मरकुस 10

10
फारकतीच्या विषयात येशूची शिकवण
(मत्तय 19:1-12; लूका 16:18)
1मंग येशू आपल्या शिष्याय संग कफरनहूम नगरातून निघून यहुदीया प्रांतात यरदन नदीच्या तिकळच्या बाजुले गेला, तवा परत लोकायन त्याच्यापासी गर्दी केली, अन् तो आपल्या रोजच्या सारखं त्यायले शिकवण देऊ लागला. 2तवा परुशी लोकं येशू पासी येऊन त्याची परीक्षा पायाच्या उद्देशान, त्याले विचारलं काहो “नवऱ्यानं आपल्या बायकोची फारकती घेणं उचित हाय?” 3तवा येशूनं त्यायले उत्तर देवून म्हतलं, “की मोशेनं तुमाले काय आज्ञा केली?”
4मंग परुशी लोकायन म्हतलं, “फारकतीपत्र देवून तिले सोडून द्या अशी मोशेनं पुस्तकात आज्ञा देली हाय.” 5येशूनं त्यायले म्हतलं, “कावून की तुमी कधी पण देवाचं आयकतं नाई, म्हणून मोशेनं हे आज्ञा तुमच्यासाठी लिवली हाय. 6पण उत्पत्तीच्या सुरवाती पासून देवानं त्यायले बाई-माणूस म्हणून, बनवलं हाय. 7याच्या च्यानं, माणूस आपल्या माय-बापाले सोडून, आपल्या बायको संग मिळून राईन, अन् ते दोघं एक शरीर होतीन. 8म्हणून ते दोन माणसायं सारखं नाई पण एकच माणूस होईन.
9कावून कि देवबापान ज्याईले संग जोडलं हाय ते माणसानं तोडलं नाई पायजे.” 10मंग घरात आल्यावर जवा येशू शिष्याय संग एकटा होता, तवा त्यायनं त्याले त्या गोष्टी बद्दल परत विचारलं 11तवा येशूनं त्यायले म्हतलं, “जो कोणी आपल्या बायकोले टाकून दुसरी संग लग्न करते तो व्यभिचार करते 12अन् जे आपल्या नवऱ्याले सोडून जर दुसरं लग्न करते ते पण व्यभिचार करते.”
लहान लेकरायले येशूचा आशीर्वाद
(मत्तय 19:13-15; लूका 18:15-17)
13मंग लोकायन लेकरायले येशू पासी आणलं, कि त्यानं त्यायले हात लावला पायजे अन् आशीर्वाद देला पायजे, पण त्याच्या शिष्यायनं आणनाऱ्यायले दटावलं. 14ते पावून येशूले खराब वाटलं अन् त्यानं त्यायले म्हतलं, “लेकरायले माह्यापासी येऊ द्या त्यायले म्हणा करू नका, कावून कि जे लोकं ह्या लेकारायसारखे भरोशाच्या लायक अन् नम्र हायत तेच देवाच्या राज्यात रायणार.” 15मी तुमाले खरं-खरं सांगतो, “जो कोणी लेकराय सारखे होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार, तेच देवाच्या राज्यात जातीन.” 16तवा येशूनं त्यायले आपल्या काकीत घेतलं अन् हात ठेऊन त्यायले आशीर्वाद देला.
श्रीमंत माणूस अन् अनंत जीवन
(मत्तय 19:16-30; लूका 18:18-30)
17जसं येशूनं आपल्या शिष्याय सोबत परत प्रवास सुरु केला, तवा एक माणूस पयत-पयत येशू पासी आला अन् टोंगे टेकून येशूले विचारलं, “काहो उत्तम गुरुजी, अनंत जीवन भेट्याले मी काय करू?” 18येशूनं त्याले म्हतलं, “मले उत्तम कावून म्हणतो? कोणी उत्तम नाई, पण फक्त देवचं उत्तम हाय. 19तुले तर देवाच्या आज्ञा मालूम हाय, कि खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटा पुरावा देऊ नको, ठकवू नको, आपला माय बापाचा मानदान ठेव,” 20त्यानं त्याले म्हतलं गुरुजी ह्या सगळ्या आज्ञा मी लहान पणापासून मानत आलो हाय. 21येशूनं त्याच्याइकडे पायलं, व त्याच्यावर त्यानं प्रीती केली अन् म्हतलं, “तुह्यात एका गोष्टीची कमी हाय, जाय जे काई संपत्ती तुह्या जवळ हाय ते इकून टाक, अन् गरीबायले दान कर, मंग तुले स्वर्गात धन भेटीन, अन् माह्य अनुकरण करून येवून माह्यवाला शिष्य बन.”
