मरकुस 12
12
वाईट शेतकऱ्याची गोष्ट
(मत्तय 21:33-46; लूका 20:9-19)
1मंग या नंतर येशू कथेतून यहुदी पुढाऱ्याय संग उदाहरण देऊन बोलू लागला, कि “कोण्या एका माणसानं अंगुराची वाडी लावली, अन् त्याच्या भवती चार कोपऱ्यावर गोट्यायचा आवार बनवला, अन् रसाचा हऊद बनवला अन् एक वरून कुंपण बनवलं, अन् तो अंगुराच्या वाडीले ठेक्यानं देऊन प्रदेशात चालला गेला. 2जवा अंगुर पिकले तवा मालकाने आपल्या एका नौकराले अंगुराच्या वाडीच्या ठेकेदाराच्या इकळे पाठवलं, कि जो काई नफा होईन ते घेऊन या. 3पण वाडीच्या ठेकेदारायन नौकराले धरून मारलं, अन् त्याले त्यायनं रिकाम्याच हातांन पाठून देलं
4वाडीच्या मालकान अजून दुसऱ्या नौकराले त्यायच्या इकडे पाठवलं, पण वाडीच्या ठेकेदारायन त्याचं डोक्स फोडून टाकलं अन् त्याचा अपमान पण केला. 5अन् वाडीच्या मालकान अजून एका जनाले पाठवलं, अन् वाडीच्या ठेकेदारायन त्याले मारून टाकलं, असचं त्यानं लय जनायले पाठवलं, पण त्यायच्या संग त्यानं असचं केलं, त्यायच्यातून कोणाले झोडपले अन् कोणाले मारून पण टाकले. 6मंग आखरीले वाडीच्या मालकापाशी एकच जन रायला होता, अन् तो त्याचा आवडता पोरगा होता, आखरी मध्ये त्यानं त्याच्या पोराले त्यायच्यापासी असा विचार करून पाठवलं, कि ते माह्या पोराचा मानदान व आदर सन्मान करतीन.
7मंग त्या वाडीतल्या ठेकादारायन आप-आपसात म्हतलं कि हा तर वारीस हाय, चला आपण त्याले मारून टाकू मंग वाडी आपलीच होऊन जाईन. 8अन् मंग त्यायनं त्याले पकडून मारून टाकलं, अन् त्याच्या मेलेल्या शरीराले अंगुराच्या वाडीतून बायर फेकून देलं” 9“आता तो अंगुराच्या वाडीचा मालक असं करीन की, तो येऊन त्या वाडीच्या ठेकेदाराले मारून टाकीन, अन् अंगुराची वाडी दुसऱ्याईले देईन.
10काय तुमी पवित्रशास्त्राच हे वचन नाई वाचलं, जे ख्रिस्ताची बरोबरी महत्वपूर्ण गोट्या सोबत करते, तो म्हणतो ज्या गोट्याले राजमिस्त्रानं फेकून देलं, हा तोच गोटा हाय जो सऱ्या घराचा सगळ्यात महत्वपूर्ण गोटा बनला. 11हे देवाच्या इकून केल्या गेलं, अन् आपल्या डोया समोर हे चमत्कारच कार्य हाय.” 12तवा त्या यहुदी पुढाऱ्यायन त्याले पकड्याले पायलं, कावून कि ते समजून गेले कि त्यानं आमच्या विरोधात हि कथा सांगतली, पण लोकायले भेत होते, कि जर त्यायनं असं केलं तर ते लोकं त्यायचा विरोध करतीन म्हणून ते त्याले सोडून चालले गेले.
महाराजा केसरले करवसुली देने योग्य हाय कि नाई
(मत्तय 22:15-22; लूका 20:20-26)
13तवा त्या यहुदी पुढाऱ्यायन येशूले गोष्टीत फसव्यासाठी परुशी लोकायले अन् हेरोद राजाचे समर्थन करणारे लोकायले त्याच्या इकळे पाठवलं. 14अन् त्यायनं येऊन येशूले म्हतलं, “हे गुरुजी, आमाले मालूम हाय, तुमी जे बोलता ते नेहमीच खरं असते, तुमी या गोष्टीले नाई भीत कि लोकं तुमच्या बाऱ्यात काय विचार करतात, कावून कि तुमी सगळ्यायले समान ठेवून गोष्टी करता, पण देवाचा रस्ता खरोखर शिकवता, तर आमाले सांगा, यहुदी लोकायचा नियम सोडून आमी रोमी सम्राट करवसुली त्यायले देली पायजे काय?
