावून कि त्याची बारा वर्षाची एकूलती पोरगी होती, अन् ते मऱ्याले झालती जवा तो चालला होता, तवा लोकायची खूप मोठी गर्दी त्याच्या मांग चालत होती, इथपरेंत कि लोकं एकमेकायले धक्के देऊ येशूवर पळत होते.
43अन् तती एक बाई होती, जिले बारा वर्षापासून रक्तस्रावाची बिमारी होती. अन् तिनं बऱ्याचं वैद्यापासून लय हाल सोसून, आपल्या जवळचा सगळा पैसा गमावून टाकला होता, पण याचा तिले काहीच फायदा झाला नव्हता. 44मांगून येऊन तिने येशूच्या कपड्याले हात लावला, अन् तवा लगेचं तिचे रक्त वायनं बंद झाले. 45यावर येशूनं म्हतलं, “मले कोण हात लावला?” जवा सगळे नकार करू लागले तवा पतरस अन् त्याच्या सोबत जे होते त्यायनं येशूले म्हतलं, “हे गुरुजी लोकं तुह्या भवताल गर्दी करून तुह्यावर पडून रायले हाय, हे तू पायत हाय, तरी तू म्हणतो कोण मले हात लावला.” 46पण येशूनं म्हतलं कि “कोणतरी मले हात लावला, कावून कि मी जाणलं अन् माह्यातून सामर्थ निघाली.”
47जवा त्या बाईनं पायलं, कि मी लपू शकत नाई, तवा ते कापत-कापत भेत-भेत समोर आली अन् येशूले टोंगे टेकून पाया लागली तिच्या बाबतीत जे काई घडलं ते तिनं खरं-खरं सांगतल. कि मी कोण्या कारणान तुले हात लावला, अन् लवकरच मी बरी होऊन गेली. 48येशूनं तिले म्हतलं, “पोरी तुह्यावाल्या विश्वासानं तू बरी झाली हाय, शांतीन आपल्या घरी चालली जाय.” 49जवा येशू हे म्हणतच होता, की तेवढ्यात धार्मिक सभास्थानाच्या अधिकाराच्या घरून काई माणसं येवून सभास्थानाच्या अधिकाऱ्याले सांगू लागले, “तुह्याली पोरगी मेली हाय आता गुरुजीले तरास देऊ नको.” 50येशूनं हे आयकून सभास्थानाच्या अधिकाऱ्याले म्हतलं, “भेऊ नको, फक्त माह्यावर विश्वास ठेव.” तर ती चांगली होऊन जाईन.
51घरी येऊन त्यानं पतरस, योहान व याकोब अन् पोरीच्या माय-बापाले सोडून कोणालेच आपल्या सोबत अंदर येऊ नाई देलं 52अन् सगळे तिच्यासाठी रडून रायले होते, पण येशूनं म्हतलं कि, “रडू नका ते मेली नाई झोपली हाय.” 53ते हे जाणून कि ती मेली हाय, त्याच्यावर हसून रायले होते. 54पण येशूनं पोरीच्या हाताले पकडून म्हतलं “हे पोरी उठ!” 55तवा तिचा जीव परत आला, अन् ती लवकरच उठली, मंग त्यानं आज्ञा देली, कि तिले काई खायाले द्या. 56तिचे माय-बाप हापचक झाले, पण त्यानं त्यायले सांगतल, कि हे घडलेली गोष्ट कोणाले सांगू नका.
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.