जे चांगले ते करून, तू त्यांना प्रत्येक गोष्टींत कित्ता घालून दे. तुझ्या शिकविण्यात प्रामाणिकपणा, गांभीर्य दाखव. दोष लावता येणार नाही अशा सद्भाषणाने युक्त तुझी शिकवण असावी; यासाठी की जे तुला विरोध करतील, त्यांना आपल्याविषयी वाईट बोलण्यास जागाच नसल्यामुळे लाज वाटावी.