YouVersion लोगो
सर्च आयकॉन

पुनर्स्थापनेची निवड करणेनमुना

पुनर्स्थापनेची निवड करणे

5 पैकी 1 दिवस

पुनर्स्थापन सहसा व्यत्ययाच्या मागोमाग येते.

बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर दाविदाने स्तोत्र 51 लिहिले. त्याच्या कृत्याचे गंभीर परिणाम होणार होते. यातील एक परिणाम म्हणजे त्या पापापासून गरोदर राहिलेल्या त्याच्या तान्ह्या मुलाचा मृत्यू. हे स्तोत्र देवापुढे पश्चात्ताप करण्याच्या त्याच्या प्रार्थनेचे वर्णन करते आणि त्याला त्याच्या मार्गात हरवलेल्या तारणाचा आनंद परत मिळवण्यास सांगते. तो देवाला पुरेसा ओळखत होता आणि जरी त्याने त्याच्याशी नाते गमावले नसले तरी त्याने आनंद गमावला होता,जो त्या नातेसंबंधाचा सतत परिणाम होता.

देव विश्वासू होता आणि त्याने त्याला क्षमा केली आणि त्यांचे नाते पुन्हा स्थापित केले. याचा पुरावा शलमोनच्या जन्मात होता ज्याला यदिद्याह म्हटले गेले कारण“त्यावर देवाचे प्रेम होते”.

आमचा देव पुनर्स्थापनाच्या कार्यात व्यस्त आहे. ही अशी गोष्ट नाही जी आपण तयार करू शकतो किंवा निर्माण करू शकतो परंतु ती अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण सक्रियपणे भाग घेतो आणि त्यासाठी जागा तयार करतो. तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही मूर्खपणाने घेतलेल्या वळणामुळे तुमचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. कदाचित तुमचा कोणताही दोष नसताना तुम्ही स्वतःला विनाशात पडलेले पाहता. गोष्टी फार पूर्वी घडल्या असतील पण तरीही त्या वर्तमानकाळात तुम्हाला वेदना आणि इजा देतात.

2000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर असताना भेटलेल्या लोकांची येशू जितकी काळजी करीत असे तेवढीच काळजी त्याला तुमचीही आहे. त्याने लोकांना केवळ शारीरिक आजारांपासूनच नव्हे तर मानसिक आजारांपासून आणि आत्मिक मृत्यूपासून देखील बरे केले. त्याने संपूर्ण व्यक्तीची काळजी घेतली,फक्त त्यांच्या जीवनातील दृश्यमान भागांची नाही. त्याने त्यांच्या अंतःकरणाकडे पाहण्याचा आग्रह केला कारण त्यातूनच जीवनाचे मुद्दे वाहतात. त्याने त्यांना संपूर्ण मनाने,संपूर्ण जिवाने,संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीनेे त्याच्यावर प्रेम करण्यास सांगितले. त्याहून अधिक हितकर दुसरे काही होऊ शकत नाही.

याचा विचार करा :

तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी देवावर विश्वास ठेवाल का?

त्यासाठी प्रार्थना करा :

तुम्ही त्याला तुम्हास दररोज थोडे थोडे पुनर्स्थापित करायला सांगाल का?

दिवस 2

या योजनेविषयी

पुनर्स्थापनेची निवड करणे

देवाचा आत्मा आपल्या दैनंदिन नूतनीकरणात आणि परिवर्तनामध्ये सक्रियपणे सहभागी असतो जेणेकरून आपण येशूसारखे अधिकाधिक प्रकट व्हावे. पुनर्स्थापन हा या नूतनीकरणाच्या कार्याचा एक भाग आहे आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. त्यावाचून, आपण जुन्या पद्धती, वृत्ती, सवयी आणि वर्तनांपासून मुक्त होऊ शकणार नाही. ही बायबल योजना तुम्हाला पुनर्स्थापनाच्या आजीवन प्रवासाची पहिली पावले उचलण्यास मदत करेल.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/christinegershom/