22पण हे आयकून त्याचं तोंड कुळुमुळू झालं, अन् दुखी होऊन ततून निगाला, कावून कि तो लय श्रीमंत होता. 23तवा येशूनं चवभवंताल पावून आपल्या शिष्यायले म्हतलं, “देवाच्या राज्यात श्रीमंतायले जाणं लय अवघड हाय.” 24तवा येशूच्या बोलण्यावर शिष्य हापचक झाले, येशूनं त्यायले अजून म्हतलं, लेकरं हो, “देवाच्या राज्यात श्रीमंतायले जाणं लय अवघड हाय. 25एका उंटाले सुईच्या शेद्रातुन जाणं कठीण हाय, पण एका श्रीमंतायले देवाच्या राज्यात जाणं त्याच्याऊनही लय कठीण हाय.” 26मंग हे आयकून शिष्य लय हापचक हून, आप-आपसात म्हणू लागले, “मंग कोणाचं तारण होणार?” 27येशूनं त्यायले टकमक पायलं, अन् म्हतलं, “माणसायले तर हे अवघड हाय पण देवाले सगळं काही शक्य हाय.”
28पतरसन येशूले म्हतलं, “आमचं काय होईन, कावून की, आमी तुह्याले शिष्य बनण्यासाठी सगळं काई सोडून तुह्यावाल्या मांग आलो हाय.” 29येशूनं म्हतलं, “मी तुमाले खरंखरं सांगतो, माह्ये शिष्य होण्यासाठी अन् सुवार्थेची घोषणा कऱ्यासाठी ज्यानं माह्यासाठी घरदार, बायको, बहीण-भाऊ, माय-बाप, लेकरं-बाकरं, वावर-धुवर, सोडलं अशीन. 30अशा सगळ्यायलेच शेवटच्या काठी छळणुकी बरोबर शंभरपटानं घरदार, बायको, बहीण-भाऊ, माय-बाप, लेकरं-बाकरं, वावर-धुवर, सोडलं अशीन, येण्याऱ्या युगात अनंत जीवन हे भेटल्या शिवाय रायणार नाई. 31पण आता जे पयले हायत ते त्यावाक्ती शेवटचे होतीन, अन् जे आता शेवटचे हाय ते पयले होतीन.”
आपल्या मरणाच्या विषयात येशूची तिसरी भविष्यवाणी
(मत्तय 20:17-19; लूका 18:31-34)
32मंग ते यरुशलेम शहरातून जावून रायले होते, तवा येशू त्यायच्या समोर-समोर रस्तानं जाऊन रायला होता, तवा शिष्य हापचक झाले, अन् जे त्याच्या मांग-मांग लोकं चालून रायले होते, ते भेऊन रायले होते, कावून कि जती तो चालला होता, तती त्यायचा लय विरोध झाला होता. तवा त्यानं त्या बारा जनायले आपल्यापासी बलावलं, त्यायले आपल्याले काय होईन त्या बाऱ्यात सांगू लागला. 33“पायजाक आपण यरुशलेम शहरात जावून रायलो तती माणसाचा पोरगा मुख्ययाजक व मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक या लोकायच्या हाती पकळून देल्या जाईन, अन् ते त्याले मरणदंडाची शिक्षा देतीन, अन् दुसऱ्या लोकायच्या हातात देवून देतीन. 34अन् ते त्याची मजाक करतीन, त्याच्या वरते थुकतीन, त्याले झपाटे मारतीन, अन् त्याचा जीव घेऊन टाकतीन अन् तो तिसऱ्या दिवशी परत जिवंत होईन.”
