मरकुस 15
15
पिलातुसच्या समोर येशू
(मत्तय 27:1-2,11-14; लूका 23:1-5; योहान 18:28-38)
1अन् सकाळ झाल्यावर लवकरच, मुख्ययाजक, यहुदी पुढारी लोकं अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक, व त्यांच्या संग सगळी न्यायसभेचे सदस्य ह्यायनं सल्ला करून, येशूले बांधून घेतलं अन् त्याले नेऊन पिलातुसच्या ताब्यात देलं कि त्याचा न्याय करावे या करीता. 2तवा पिलातुसन येशूले विचारलं “तू यहुदी यांचा राजा हायस काय?” त्यानं त्याले उत्तर देलं, “जसं तुमी म्हणता तसचं हाय.” 3मुख्ययाजक येशूवर लय आरोप लाऊन रायले होते. 4तवा पिलातुसन त्याले अजून विचारलं, “तू कावून उत्तर देत नाई? पायते तुह्यावर कितीक आरोप लाऊ रायले हाय?” 5तरी येशू चुपचं रायला, व काईच बोलला नाई, ह्याच्यावर पिलातुसले लय नवल वाटलं.
मरण दंडाची आज्ञा
(मत्तय 27:15-26; लूका 23:13-25; योहान 18:39-19:16)
6अन् यहुदी लोकायच्या फसह सणातीवाऱ्याच्या दिवशी लोकं पिलातुस शासकाले ज्या एखाद्या कैद्याले मांगत जात, त्याले लोकायसाठी तो जेलातून सोडत जाय. 7त्यावाक्ती बरब्बा नावाचा एक माणूस होता जो दुसऱ्या बंडखोराच्या संग जेलात होता ज्यायनं रोमी सरकारच्या विरोधात बंडात काई लोकायले मारून टाकलं होतं. तो त्यायच्या संग बंदी होता. 8अन् लोकायची मोठी गर्दी पिलातुस शासका जवळ येऊन, त्याले विनंती करून म्हतलं, तू जसं आमच्यासाठी करतो तसचं कर. 9पिलातुसन लोकायले म्हतलं, “काय मी तुमच्यासाठी यहुदी यांचा राज्याले सोडून देऊ? अशी तुमची इच्छा हाय काय?”
10कावून की मुख्ययाजक येशूचा हेवा करत होते, म्हणून त्याले त्यायनं हेव्यान धरून देलं होतं, हे त्याच्या ध्यानात आलं होतं. 11पण त्याले सोडल्या पेक्षा बरब्बाले आमच्यासाठी सोडा, असं म्हण्याले मुख्ययाजकानं लोकायले चेतवल 12तवा पिलातुसन त्यायले वापस विचारलं, “मंग तुमी ज्याले यहुदी लोकायचा राजा म्हणता त्याले मी काय करावं?” 13त्याले “वधस्तंभावर खिळून टाका,” असा लय लोकायच्या गर्दीन अजून कल्ला केला. 14पिलातुसन त्यायले म्हतलं, “कावून, याने असं कोणतं खराब केलं हाय?” तरी ते अजूनच ओरडून-ओरडून म्हणू लागले “याले वधस्तंभावर चढवा.” 15तवा लोकायले खुश कऱ्याच्या हेतूनं पिलातुस शासकान बरब्बाले त्यायच्यासाठी सोडून देलं, अन् येशूले कोडे मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायापासी देऊन देलं.
