लुका 7

7
सूभेदारच्या विश्वासावर येशूच हापचक होणं
(मत्तय 8:5-13; योहान 4:43-54)
1जवा येशूनं तती उपस्थित लोकायले आपल्या साऱ्या गोष्टी सांगतल्या, तवा तो कफरनहूम शहरात आला. 2अन् कोण्या शंभर शिपायायचा अधिकाऱ्याचा सेवक जो त्याचा आवडता होता, बिमारीनं मऱ्याले टेकला होता. 3त्यानं येशूच्या बऱ्यात बातमी आयकून, यहुदी लोकाय मधल्या काई यहुदी पुढारी लोकायले येशू जवळ हे विनंती कऱ्याले पाठवलं कि येवून माह्या सेवकाले वाचव. 4तवा ते येशू पासी येऊन त्याले विनंती करून म्हणाले, “तो याच्या योग्य हाय, कि तू त्याच्यासाठी हे काम कर. 5कावून कि तो आमच्या जातीच्या लोकायवर प्रेम करते, अन् त्यानचं आमच्या लोकायसाठी धार्मिक सभास्थान बनवून देलं हाय.” 6येशू त्यायच्या संग-संग चालला, पण जवा तो त्याच्या घरा जवळ होता, तवा शंभर शिपायायचा अधिकाऱ्यान काई दोस्ताय पासून निरोप पाठवला, “हे प्रभू दुख नको उचलु, कावून कि मी ह्या योग्य नाई, कि तू माह्याल्या घरात यावं.
7म्हणून मी स्वताले ह्या योग्य पण नाई समजलं, कि तुह्यापासी येऊ, पण तू येथून जरी बोलला तरी माह्याला सेवक बरा होऊन जाईन. 8मी पण दुसऱ्यायच्या आधीन हाय, अन् सेवक माह्या आधीन हाय, अन् जवा एकाला म्हणतो कि जाय, तवा तो जाते, अन् दुसऱ्याले म्हणतो ये, तवा तो येते, अन् जवा आपल्या सेवकाला म्हणतो हे कर, तवा तो ते करते.” 9हे आयकून येशू हापचक झाला, अन् जे लोकं त्याच्या मांग येऊ रायले होते त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं सांगतो, कि मी इस्राएल देशामध्ये एक हि असा व्यक्ती नाई पायला, जो या अन्यजाती माणसा सारखा माह्यावर भरोसा करते.” 10तवा पाठवलेल्या लोकं जवा घरी वापस आले तवा पायलं कि तो सेवक चांगला झाला हाय.
मेलेल्या माणसाले जीवन-दान
11दुसऱ्या दिवशी येशू नाईन नावाच्या नगरात जाऊन रायला होता, अन् त्याचे शिष्य अन् लोकायची मोठी गर्दी त्याच्या संग चालली होती. 12जवा तो नगरच्या फाटकापासी पोहचला, तवा त्यानं पायलं कि लोकं एका मुर्द्याले बायर घेऊन चालले होते, जो आपल्या मायचा एकुलता पोरगा होता, अन् ते विधवा होती, अन् नगरातले लय लोकं, त्याच्या संग होते. 13त्याले पावून प्रभू येशूले दया आली, अन् त्या बाईले म्हतलं, “रडू नको.”
14तवा त्यानं जवळ येऊन मुर्द्याले हात लावला; अन् उचलणारे थांबून गेले, तवा त्यानं म्हतलं, “हे जवान मी तुले म्हणतो, उठ अन् उभा हो!” 15तवा तो मुर्दा उठून बसला, अन् बोलाले लागला, अन् त्यानं त्याले त्याच्यावाल्या माय पासी देऊन देलं. 16तवा सगळ्या लोकायवर मोठा भय आला, अन् ते देवाचं गौरव करत म्हणाले, “आपल्यामध्ये एक मोठा भविष्यवक्ता उत्पन झाला हाय, अन् देव आपल्या लोकायले वाचव्याले आला.” 17अन् याच्या विषयी हे गोष्ट सगळ्या यहुदीया प्रांतातल्या अन् आजूबाजूच्या साऱ्या देशात पसरली.
योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचं प्रश्न
(मत्तय 11:2-19)
18अन् योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले त्याच्यावाल्या शिष्यायनं या सऱ्या गोष्टीचा समाचार देला. 19तवा योहानान आपल्या शिष्यायतून दोघायले बलावून येशू पासी हे विचाऱ्यासाठी पाठवलं, “काय येणारा ख्रिस्त ज्याले देव पाठवणार होता तो तुचं हायस, कि आमी दुसऱ्याची वाट पाऊ?” 20त्यायनं येशू पासी येऊन म्हतलं, “योहान बाप्तिस्मा देणाऱ्यान आमाले तुह्यापासी हे विचाऱ्याले पाठवलं, कि येणारा ख्रिस्त तुच हाय, कि आमी दुसऱ्याची वाट पाऊ.”
21त्याचं वेळी त्यानं लय लोकायले जे बिमार, त्रासात, अन् भुत आत्मानं ग्रसित होते त्यायले मुक्त केलं, अन् लय फुटक्यायले डोये देले. 22अन् त्यानं योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या शिष्यायले म्हतलं, “जे काई तुमी पायलं, अन् आयकलं हे सगळे योहानाले जाऊन सांगा. कि फुटके पायतात अन् लंगडे चालतेत अन् कुष्ठरोगी बरे केले जातेत, अन् गोरगरिबायले सुवार्था सांगतली जाते. 23ते किती आनंदी हायत जे माह्यावर विश्वास करतात अन् मांग नाई फिरत.”
24जवा योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे संदेशवाहक शिष्य ततून चालले गेले, तवा येशू योहानाच्या विषयात लोकायले सांग्याले लागला, “तुमी सुनसान जागी काय पाह्याले गेले होते? काय हवेनं हालनाऱ्या बोरुच्या झाडाले? 25तर मंग तुमी काय पाह्याले गेलते? काय महाग कपडे घातलेल्या माणसाले जे राजभवनात रायते. 26तर मंग कावून गेलते? कोणत्या भविष्यवक्त्याला पाह्याले गेलते काय? हो मी तुमाले सांगतो, कि भविष्यवक्त्याहून पण मोठ्याले पाह्याले गेलते. 27हा तोच हाय, ज्याच्याविषयी पवित्रशास्त्रात लिवलेल हाय; कि पाय मी आपल्या संदेशवाहकले तुह्या समोर पाठवतो, तो तुह्या रस्ता तयार करीन. 28मी तुमाले खरं सांगतो कि जो बायाय पासून जन्मला हाय, त्यायच्यातून योहान बाप्तिस्मा देणाऱ्याहून कोणी मोठा नाई, पण देवाच्या राज्यात जो लायण्याहून लायना अशीन, तो योहान बाप्तिस्मा देणाऱ्याहून मोठा हाय.”
29जवा त्यायनं येशूनं म्हतलेल्या गोष्टी आयकल्या, तवा सगळ्या लोकायन, योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले खरा मानलं अन् अतपर्यंत कि जकातदारायन पण योहानाचा बाप्तिस्मा घेऊन, घोषणा केली, कि देव धर्मी हाय. 30पण परुशी अन् मोशेच्या नियमशास्त्राचा शिक्षक लोकायन योहान पासून बाप्तिस्मा घ्यायले नाकार केला अन् देवाच्या इच्छेले आपल्या विषयात नकारून टाकलं. 31-32तवा येशूनं म्हतलं, “मी या पिढीच्या लोकायची तुलना कोण्या लोकायसोबत करू? ते त्या लेकरा सारखे हायत, जे बजारात बसून एकामेकांना आवाज देतात, आमी तुमच्यासाठी बासुरी वाजवली, अन् तुमी नाई नाचले, आमी दुख केला, पण तुमी रडले नाई.
