तेव्हा त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, “पाहा, पृथ्वीवरील सुपीक जमिनीपासून दूर वरून आकाशातील दव पडते तेथून दूर तुझी वस्ती होईल;
तू आपल्या तलवारीने जगशील, व आपल्या भावाचे दास्य करशील. तरी असे घडून येईल की तू अनावर होशील, तेव्हा तू आपल्या मानेवरचे त्याचे जू उडवून देशील.”