15आमी देलं पायजे कि नाई?” येशूनं त्यायचे कपट वयखुण त्यायले म्हतलं, कि “तुमी माह्यी परीक्षा कायले पायता, एक #12:15 दिनार म्हणजे एका दिवसाची मजुरी माह्यापासी आना, कि मी पाईन.” 16अन् ते त्यायनं येशू पासी आणली, तवा येशूनं त्यायले म्हतलं, कि “ह्याच्यावर चित्र अन् नाव कोणाचं हाय?” अन् त्यायनं म्हतलं कि “रोमी सम्राटचे.” 17येशूनं त्यायले म्हतलं “जे रोमी सम्राटची वस्तु हाय ते सम्राटले, अन् जे देवाची वस्तु हाय ते देवाले द्या” तवा त्यायनं त्याच्याविषयी लय आश्चर्य केलं.
पुनरुत्थान अन् लग्न
(मत्तय 22:23-33; लूका 20:27-40)
18मंग यहुदी समुदायाचे काई सदस्य ज्यायले सदुकी म्हणतात ते येशू पासी आले सदुकी समुदाय हे नाई मानत होते कि मेलेले लोकं परत जिवंत होतात, असं म्हणनारे सदुकी लोकं येशू पासी येऊन त्याले विचारू लागले. 19“हे गुरुजी, मोशेनं नियमशास्त्रात आमच्यासाठी असा कायदा लिवून ठेवला हाय, कि जर कोण्या एका भावाले लेकरुच नाई, अन् तो मेला, तर त्याचा भाऊ त्याच्या बायको संग लग्न करून, अन् लेकरं पैदा करून आपल्या भावाचा कुळ चालवावं.
20कोणी सात भाऊ होते, अन् सर्वात मोठ्या भावानं लग्न केलं, अन् तो बिना लेकराचा मरून गेला, 21अन् मंग दुसऱ्या भावानं त्याचं बाई संग लग्न केलं अन् तो पण बिना लेकराचा मरून गेला, अन् तसचं तिसऱ्या भावा संग पण झालं. 22अन् असचं सात भावासोबत झालं, त्या बाईन त्यायच्यातून कोनासाठीपन एकाही लेकराले जन्म देला नाही. अन् सगळ्याईच्या आखरी ती बाई पण मेली. 23आता आमाले सांग त्यावाक्ती जवा ते मेलेले लोकं परत जिवंत होतीन, तवा ती बाई कोणाची बायको होईन? आमी हे ह्या साठी विचारतो कावून कि तिनं त्या सातही भावासोबत लग्न केलं होतं.” 24अन् येशूनं त्यायले म्हतलं, “तुमी चुकीचे हा, कावून की तुमाले नाई माईत कि पवित्रशास्त्र काय म्हणते, अन् तुमाले देवाच्या वचनाच्या सामर्थच्या बाऱ्यात पण नाई माईत. 25कावून मेलेल्यातून पुनर्जीवीत झाल्यावर लग्न करता येत नाई, कावून कि ते स्वर्गातल्या देवदूता सारखे असतात 26मेलेल्यातून जिवंत उठवल्या जाईन याच्या विषयी मोशेच्या पुस्तकात लिवलं हाय, ज्या भागात देवानं जळत्या झाळीत मोशे सोबत बोलते तती देव म्हणते, मी अब्राहामाचा देव, इसहाकचा देव, अन् याकोबाचा देव हाय, हे तुमच्या वाचनात आलं नाई काय? 27तो मेलेल्या लोकायचा देवबाप नाई, पण तो जिवंत लोकायचा देव हाय, तुमी लय मोठ्या भ्रमात पडले हाय.”