याकोब व योहानाची विनंती
(मत्तय 20:20-28)
35तवा जब्दीचे दोन पोरं, याकोब अन् योहानान, येशू पासी जावून म्हतलं, “हे गुरुजी आमी तुह्यापासी जे काय मांगू तसं तू आमच्यासाठी कर, अशी आमची इच्छा हाय.” 36येशूनं त्यायले म्हतलं, मी तुमच्यासाठी काय करावं, अशी तुमची इच्छा हाय? 37त्यायनं येशूले म्हतलं, की “जवा तुमी आपल्या महिमेच्या राज्यात शासन करने सुरु करसान तवा कृपया आमाले पण तुह्या संग शासन कऱ्याची अनुमती दे.” 38येशूनं त्यायले म्हतलं, तुमी काय मांगता हे “तुमाले समजत नाई, जे दुख मी सोशीन ते तुमी सोससान काय? अन् जसं मी मरीन तसचं तुमी मरसान काय?”
39येशूनं त्यायले म्हतलं, “तुमाले सतावल्या जाईन जसं मले सतावल्या जाईन अन् मले जसं मारल्या जाईन, तसचं तुमाले पण मारल्या जाईन. 40पण माह्या वैभवात कोण शासन करणे हे माह्या हाती नाई, त्या जागा ज्यायच्या साठी ठेवल्या हाय, ते त्यायले भेटीन.” 41हे आयकून बाकीचे दहा शिष्य याकोब अन् योहानावर तपलें. 42तवा येशूनं त्यायले आपल्यापासी बलाऊन म्हतलं, “तुमाले माहीत हाय, जे जगातल्या लोकायचे अधिकारी समजल्या जातात, ते आपल्या अधिकाराचा वापर आपल्या आधीन असलेल्या लोकायवर अधिकार दाखव्यासाठी करते अन् जे त्यायच्याहून पण मोठे हायत ते त्यायच्यावर अधिकार ठेवते.
43पण तुमची गोष्ट अशी हाय, जर कोणाले मोठं व्हायचं अशीन, तर त्यानं सगळ्यात लहान व्हावं लागेल, अन् सगळ्यायचा सेवक बनावं. 44अन् ज्या कोणाले तुमच्यातून प्रधान होयाची इच्छा हाय त्यानं पयले सगळ्यायचा सेवक झाला पायजे. 45मी असं म्हणतो कावून कि मी, माणसाचा पोरगा मोठ्या शासका सारखा सेवा करून घ्याले नाई, तर सेवा कऱ्याले अन् लय लोकायच्या मुक्ती साठी आपला जीव अर्पण कऱ्याले आला हाय.”
फुटक्या बरतिमाईले दुष्टीदान
(मत्तय 20:29-34; लूका 18:35-43)
46मंग ते यरीहो शहरात आले अन् येशू अन् त्याचे शिष्य अन् एक मोठी गर्दी यरीहोतून निगु रायली होती, तीमायाच्या पोरगा बरतिमाई नावाचा एक फुटका भिखारी रस्ताच्या बाजूनं बसला होता. 47तो हे आयकून कि हा नासरतचा येशू हाय, जोरजोऱ्यानं म्हणू लागला, अहो दाविद राजाच्या पोरा, येशू, माह्यावर दया कर. 48तवा तो चूप रायला पायजे म्हणून लय जनायनं त्याले दटावलं पण तो अजूनच जोऱ्यानं कल्ला करू लागला, हे दाविद राजाच्या पोरा माह्यावर दया कर.
49तवा येशू तती थांबला, अन् त्यानं म्हतलं, “त्याले बलावून आना, अन् लोकायन त्या फुटक्याले बलावून असं म्हतलं, धीर ठेव, उठ, तो तुले बलावून रायला हाय.” 50तवा तो आपले कपडे फेकून उठला, अन् पटकन येशू पासी गेला. 51येशूनं त्याले म्हतलं, मी तुह्यासाठी काय करू? फुटक्यानं म्हतलं गुरुजी मी डोयान पायलं पायजे. 52येशूनं त्याले म्हतलं, “जाय, तुह्या विश्वासानं तुले बरं केलं हाय” अन् त्याले पटकन दिसू लागलं, अन् तो रस्तानं येशूच्या मांग-मांग चालू लागला.

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录