मरकुस 11

11
यरुशलेमात विजय प्रवेश
(मत्तय 21:1-11; लूका 19:28-40; योहान 12:12-19)
1जवा येशू अन् त्याचे शिष्य यरुशलेम शहराच्या जवळ आले, तवा ते जैतून पहाडाच्या जवळून बैथफगे गाव अन् बेथानी गावात आले, तवा त्यानं आपल्या शिष्यातून दोघायले हे म्हणून पाठवले, 2“समोरच्या गावात जा, अन् तती गेल्यावर तुमाले एक गध्याचं पिल्लू दिसीन, ज्यावर आतापरेंत कोणी कधी बसलेलं नाई ते सोडू माह्यापासी आणा. 3अन् तती तुमाले कोणी पुसीन, तर सांगजा आमच्या प्रभूले याची गरज हाय, अन् तो लवकर त्याले पाठून देईन.” 4तवा शिष्य निघून गावात आले, त्यायले रस्ताच्या बाजूनं दरवाज्यापासी, बांधलेलं गध्याचं पिल्लू दिसलं ते त्याले सोडू रायले होते.
5तवा तती उभे असलेल्या लोकायतून काई लोकायन त्यायले म्हतलं, “हे गध्याचं पिल्लू तुमी कावून सोडता.” 6येशूनं त्यायले जसं सांगतल होतं, त्यायनं तसचं म्हतलं, तवा लोकायन त्यायले गध्याचं पिल्लू घेऊन जाऊ देलं. 7मंग त्यायनं ते गध्याचं पिल्लू येशू पासी आणलं, अन् त्याच्या आंगावर कपडे टाकले, तवा येशू गध्यावर बसून यरुशलेम शहराकडे जाऊ लागला. 8तवा बऱ्याचं लोकायन येशूच्या समोर रस्त्यावर आपआपले कपडे आतरले, काई लोकायन येशूले आदर देण्यासाठी वावरातून खजुराच्या झाडाच्या डांगा आणल्या, अन् रस्त्यावर पसरवल्या.
9अन् काई लोकं येशूच्या समोर चालत होते, अन् काई मांग, अन् असं आनंदाने ओरडत होते, “स्तुती हो, धन्य हाय जो देवाच्या सामर्थ्यान येते. 10आमचा खानदानीचा दाविद राजा याचे येणारे राज्य धन्यवादित होवो, स्वर्गात देवाची स्तुती हो.” 11मंग येशू यरुशलेम शहरात आल्यावर देवळात गेला अन् त्यानं अवताल-भवताल साऱ्या वस्तु निरखून पायल्यावर शहर सोडून, आपल्या बारा शिष्याय संग बेथानी गावात आला.
अंजीराचे निष्फळ झाड
(मत्तय 21:18-19)
12दुसऱ्या दिवशी ते बेथानी गावावून निगाले तवा येशूले भूक लागली. 13अन् येशूनं दुरून अंजीराचे एक लदबद पत्त्यायनं भरलेलं झाड त्याले दिसलं, अन् कदाचित काई तरी फळ त्यावर अशीन, या अपेक्षेन तो त्या अंजीराच्या झाडापासी गेला, पण तती गेल्यावर त्याले फक्त पालापाला दिसला कावून कि अजून झाडाले अंजीर लाग्याची वेळ आली नव्हती. 14तवा येशूनं त्या झाडाले म्हतलं, “आज पासून कोणी पण तुह्यालं फळ नाई खाईन” हे शिष्य आयकतं होते.
देवळातून व्यापाऱ्यायले काडून देने
(मत्तय 21:12-17; लूका 19:45-48; योहान 2:13-22)
15ह्या नंतर येशू अन् त्याचे शिष्य यरुशलेम शहरात आल्यावर देवळाच्या आंगणात गेले. अन् येशू देवळात घेणे-देणे करणाऱ्यायले बायर हाकलू लागला, त्यानं पैसे बदलणाऱ्या व्यापाराचे चौरंग अन् कबुतर विकणाऱ्याच्या बैठकी उलटून देल्या 16त्यानं लोकायले देवळाच्या जवळपास कोणती वस्तु घेऊन जाऊ देलं नाई.