शिपायानपासून येशूचा अपमान
(मत्तय 27:27-31; योहान 19:2-3)
16मंग पिलातुस शासकाच्या शिपायायनं येशूले राज्यपालाच्या आंगणात नेलं, अन् त्यायनं सगळ्या शिपायाच्या मोठ्या सैन्यदलाले एकत्र बलावलं. 17मंग त्यायनं त्याच्या आंगावर जांभळा झगा हे दाखव्यासाठी त्याले घालून देला, जसा कि तो एक राजा हाय. अन् शिपाई त्याची मजाक उळव्याले लागले, अन् काट्याचा मुकुट करून त्याच्या डोक्शावर घातला. 18अन् ते नमस्कार करून त्याले म्हणत “यहुदी यांचा राज्या तुह्यावाला जयजयकार असो.” 19ते त्याच्या डोकश्यावर राऊ-राऊ काळीन मारत, त्याच्यावर थूकत, अन् टोंगे टेकून त्याले नमस्कार करत जात 20अशी त्याची मजाक केल्यावर, त्यायनं त्याच्या आंगावरचे जांभळे कपडे काढले, अन् त्याचे सोताचे कपडे त्याले वापस घालून देले, अन् वधस्तंभावर चढवण्यासाठी ते त्याले बायर घेऊन गेले.
येशूले वधस्तंभावर चढवलं
(मत्तय 27:32-44; लूका 23:26-43; योहान 19:17-27)
21अन् जवा ते शहराच्या बायर जाऊन रायले होते तवा शिमोन नावाचा एक माणूस, देशाच्या खेळ्यागावातून यरुशलेम शहरात येऊन रायला होता तो कुरेणी शहरात रायणारा होता, अन् तो सिकंदर अन् रुपूस यायचा बाप होता. शिपायायनं त्याले हुकुम केला, कि तो वधस्तंभ उचलून त्या जाग्यावर उचलून घेऊन जाय जती येशूले वधस्तंभावर चढवल्या जाईन. 22अन् शिपायाईन येशूले गुलगुता नावाच्या जागेवर नेलं ज्याच्या “अर्थ अरामी भाषेत” “कवटीची जागा हा हाय.” 23तवा शिपायायनं येशूले गंधरस नावाची औषध मिळवलेला अंगुराचा रस पियाले देला, ज्याच्याच्यान त्याले तरास नाई व्हायले मदत व्हावी. पण त्यानं तो पेला नाई.
24तवा त्यायनं त्याले वधस्तंभावर चढवलं, अन् त्याच्या कपड्यातून कोणता कपडा कोण घ्यायच्या ह्या साठी त्यावर चिठ्ठ्या टाकून त्या वाटून घेतल्या 25अन् त्यावाक्ती सकाळचे नऊ वाजले होते, जवा त्यायनं येशूले वधस्तंभावर चढवलं. 26अन् शिपायाईन येशूच्या डोक्श्याच्या वरते एक पाटी लावली होती, ज्याच्यावर असं लिवलेल होतं, “यहुदी लोकायचा राजा.” 27अन् त्यायनं येशूच्या संग दोन चोराले एक त्याच्या उजव्या बाजूनं अन् एक त्याच्या डाव्या बाजूनं वधस्तंभावर चढवले 28अन् याचं प्रकारे पवित्रशास्त्र खरं झालं, जे ख्रिस्ताच्या बाऱ्यात म्हणते, कि त्याले एका अपराध्यांय संग मोजल्या जाईन. 29-30अन् जवळून येणारे जाणारे डोके वरते करून त्याच्यावाली अशी निंदा करत होते, अन् हे म्हणत होते, “हे देवळाले पाडणाऱ्या अन् तिसऱ्या दिवशी बनवणाऱ्या आपल्या स्वताले वाचव, जर तू देवाचा पोरगा हायस तर वधस्तंभावरून उतरून खाली ये, अन् आपल्या स्वताले वाचव.”
31तसचं मुख्ययाजक अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक आपआपसात मजाक करून म्हणत “यानं दुसऱ्याले तारलं, पण स्वताले वाचवू शकला नाई. 32हा माणूस इस्राएल देशाचा ख्रिस्त, जो सोताले राजा म्हणतो, त्यानं आता वधस्तंभावरून खाली यावं, म्हणजे ते पावून आमी विश्वास ठेऊ” कि हा आमचा राजा हाय, अन् त्याच्या संग जे वधस्तंभावर चढवले होते, ते पण त्याची निंदा करत होते.
