पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे DNA समजून घेणेनमुना
व.४आपण त्याच्या (देवाच्या) समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे...
परमेश्वर देवाने आमची निवड का केली?
सविस्तर भाषांतर प्रवर्धित आवृत्तीमध्ये 'पवित्र'या शब्दाचा अर्थ समजविण्यासाठी वापरलेले शब्द असे आहेत - परमेश्वरासाठीवेगळे केलेले, विशेष उद्देशाकरिता अतिशय शुध्द असे... “निर्दोष” आमची स्थिती आहे. प्रभु येशूने तुमच्या माझ्यापातकांसाठी स्वतःचे रक्त वाहून आणि स्वप्राण अर्पून खंडणी भरली जेणेकरून आपण कोणतीही लाज, अपराध-बोधन बाळगता दोषमुक्त जीवन जगू शकू.
व.५त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते.
याचा अर्थ असा की वधस्तंभावर ख्रिस्ताने मृत्यू स्वीकारण्यापूर्वी आपण देवाचे मूल नव्हतो! परमेश्वर देव सर्वांचा पिता नाही.
योहान १:१२– परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांचा म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
रोम ८:१५-१६ –तर ज्याच्या योगे आपण अब्बा, बापा, अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो.
ख्रिस्तामध्ये आपली नवीन ओळख समजून यावी यासाठी पौल आपल्यासाठी एक मोठा पाया रचतो.आम्ही कोण आहोत तरआम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. आपण त्याला पिता, अब्बा, बापा म्हणू शकतो.
२करिंथ.५:१७आपल्याला सांगते की आपण ख्रिस्ताच्या ठायी नवी उत्पत्ति आहोत.
नवीनम्हणजेजे पूर्वी कधीही नव्हते. एकप्रकारेतुम्ही एकमेव देवाचे प्रतिमा वाहक आहात. कोणीही तुमची जागाघेऊ शकत नाही. आमच्यामध्ये नवीन डी.एन.ए.(DNA) आहे, आणि तो ख्रिस्ताचा आहे. पवित्र स्वभाव वृत्ती सक्रिय !
तुम्ही आता नीतिमान असे संत आहात. तुम्ही अनाथ होता; पण आता तुम्ही देवाचे मुले झाला आहात.विश्वासात असतानाही जेव्हा तुमच्याकडूनअनावधानाने पाप घडते तेव्हासुद्धा देवाचे मूल म्हणून तुमची ओळख बदलत नाही.
आपल्या अस्तित्वामध्ये काहीतरी चमत्कारिक आश्चर्यकारक बदल घडतो. आमच्याकडे आता ख्रिस्ताचे मन अंतःकरण आहे पण त्याचा वापर करण्यात आपण असफल होतो.
आपले मन देवाच्या वचनाने स्वच्छ नवीन होते– असत्याची जागा सत्य घेते. चांगल्या विचारांनी हृदयपालट हृद्यपरिवर्तन होते, ज्यामुळे वर्तन बदलते.
जेव्हा आपण आपल्या हृदय व मनाच्या परिवर्तनाशिवाय स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या फक्त बाह्यवर्तनात बदल होतो आणि तो दीर्घकाळ टिकत नाही. म्हणूनच आपल्यापैकी काहीजण त्यांच्या जुन्या वर्तन आणि विचारांमध्ये पुन्हा गुंतले जाऊन मागे पडतात.
आपल्यापैकी काही जण स्वर्गीयपित्यासह असलेल्या आपल्याअलौकिक नात्यामध्ये हर्ष करण्याऐवजी स्वतःला धार्मिक कर्तव्याच्या बंधनातबांधूनख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, ते कृपेमध्ये जगण्याऐवजी नियमशास्त्राच्याजोखडात स्वतःला अडकवून घेतात.
उदाहरणार्थ, हे एखाद्या बालकाला ‘तुझा जन्म विजेता होण्यासाठी झाला आहे. पूर्ण तयारीनिशी सामोरे जा आणि यशस्वी हो’ या ऐवजी सतत त्याच्या कानी ‘अयशस्वी होऊ नको, अपयशी होऊ नको’ अशा शब्दांचा मारा केल्यासारखे आहे.
मननासाठी बिंदू:
देव तुमच्यावर इतकं प्रेम करतो की त्याने ठरवलं म्हणून त्याने तुमची निवड केली हे तुम्हाला माहीत आहे का?
तुम्ही स्वतःला नूतनीकरण केलेली जुनी नसून नवीन निर्मिती म्हणून पाहता का?
तुमच्या नवीन DNA चा भाग असलेल्या पाच गोष्टी लिहा
या योजनेविषयी
पाचारण झालेले आणि निवडलेले... ‘ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आणि ख्रिस्ताठायी निवडून घेतलेले’ (6 दिवसांचा मनन-पाठ) तुम्ही देवाची हस्तकृति आहात आणि सर्व स्वर्गीय वैभवांनी आशीर्वादित करण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे हे सत्य तुम्ही जाणता का? राजेशाही थाटात जगणे किंवा हलाखीच्या परिस्थितीत खितपत पडून राहणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमच्या जीवनासंबंधी देवाची अदभूतरम्य अशी योजना व संकल्प आहेत. इफिस.१:३-५ या शास्त्रभागावर आधारित हा सहा दिवसांचा मनन-पाठ (भक्तिसामग्री) वर्ड ऑफ ग्रेसच्या नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिली असून विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केली आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Word Of Grace Church चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.wordofgracechurch.org/