YouVersion लोगो
सर्च आयकॉन

पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे DNA समजून घेणेनमुना

पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे  DNA समजून घेणे

6 पैकी 4 दिवस

आज माझी इच्छा आहे की, आपण देवाचेमुल असल्याच्या सत्याकडे, या बहुमानाकडे विशेष लक्ष द्यावे.

तथापि, सत्य जाणून घेण्यासाठी, आपल्याला प्रथम सत्याचा अभ्यास करून ते पूर्णतः समजून घ्यावे लागेल जेणेकरून सत्य आणि असत्य यामधील फरक तुम्ही ओळखू शकाल.

पोलिस खऱ्या नोटांचा इतका बारकाईने अभ्यास करतात की, जेव्हा ते चलनातील नोटा हाताळतात तेव्हा त्यांना खोट्या बनावट नोटा लगेच ओळखता येतात.

तर, आज आपण आपल्याबद्दलची अशी काही सत्ये पाहूया जी आपल्या डी.एन.ए.चा म्हणजे आपल्या जनुकीय संरचनेचाच एक भाग आहेत.

आपण या सत्यावर गहन चिंतन आणि मननकरणे अत्याव्यश्यक आहे कारण हे सत्य तुम्हाला अशा प्रकारची परिपूर्ण व्यक्ती बनण्यासाठी मोकळीकता आणि मुभा देईल ज्याकरिता परमेश्वराने तुम्हांला पाचारण केले आहे– सर्व प्रकारची हीन भावना,लज्जा, अपराध बोध, न्यूनगंड, मत्सर, वासना,जीवनातील व्यर्थ स्पर्धा, खटपटी आणि धडपडीपासून मुक्त, आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाचा अभाव, आपण देवाच्या अपार प्रीतीस पूर्णतःपात्रनाही अशा सर्व विचारांपासून मुक्तता.

या प्रकारचे सर्व विचार असत्य आहेत. आपण अशा विचारांना खरे मानून एकप्रकारे आम्हीच त्यांना सशक्त केले आहे.

ख्रिस्तामधील आपली नवीन ओळख आणि संरचना (डी.एन.ए.) आपल्याला काय प्रदान करते त्याविषयीआज आपण तीनगोष्टींचा अभ्यास करू.

परमेश्वर देव हा माझा पिता होतो.तुम्हांस हे ठाऊक आहे का आणि तुमचा त्यावर विश्वास आहे का कि देव एक सर्वोत्तम पिता आहे?

आपण कोण आहोत हे जाणण्याचा प्रारंभ-बिंदू (सुरुवात) म्हणजे आपण कोणाचे आहोत हे समजून घेणे. त्यासाठी आपल्याला देवाविषयी योग्य समज हवी. देवाला खरोखर आपल्यासाठी उत्तम हवे आहे.

आपण अलौकिक अदभूत गोष्टींना सरावतो. आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की आपण विजयाच्या स्थानी आहोत म्हणूनच परमेश्वरासह आपल्याला काही अशक्य नाही; देव अशक्य गोष्टी शक्य करतो.आपण विश्वासाची झेप घेऊ शकतो. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशात नसावा.परमेश्वरासह आपण आपल्या मागण्या आणि कल्पनेपलीकडे अधिक्याने कार्य करावयास समर्थ आहोत.

मी देवावर विश्वास ठेवू शकतो कारण तो चांगला आणि सर्वोत्तम आहे. देवाला सर्व काही शक्य आहे – तो असंभव गोष्टी संभव करणारा देव आहे आणि त्याची सर्व अभिवचने "होय आणिअसेच होवो, आमेन" अशी आहेत!

ख्रिस्तामधील माझी नवीन ओळख मला सर्व आध्यात्मिक आशीर्वादांकरिता पात्र करते.

हे सर्व माझ्या खात्यात आहे परंतु अद्याप माझ्या हातात नाही.मला हा धनादेश वटवायचा आहे.जेणेकरून,देवाच्या कृपेमुळे लाभलेल्या माझ्या पात्रतेचा उपयोगमीइतरांना आशीर्वादित करण्यासाठी आणि या भूतलावर माझ्यासाठी असलेल्या देवाच्या योजनेस पूर्ण करण्यासाठी करू शकेन.

माझी पात्रता कितपत आहे हे परमेश्वराकडून आलेल्या प्रकटीकरणाने समजते. हे प्रकटीकरण आपल्या धार्मिक कर्मांनी नव्हे तर केवळदेवाच्या उपस्थितीतून, त्याच्या समक्षतेत आपल्या जगण्यातून आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या दृढ आणि प्रीतीपूर्ण नात्यातूनयेते.

मननासाठी बिंदू:
तुम्हाला बदलण्याची गरज असलेले काही जुने नमुने तुम्ही ओळखू शकता?

उदाहरणार्थ, लोक-आनंददायक, स्पर्धात्मकता, तुलना. विचार आणि वर्तनाचे हे नमुने पूर्ववत करण्यासाठी तुम्ही स्वतःला कोणत्या शास्त्रवचनांची आठवण करून देऊ शकता?

अलौकिक गोष्टी माझ्या जीवनाचा सामान्य अनुभव बनण्याच्या शक्यता म्हणून मी समस्यांकडे कसे पाहू शकतो?

दिवस 3दिवस 5

या योजनेविषयी

पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे  DNA समजून घेणे

पाचारण झालेले आणि निवडलेले... ‘ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आणि ख्रिस्ताठायी निवडून घेतलेले’ (6 दिवसांचा मनन-पाठ) तुम्ही देवाची हस्तकृति आहात आणि सर्व स्वर्गीय वैभवांनी आशीर्वादित करण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे हे सत्य तुम्ही जाणता का? राजेशाही थाटात जगणे किंवा हलाखीच्या परिस्थितीत खितपत पडून राहणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमच्या जीवनासंबंधी देवाची अदभूतरम्य अशी योजना व संकल्प आहेत. इफिस.१:३-५ या शास्त्रभागावर आधारित हा सहा दिवसांचा मनन-पाठ (भक्तिसामग्री) वर्ड ऑफ ग्रेसच्या नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिली असून विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केली आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Word Of Grace Church चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.wordofgracechurch.org/