17मंग येशू त्यायले देवाचे वचन शिकवू लागला, कि देवाच्या वचनात लिवलेल हाय, “कि लोकं माह्या घराले प्रार्थनेचं घर म्हणतीन, जती अन्यजातीचे लोकं प्रार्थना कऱ्याले येतीन, पण त्या देवळाले तुमी लुटारूची गुफा बनून टाकली हाय.”
18हे मुख्ययाजकायन अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक ह्यायनं हे आयकलं, अन् त्याले माऱ्याच्या बद्दल विचार करायले लागले, कावून कि सगळे लोकं त्याचं भाषण आयकून ठंप झाले होते. 19जवा संध्याकाय झाली, तवा येशू अन् त्याचे शिष्य शहर सोळून बेतनिया गावाच्या इकळे निघाले
वायल्या अंजीराच्या झाडापासून शिकवण
(मत्तय 21:20-22)
20मंग दुसऱ्या दिवशी सकाळी यरुशलेम शहराच्या रस्त्यानं जातांना त्यायले ते अंजीराचे झाड जे त्यायनं आगोदर पायलं होतं ते मुया पासून सोखलेल दिसून आलं 21तवा पतरसले आठवण आली, कि येशूनं त्या झाडाले काय म्हतलं होतं, मंग त्यानं येशूले म्हतलं, “हे गुरुजी, तुमी ज्या अंजीराच्या झाडाले शाप देला होता ते वायलेल हाय पा.” 22येशूनं त्यायले उत्तर देलं, “देवावर विश्वास ठेवा, 23मी तुमाले खरं सांगतो, कि जे कोणी या पहाडाले मनीनं, तू बुडापासून उपटून समुद्रात जा, अन् आपल्या मनात शंका न करता आपल्या मनात असा विश्वास करीन कि हे झालं तर त्याच्या बोलण्या प्रमाणच त्यासाठी ते घडून येईन.
24म्हणून मी तुमाले सांगतो, तुमी प्रार्थना करून जे काय मांगतलं ते आपल्याले भेटलं हाय असा विश्वास ठेवा म्हणजे ते तुमाले भेटीन. 25जवा तुमी प्रार्थना कऱ्याले उभे रायता तवा तुमच्या मनात कोणाच्या बद्दल काई अशीन तर त्याची क्षमा करा, यासाठी की, तुमचा स्वर्गातला देवबाप पण तुमच्या पापायले क्षमा करीन. 26अन् तुमी जर क्षमा करणार नाई, तर तुमचा स्वर्गातला देवबाप तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाई.”
येशूच्या अधिकारावर प्रश्न
(मत्तय 21:23-27; लूका 20:1-8)
27मंग येशू अन् शिष्य परत यरुशलेम शहरात आले, अन् जवा येशू देवळाच्या आंगणात फिरत होता तवा मुख्ययाजक, अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् यहुदी पुढारी लोकं त्याच्यापासी येऊन त्याले विचारू लागले. 28“तुमी कोणत्या अधिकारानं ह्या गोष्टी करता? अन् त्या कऱ्याचा अधिकार तुमाले कोण देला?” 29येशूनं त्यायले म्हतलं, “मी तुमाले एक प्रश्न विचारतो मले उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकारानं करतो हाय ते मी तुमाले सांगीन. 30योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता, कि माणसापासून होता? याचे मले उत्तर ह्या.”
31तवा ते आपआपसात, विचार करू लागले स्वर्गापासून हाय असं म्हणू तर तो मनीनं तुमी त्याच्यावर विश्वास कावून केला नाई? 32जर आपण म्हणू कि, माणसापासून होता असं म्हणावं तर काय होणार? कावून कि त्यायले लोकायच्या भेवं लागत होता, कावून कि योहान बाप्तिस्मा देणारा खरोखरचं भविष्यवक्ता होता, हे सगळ्या लोकायले माईत होतं. 33तवा त्यायनं येशूले उत्तर देलं, “आमाले माईत नाई,” येशूनं त्यायले म्हतलं “तर मंग कोणत्या अधिकारानं मी ह्या गोष्टी करतो, हे तुमाले सांगत नाई.”

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录