येशूच मरण
(मत्तय 27:45-56; लूका 23:44-49; योहान 19:28-30)
33अन् दुपार पासून, तर जवळपास बारा ते तीन वाजेपर्यंत सगळ्या देशात अंधार पडला. 34तिनं वाज्याच्या जवळपास येशूनं मोठ्यानं आरोई मारून म्हतलं, “इलोई, इलोई, लमा, शबक्तनी?” म्हणजे हे माह्या “देवा, हे माह्या देवा, तू माह्यावाला त्याग कावून केला?” 35तवा तती जवळ उभे रायनाऱ्या लोकाय पैकी कईकायनं हे आयकून म्हतलं, “पाहा, तो एलिया भविष्यवक्त्याले हाका मारू रायला हाय.”
36अन् त्या लोकायतून एक माणूस पयत गेला, व रुईचा स्पंज घेतला, अन् त्याले रसात डुबून भिजवलं, मंग त्यानं त्याले एका काळीच्या टोकावर लावलं, अन् त्याले येशूच्या तोंडाच्या पासी नेलं, ज्याच्याच्यान तो त्याच्यातून उलचाक रस पेला पायजे, त्यायनं म्हतलं, “थांबा अन् काही करू नका, आमाले पायाले पायजे, कि काय एलिया भविष्यवक्ता येईन अन् त्याले वधस्तंभावरून मुक्त करीन कि नाई.” 37तवा येशूनं मोठ्यानं आरोई मारली अन् मेला. 38तवा देवळातला जाळा पर्दा जो सर्व्या देखत देवाच्या उपस्थितीत प्रवेश कऱ्याले थांबवत होता, तो वरून खाल परेंत फाटला अन् त्याचे दोन तुकडे झाले.
39जो सुभेदार येशू जवळ उभा होता, त्यानं त्याची आरोई आयकली अन् पायलं कि तो कसा मेला, त्यानं म्हतलं, “खरचं हा माणूस देवाचा पोरगा होता.” 40काई बाह्या दुरून पाऊ रायल्या होत्या, त्याच्यातून मरिया जी मगदला गावची होती, अन् लायण्या याकोब अन् योसे अन् त्याची माय मरिया, अन् सलोमी होते. 41जवा येशू गालील प्रांतातून सेवा करत होता, तवा तीन बाया त्याचे शिष्य बनून त्याची सेवा करत असतं, अन् बऱ्याचं बाया गालील मधून त्यायच्या यरुशलेम शहरातून संग आल्या होत्या.
येशूले रोयने
(मत्तय 27:57-61; लूका 23:50-56; योहान 19:38-42)
42जवा संध्याकाय झाली, तवा तो तयारीचा दिवस म्हणजे आरामाच्या दिवसाच्या आगोदरच्या दिवशी, 43अरीमतियाह शहराचा रायणारा योसेफ आला, जो प्रतिष्ठित यहुदी न्यायसभेचा मंत्री होता, जो सोता देवाच्या राज्याची वाट पायतं होता, तो हिम्मत धरून पिलातुस शासकापासी गेला अन् येशूच पार्थिव शरीर मांगतलं . 44तवा पिलातुसन आश्चर्य केलं, कि तो एवढ्या लवकर मेला, अन् सुभेदाराले विचारलं, “काय त्याले मरून लय वेळ झाला?” 45सुभेदाराच्या पासून माईत झाल्यावर, त्यानं ते येशूच मेलेलं शव योसेफाले देऊन देलं.
46तवा त्यानं एक मलमलची चादर विकत घेतली जे खूप महाग होती, अन् शव ले खाली उतरून एका चादरीत गुंडाऊन, एका कबरेत जे खडकात खोदलेली होती, त्यात ठेवलं, अन् कबरेच्या दरवाजाले एक मोठा गोल गोटा लाऊन देला. 47अन् त्याले कुठं ठेवलं हाय, कावून कि त्याले कबरेत ठेवलं होतं ते मरिया मगदला गावची, अन् योसेची ची माय मरिया पाऊ रायली होती.
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.