YouVersion लोगो
सर्च आयकॉन

पुनर्स्थापनेची निवड करणेनमुना

पुनर्स्थापनेची निवड करणे

5 पैकी 2 दिवस

वैयक्तिक पुनर्स्थापन - बदल घडवून आणणारा

हे सर्व आपल्यापासून सुरू होते. होय तुमच्यापासून!

हे वाचा आणि तुमच्या जोडीदाराचा किंवा त्या कठोर सहकार्याचा किंवा वाईट शेजाऱ्याचा विचार करू नका. तुम्ही स्तोत्र 23 वाचता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते व्यक्तीसाठी लिहिलेले आहे,समाजासाठी नाही. आपण देव कोण आहे म्हणून निवडतो,आपण त्याला कुठे शोधतो आणि त्याच्यासोबत आपण काय करतो हे आपल्यापैकी प्रत्येकासाठी एक घोषणा आहे. या स्तोत्राच्या 3 व्या वचनात दावीद उल्लेख करतो की देव त्याचा आत्मा पुनर्स्थापित करतो (ईएसव्ही). ही एक सतत चालणारी प्रक्रिया सूचित करते आणि एकदाचे झाले असे नाही.

ती आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे.

इब्री भाषेत आत्मा हा शब्द नेफेश आहे जो आपल्या भावना,आपली इच्छा,आपल्या जाणीवा आणि आपले विचार यांचे आसन आहे. हेच आपल्या आयुष्याच्या इतर प्रत्येक भागाला चालना देते. आपल्या जीवनाच्या या भागाची पुनर्स्थापना केल्याने दुरूस्ती होईल कारण हे आपल्यातील सर्वात खोल भागांची पुननिर्मिती आहे. हे सोपे नाही,खरे तर,हे अनेकदा कठीण वाटेल.

कठीण कारण बर्याच काळापासून,आम्ही आमच्या जीवनातील त्या भागांसाठी सबब सांगितली आहे. आपण म्हणतो“मी फक्त एक संतप्त माणूस आहे”किंवा“माझे कुटुंब माझी ही बाजू पुढे मांडते”किंवा“तुम्हाला कल्पना नाही की मला आयुष्यात कोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागले होते ज्यामुळे मी असा बनलो आहे”.असे बहाणे सुरूच असतात! पुनर्स्थापना करण्यासाठी जरूरी आहे की तुम्ही त्या कमी-चांगल्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा अंगीकार करा आणि ती देवपुढे मांडा.

हे कठीण आहे कारण देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी तुमच्याकडून वचनबद्धतेची गरज आहे. तो पवित्र असल्यामुळे आणि पाप त्याच्या उपस्थितीत टिकू शकत नाही कारण जसजसे आपण त्याच्याजवळ जाऊ आणि जोवर आपण पश्चात्ताप करून आपले पाप सोडत नाही तोपर्यंत आमचे पाप आपल्यापुढे आणखी ठळकपणे दिसून येईल.

हे देखील कठीण आहे कारण ते गुप्त ठिकाणी,शांततेत आणि अंधारात घडेल - त्यात तुम्ही आणि देवाशिवाय कोणीही सहभागी नसणार. तो तुमची विचारसरणी,तुमची अंतरतम रचना,तुमच्या भावना इत्यादींचा आकार बदलतो.

हे सर्वात कठीण आहे कारण नेहमीच इतर लोक त्याचे कौतुक करणार नाहीत (अगदी तुमच्या जवळचे लोक देखील). ते तुमचे जुने व्यक्तिमत्त्व नव्हे तर ख्रिस्तामधील नवीन उत्पत्ती पसंत करतील.

तुम्ही कुठून आला आहात हे देवाला माहीत आहे - तुम्हाला कोणत्या प्रभावाने आकार दिला,तुम्हाला जख्मा दिल्या आणि बदलले हे त्याला माहीत आहे. तो तुम्हाला त्याच्या मूळ रचनेत पुनर्स्थापित करू इच्छितो- ज्याला जगाच्या पतीतावस्थेने स्पर्श केला नव्हता. पवित्र आत्मा हेच करतो,जोपर्यंत आपण येशूसारखे होत नाही तोपर्यंत तो आपल्याला पुनर्स्थापित करतो!

विचार करा:

तुमच्या भूतकाळातील एका घटनेची आठवण करून देण्यासाठी देवाला सांगा ज्यात तुम्हाला पुनर्स्थापनेची गरज आहे.

त्यासाठी प्रार्थना करा:

तुम्हाला त्या घटनेमुळे झालेल्या दुःखापासून बरे करण्यासाठी त्याला विनंती करा. त्याला तुमचे हृदयाचे आणि मनाचे नूतनीकरण करण्यास सांगा जेणेकरून तुम्ही स्वस्थपणे पुढे जाऊ शकाल.

पवित्र शास्त्र

दिवस 1दिवस 3

या योजनेविषयी

पुनर्स्थापनेची निवड करणे

देवाचा आत्मा आपल्या दैनंदिन नूतनीकरणात आणि परिवर्तनामध्ये सक्रियपणे सहभागी असतो जेणेकरून आपण येशूसारखे अधिकाधिक प्रकट व्हावे. पुनर्स्थापन हा या नूतनीकरणाच्या कार्याचा एक भाग आहे आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. त्यावाचून, आपण जुन्या पद्धती, वृत्ती, सवयी आणि वर्तनांपासून मुक्त होऊ शकणार नाही. ही बायबल योजना तुम्हाला पुनर्स्थापनाच्या आजीवन प्रवासाची पहिली पावले उचलण्यास मदत करेल.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/christinegershom/