ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफटकानमुना
भाग तीन आणि चारमध्ये, ल्यूक आपल्याला दाखवतो की देवाच्या आत्म्याची ताकद कशा पद्धतीने येशूच्या अनुयायांना पूर्णपणे बदलून धैर्याने राज्य सामायिक करावयास लावते. येशूचे शिष्य पीटर आणि जॉन यांच्या गोष्टीने ते सुरुवात करतात, ज्यांनी एका अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला आत्म्याच्या ताकदीने बरे केले आहे. ज्यांनी हा चमत्कार बघितला आहे ते आश्चर्यचकित झाले आणि जणू काही पीटरने हे स्वतःच केले आहे अशा नजरेतून पाहू लागले. पण पीटरने जनतेला आवाहन केले की या चमत्काराचे श्रेय एकट्या येशूला द्या आणि कशा पद्धतीने येशूचा मृत्यू झाला आणि तरीही जनसामान्यांच्या उद्धारासाठी तो पून्हा उदयाला आला हे सगळ्यांना सांगा.
येशूला फाशी देताना हे मंदिरातील लोकच होते हे पीटरला माहित होते, त्यामुळे त्याने या लोकांना येशूबद्दलचे स्वतःचे विचार बदलण्यासाठी आणि माफी मिळविण्यासाठी आमंत्रित करून या संधीचा फायदा घेतला. प्रतिसादामध्ये, पीटरच्या या संदेशावर हजारो लोकांनी विश्वास ठेवला आणि येशूचे अनुसरण करण्यास सुरुवात केली. पण प्रत्येकाने नाही. जेव्हा त्यांनी पहिले की, पीटर येशूच्या नावाने उपदेश आणि उपचार करीत आहे त्यावेळेस धार्मिक नेते संतापले आणि त्यांनी तिथेच पीटर आणि जॉन यांना अटक केली. धर्मगुरूंनी अशी मागणी केली की, पीटर आणि जॉन यांनी तो अपंग माणूस कसा चालायला लागला याचे स्पष्टीकरण द्यावे, आणि त्याला वाचविण्यासाठी येशू हे एकाच नाव आहे हे सांगण्याची त्या पवित्र आत्म्याने पीटरला शक्ती दिली. पीटरचे धाडसी संदेश ऐकल्याने धर्मगुरू गोंधळले आणि जॉनचा आत्मविश्वस त्यांनी बारकाईने पहिला. येशूमुळे पीटर आणि जॉन कसे बदलले आहेत हे ते पाहू शकत होते, आणि घडलेला आश्चर्याचा प्रकार ते नाकारू शकले नाहीत.
या योजनेविषयी
ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com