33कावून कि योहान बाप्तिस्मा देणारा लय उपास करते, अन् अंगुराचा रस पण नाई पेत, तरीही ते लोकं त्याले म्हणतात कि त्याच्यात भुत आत्मा हाय. 34-35माणसाचा पोरगा खात पेत आला; अन् तुमी म्हणता, पाहा खादोडा, दारू पेणारा माणूस, अन् करवसुली करणाऱ्या अन् पापी लोकायचा दोस्त, पण एका माणसाचे काम हे दाखवून देईन कि बुद्धीमान कोण हाय.”
शिमोन परुशीच्या घरी पापी बाईले क्षमादान
36मंग कोण्या परुशीनं येशूले विनंती केली, कि माह्या संग जेवण कर; तवा तो त्या परुशी माणसाच्या घरी जाऊन जेवण कऱ्याले बसला. 37त्या नगराची एक पापी जीवन जगणारी बाई हे समजून कि येशू परुशी माणसाच्या घरी जेवण कराले बसला हाय, तिनं संगमरमरच्या भांड्यात बहुमुल्य सुगंधित तेल आणलं. 38अन् येशूच्या पायापासी, मांग उभी राहून रडत त्याच्या पायाले आपल्या आसवाने भिजवून अन् आपल्या डोक्याच्या केसानं पुसू लागली, अन् त्याच्या पायाचे लय वेळा मुके घेऊन, पायावर बहुमुल्य सुगंधित तेल लावून रायली होती. 39हे पाहून, तो परुशी ज्यानं येशूले बलावलं होतं, त्यानं आपल्या मनात विचार केला, “जर हा भविष्यवक्ता असता तर समजून गेला असता, कि जे त्याले हात लावत हाय, कावून कि ती एक पापी जीवन जगणारी बाई हाय.”
40हे आयकून येशूनं त्या परुशीले ज्याचं नाव शिमोन होतं उत्तर देऊन म्हतलं, “हे शिमोन, मले तुह्या सोबत काही बोलायचं हाय.” त्यानं म्हतलं, “हे गुरु, बोल.” 41“कोण्यातरी सावकाराचे दोन कर्जदार होते, एक पाचशे दिनार (जवळपास पाचशे दिवसाची मजुरी) अन् दुसऱ्याले पन्नास दिनार (जवळपास पन्नास दिवसाची मजुरी) उधार होते. 42जवा वापस द्याले त्यायच्यापासी काही नाई होतं, तवा त्यानं त्या दोघाचे कर्ज क्षमा केलं, त्याच्यातून कोण धनवान माणसा सोबत जास्त प्रेम करन?”
43शिमोनानं उत्तर देलं, “माह्या हिशोबानं तो ज्याचं त्यानं जास्त कर्ज क्षमा केलं हाय.” येशूनं त्याले म्हतलं, “तू बरोबर विचार केला हाय.” 44अन् त्या बाई कडे वळून येशूनं शिमोनाले म्हतलं, “तुह्या बाईले पायलं काय, मी तुह्या घरात पाहुणा बनून आलो पण तू मले पाय धुवाले पण पाणी देलं नाई, पण ह्या बाईन माह्ये पाय आसवान भिजवले, अन् आपल्या केसानं पुसले. 45तू माह्या स्वागत नाई केला, पण जवा पासून मी आलो तवा पासून ह्या बाईन माह्या पायाचे मुके घेणं सोडलं नाई. 46तू माह्या डोकश्यावर तेल नाई लावलं, पण ह्या बाईन माह्या पायावर तेल लावलं हाय.
47म्हणून मी तुले म्हणतो, कि इचे पाप जे लय होते, माफ केले, कावून कि इने लय प्रेम केलं; पण ज्याले थोडी क्षमा भेटली, तो थोडचं प्रेम करते.” 48अन् येशूनं त्या बाईले म्हतलं, तुह्ये पाप क्षमा झाले. 49तवा जे लोकं त्याच्या सोबत जेव्याले बसले होते, ते आपल्या मनात विचार करू लागले, “हा कोण होय जो लोकायच्या पापाले पण क्षमा करते.” 50पण त्यानं त्या बाईले म्हतलं, “तू माह्यावर विश्वास केला म्हणून देवानं तुले वाचवलं हाय, शांतीन आपल्या घरी चालली जाय.”

目前选定:

लुका 7: VAHNT

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录