1
मत्त. 5:15-16
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्त. 5:15-16
2
मत्त. 5:14
तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही.
एक्सप्लोर करा मत्त. 5:14
3
मत्त. 5:8
जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील.
एक्सप्लोर करा मत्त. 5:8
4
मत्त. 5:6
जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील.
एक्सप्लोर करा मत्त. 5:6
5
मत्त. 5:44
मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
एक्सप्लोर करा मत्त. 5:44
6
मत्त. 5:3
“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
एक्सप्लोर करा मत्त. 5:3
7
मत्त. 5:9
जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
एक्सप्लोर करा मत्त. 5:9
8
मत्त. 5:4
‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’
एक्सप्लोर करा मत्त. 5:4
9
मत्त. 5:10
न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
एक्सप्लोर करा मत्त. 5:10
10
मत्त. 5:7
जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.
एक्सप्लोर करा मत्त. 5:7
11
मत्त. 5:11-12
जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.
एक्सप्लोर करा मत्त. 5:11-12
12
मत्त. 5:5
‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’
एक्सप्लोर करा मत्त. 5:5
13
मत्त. 5:13
तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्यांच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील.
एक्सप्लोर करा मत्त. 5:13
14
मत्त. 5:48
यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.
एक्सप्लोर करा मत्त. 5:48
15
मत्त. 5:37
तर तुमचे बोलणे, होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे; याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे.
एक्सप्लोर करा मत्त. 5:37
16
मत्त. 5:38-39
‘डोळ्याबद्दल डोळा’ व ‘दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर
एक्सप्लोर करा मत्त. 5:38-39
17
मत्त. 5:29-30
तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
एक्सप्लोर करा मत्त. 5:29-30
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