सगळ्यात मोठी आज्ञा
(मत्तय 22:34-40; लूका 10:25-28)
28तवा मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक ह्या ज्ञानी लोकाईतून एकानं येऊ त्यायले वादविवाद करतांना पायलं, तवा येशूनं त्यायले चांगल्या प्रकारे उत्तर देलं, ते पाऊन त्यानं त्याले विचारलं, “सर्व्यात मोठी आज्ञा कोणती हाय?” 29येशूनं त्याले उत्तर देलं, कि “सर्व्या आज्ञातून मुख्य आज्ञा हे हाय, कि हे इस्राएल देशाच्या लोकायनो आयका, प्रभू आमचा देव एकच देव हाय. 30तू आपल्या प्रभू व देवबाप याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, अन् पूर्ण शक्तीन प्रेम कर. 31दुसरी हि कि जसं आपल्या स्वतावर प्रेम करतो, तसचं तू आपल्या शेजाऱ्यावर पण प्रेम कर, याच्याऊन मोठी दुसरी कोणतीच आज्ञा नाई.” 32तवा मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक ह्यायनं त्याले म्हतलं, “हे गुरुजी आपण खरोखरचं बरोबर बोलला कि देव एकच हाय, त्याच्याशिवाय दुसरा नाही. 33अन् देवबापावर पूर्ण मनान, पूर्ण बुद्धीनं, व पूर्ण शक्तीन प्रेम करा व शेजाऱ्यावर आपल्या सारखं प्रेम ठेवा तुमी जे देवाले चढवतात त्या सगळ्या प्रकारच्या जनावराच्या बलिदानावून लय चांगलं हाय.” 34अन् येशूनं त्याले पायलं, कि त्यानं हुशारीने उत्तर देलं, तवा त्याले म्हतलं, कि “तू देवाच्या राज्या पासून तू जवळ हायस” तवा पासून कोणाले विचारायची हिम्मत झाली नाई.
ख्रिस्त कोणाचा पोरगा हाय?
(मत्तय 22:41-46; लूका 20:41-44)
35मंग येशूनं देवळात देवाचे वचन शिकवत असतांना, त्यानं असं म्हतलं, कि ख्रिस्त दाविद राजाच्या पोरगा हाय, असे “मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकं कावून म्हणतात.” 36कावून की जवा, दाविद राजाने स्वताच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने म्हतलं, कि प्रभूने माह्या प्रभूले म्हतलं, “मी तुह्या शत्रुना तुह्यावाल्या पायाचे आसन करे पर्यंत तू माह्या उजवीकडे बसून राय.” 37अन् मंग दाविद राजाने स्वता येशूला ख्रिस्त म्हणते, तर मंग तो त्याचा पोरगा कसा काय होईन? तवा मोठी गर्दी येशूचे बोलणं मन लावून आयकतं होती.
शास्त्री पासून सावधान
(मत्तय 23:1-36; लूका 20:45-47)
38येशू देवाचे वचन शिकवत असतांना, त्यायले म्हतलं कि “मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकायपासून सावधान राहा, ते लंम्बे झगे घालून लोकायमध्ये फिरतात. 39अन् बजारात नमस्कार अन् धार्मिक सभास्थानात मुख्य जागी अन् जेवाच्या वाक्ती पण मुख्यचं जागी अन् सणातीवाराच्या दिवशी ही ते असचं करतात. 40ते विधवा बायायचे अनादर पूर्वक घर हडपून टाकतात, अन् दाखवण्यासाठी लय वेळ परेंत लंबी-लंबी प्रार्थना करतात, त्यायले नेहमी दंड भेटीन.”
विधवा बाईचे दान
(लूका 21:1-4)
41मंग येशू देवळातल्या दानपेटीच्या समोर बसून पावू रायला होता, कि लोकं देवळातल्या दानपेटीत कसे अन् कितीक पैसे टाकतात, अन् धनवान लोकायन लय दान टाकले. 42तेवढ्यात एका गरीब विधवा बाईनं येऊन दोन लहानसे चांदीचे सिक्के टाकले अन् त्याची किंमत लय कमी होती. 43तवा येशूनं त्याच्या शिष्यायले जवळ बलावून म्हतलं, कि “मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि देवळाच्या दानपेटीत टाकणाऱ्या या गरीब विधवेनं सगळ्या ऊन अधिक टाकलं. 44येशूनं असं म्हतलं की, सगळ्याईन आपल्या-आपल्या संपत्तीच्या भरपूरीतून टाकलं, पण या विधवेनं आपल्या कमाईतून जे काई तिच्याजवळ होतं, म्हणजे तिनं आपली सर्व उपजीविका टाकली.”
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.