पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे DNA समजून घेणेनमुना
परमेश्वर देव आपला पिता आहे या महान सत्यावर आपण आज विचार करूया. याचा अर्थआपण देवाची मुलें म्हणजे देवाचे वारीस,ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. ख्रिस्त येशू आपला ज्येष्ठ बंधूतर आहेचपण त्यासह तो आपला प्रभु आणि तारणहार आहे. आणि आम्हांस लाभलेल्या सांपत्तिकवारसा - कौटुंबिक संपत्ती द्वारे आम्हांला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद लाभले आहेत.
आध्यात्मिक आशीर्वाद काय आहेत?आपले नविनीकरण न झालेली जुनी मने जुन्या सवयीप्रमाणे आपल्या जीवनाचे विभाजन करू पाहतात. जर आपल्याला वाटत असेल की आपल्या शारीरिक गरजा या अंतर्गत येत नाहीत तर ती आपली एक मोठी समस्या आहे. यामुळे आपण कधीही धैर्याने मागू शकणार नाही – ना स्वतःसाठी नाइतरांसाठी.
प्रभु येशू ख्रिस्त तुम्हांला आणि मला संपूर्ण उध्दार मिळावा म्हणून या जगात आला. काही वेगळ्या विचारसरणीचे लोकं शरीर आणि आत्मा यांना वेगळे करत असे सांगू पाहतात की शरीरातील सर्व काही वाईट आणि पापमय आहे. पण त्यांचे असे सांगणे चुकीचे आहे.
प्रभु येशू ख्रिस्त आपल्या शरीर, मन अंतकरण आणि आत्मा या सर्वांस परिपूर्ण करत आपल्याला विपुल जीवन देण्यासाठी आला.शास्त्रात उल्लेखिलेल्या स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वादांमध्ये आपले नातेसंबंध, आर्थिक बाबी, आपल्या लाभलेली आध्यात्मिक दानें, आपले व्यवसाय-नोकऱ्या, इत्यादी म्हणजे थोडक्यात सर्व गोष्टींचा समावेश होतो.
व.४ ...त्याने (देव पित्याने)आपल्याला...निवडून घेतले.
आपली तारण गाथा येशूसह सुरू होते. आमच्या मातापित्यांनी आमचा विचार करण्याआधीच देवाने आमची निवड केली होती. आपला जन्म कधी होईल आणि कोणत्या दिवशी आपण त्याचे होऊहे देवाने पूर्वीच ठरवले होते. देवाच्या अपार ममतेने आम्हांला पश्चात्तापाकडे नेले(रोम.२:४).
आणि हो, आम्ही देवाच्या हाकेला प्रतिसाद दिला. देवाकडून झालेल्या पाचारणाला प्रतिसाद देण्याची जबाबदारी सर्वस्वी आमची आहे. पूर्वनिश्चित पाचारण, नेमलेले असणे हा एक वेगळाआणि मोठा विषय आहे. त्या अनुषंगानेपवित्र शास्त्रामध्ये अनेक वचनें आहेत.
येशूने म्हटले, माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणीयेत नाही. (योहान १४:६)
तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे. (योहान १५:१६)
ज्यांना त्याने अगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणहि केले, ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानहि ठरविले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवहि केले. (रोम.८:३०)
तुम्हांलाजरी हेआतापूर्णपणे समजलेले नसले तरी परमेश्वर देवाने तुम्हांला निवडले आहे या सत्याविषयी आनंद करा.
देवाला संतोषविण्यासाठी आपण काहीही करू शकण्यापूर्वीचदयासंपन्न देवाने आपल्याला निवडले आहे. केवळ देवाच्या कृपेनेच आमचे तारण झालेले आहे(इफिस.२:९-१०). स्वबळावर आपण तारण प्राप्त करू शकत नाही आणि तारणासाठी आपण स्वकर्मांनीकधी पात्र होणार पण नाही.
आपल्यापैकी काही ख्रिस्ती असे जगतात: या दानासाठी ते देवाचे आभार तर मानतात पण मग ते त्या अनुग्रहास कसे पात्र आहेत हे सिद्ध करण्याच्या खटपटीस लागतात. त्यांच्यावर आधीच झालेली देवाची कृपा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत ते कृपाविरहीत विश्वासहीन धार्मिक कामात स्वतःला गुंतवून घेतात.
खरा मुलगा केवळ आपल्या वडिलांची मर्जी जिंकण्यासाठी काम करत नाही, तर यासाठी करतो कारण त्याच्यावर त्याच्या वडिलांचे प्रेम आहे आणि त्या मुलाचे कठोर परिश्रम हे प्रेमासाठी नव्हे तर त्याच्यावर वडिलांनीकेलेल्या प्रेमाला प्रतिसाद आहे. तुम्हांला हा फरक समजून येतोय ना?
देवाच्या कृपेचे हे दान आम्हांला लीन व नम्र करते. ही बाब मी किती कृतज्ञ असावे आणि आता माझे जीवन माझे स्वतःचे नाही या गोष्टींची मला जाणीव करून देते.
मननासाठी बिंदू:
तुम्हाला मिळालेल्या काही आध्यात्मिक आशीर्वादांची तुम्ही नावे देऊ शकता?
तुम्ही कधी स्वतःला देवाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करताना किंवा तुम्ही नसलेल्या व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे का?
देव तुमचा पिता आहे या सत्यात आनंद करा.
या योजनेविषयी
पाचारण झालेले आणि निवडलेले... ‘ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आणि ख्रिस्ताठायी निवडून घेतलेले’ (6 दिवसांचा मनन-पाठ) तुम्ही देवाची हस्तकृति आहात आणि सर्व स्वर्गीय वैभवांनी आशीर्वादित करण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे हे सत्य तुम्ही जाणता का? राजेशाही थाटात जगणे किंवा हलाखीच्या परिस्थितीत खितपत पडून राहणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमच्या जीवनासंबंधी देवाची अदभूतरम्य अशी योजना व संकल्प आहेत. इफिस.१:३-५ या शास्त्रभागावर आधारित हा सहा दिवसांचा मनन-पाठ (भक्तिसामग्री) वर्ड ऑफ ग्रेसच्या नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिली असून विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केली आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Word Of Grace Church चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.wordofgracechurch.org/