YouVersion लोगो
सर्च आयकॉन

पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे DNA समजून घेणेनमुना

पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे  DNA समजून घेणे

6 पैकी 5 दिवस

ख्रिस्तामध्ये माझी नवीन ओळख

मागील पाठात आपण हेशिकलो की देव माझा पिता झाल्यावरमाझ्यावर देवाची मोठी कृपा होते ज्यायोगे मी सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित होऊन माझ्या जीवनात मी नेमाने अदभूत अलौकिक गोष्टी अनुभवू लागतो.

महत्त्व

परमेश्वर देवाने माझी निवड केली म्हणून मी महत्त्वपूर्ण आहे हे आपण अहंकार किंवा आत्ममग्नतेच्या भावनेतूनम्हणत नाही. देवाच्या योजना आणि त्याचे संकल्पया भूतलावर पूर्ण होण्यासाठी मी महत्त्वपूर्ण आहे. समुद्र जसा जलांनी व्यापला आहे तशी पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानाने व्यापली जावीत्याकरिता आपली निवड झाली आहे.

तुम्ही कसे विचारू शकता? आपण जसे की वैभवाच्या एका स्तरांतून दुसर्‍या स्तरांमध्ये बदलत आहोत. गौरव - आपण देवाच्या गौरवात सहभागी व्हावे आणि त्याचे गौरव पुढे वाहून न्यावे. कल्पना करा!!!

पण देवाचे गौरव वाहू शकू असे आपण जगतो का? जर आपल्या लक्षात हे आले तर आपण देवाला न आवडणाऱ्या अशाकोणत्याही गोष्टींमध्ये गुंतणार नाही.

राजेशाही पाचारण

देवाचे पुत्र आणि कन्या म्हणून तुमची ओळख आताशाही परिवार – राजेशाही कुटुंबामध्ये समाविष्ट आहे. तुम्ही आता राजपुत्र आणि राजकन्या आहात.

जेव्हा देवाचीमुले स्वतःचीओळख पूर्णपणे जाणून देवाच्या अभिषेक आणि सामर्थ्यामध्ये कार्य करू लागतात तेव्हा सैतान थरथर कापू लागतो. तुमची ख्रिस्तासारखी असलेली विचारसरणी लुटण्यासाठी, तुम्हांपासून हिरावण्यासाठीसैतान अगदी कसोशीने प्रयत्न करतो कारण त्याला माहीत आहे की तुमचे विचार तुमच्या कृती, तुम्ही कसे वागावे हे ठरवतात. आणि आपले वर्तन हे आपल्या विश्वासावर आधारित आहे.

तुमच्या जीवनातील देवाच्या योजना आणि संकल्प पूर्ण करण्यापासून सैतान तुम्हांला सर्व प्रकारे रोखू इच्छितो. ज्या गोष्टीं सार्वकालिक नाहीत किंवा ज्या तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजना-संकल्पाप्रमाणे नाहीत अशा गोष्टींमध्ये तुम्ही पुढे गेला तरत्याची त्याला हरकत नसते.

प्रभु येशू ख्रिस्त आपल्याला या बंधनातील, जखडलेल्या विचारांपासून आणि स्वतःविषयी असलेल्या चुकीच्या ओळखीपासून मुक्त करू इच्छितो.

१ पेत्र २:९ तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, ‘देवाचे स्वत:चे लोक’ असे आहा

एक आदर्श राजा आणि शाही परिवार त्यांच्या प्रजेच्या हितासाठी जगतात. आपल्या प्रभु येशूराजाने तुमच्या व माझ्यासाठीस्वतःचे जीवन बलिदान केले जेणेकरून आपल्याला अमर्याद कृपा लाभू शकेल.

आपण ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपण अशा शाही परिवाराचे सदस्य आहोत ज्यांना एकचित्ताने ख्रिस्ताच्या वृत्तीने ख्रिस्तासम जगण्याची गरज आहे.

इतरांसाठी आपण आशीर्वाद व्हावे म्हणून आपण आशीर्वादित झालो आहोत. इतरांनाही देवाच्या आशीर्वादांचालाभ करून देता यावा म्हणून देवाने आम्हांस पात्र ठरवून त्याची विपुल कृपा आम्हांवर केली आहे. अंधकाराच्या साम्राज्याचा पूर्ण नायनाट करून स्वर्गाचे राज्य प्रस्थापित करण्याच्या महान कामगिरीसाठी देवाने आमची निवड व नेमणूक केलेली आहे.

मननासाठी बिंदू:

देवामध्ये माझी ओळख आणि हाक किती महत्त्वाची आहे हे मला जाणवते का?

या सत्याच्या भल्यासाठी मी वेगळा विचार आणि कृती कशी करू?

दिवस 4दिवस 6

या योजनेविषयी

पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे  DNA समजून घेणे

पाचारण झालेले आणि निवडलेले... ‘ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आणि ख्रिस्ताठायी निवडून घेतलेले’ (6 दिवसांचा मनन-पाठ) तुम्ही देवाची हस्तकृति आहात आणि सर्व स्वर्गीय वैभवांनी आशीर्वादित करण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे हे सत्य तुम्ही जाणता का? राजेशाही थाटात जगणे किंवा हलाखीच्या परिस्थितीत खितपत पडून राहणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमच्या जीवनासंबंधी देवाची अदभूतरम्य अशी योजना व संकल्प आहेत. इफिस.१:३-५ या शास्त्रभागावर आधारित हा सहा दिवसांचा मनन-पाठ (भक्तिसामग्री) वर्ड ऑफ ग्रेसच्या नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिली असून विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केली आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Word Of Grace Church चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.wordofgracechurch.org/