YouVersion लोगो
सर्च आयकॉन

पुनर्स्थापनेची निवड करणेनमुना

पुनर्स्थापनेची निवड करणे

5 पैकी 4 दिवस

पुनर्स्थापना करण्यासाठी पुनर्स्थापित

तुम्हास इतरांना पुनर्स्थापित करता यावे म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला पुनर्स्थापित करेल!

स्तोत्र 51 वचन 13 दाविदाच्या इच्छेबद्दल बोलते. देवाकडून त्याने स्वतः जी मदत प्राप्त केली त्यास मदतीने इतरांची मदत करण्याची त्याची इच्छा होती.

आपले पुनर्स्थापन कधीही आपल्यासाठी नसते. एका विशिष्ट क्षणी,देव तुम्हाला इतरांना पुनर्स्थापित करण्यात मदत करण्यास प्रवृत्त करेल. यशया संदेष्टा याविषयी सुंदरतेनेे लिहितो,व इस्राएली लोकांना प्रोत्साहन देतो की ते बंदिवासात असले तरी देव त्यांना वाचवेल आणि पुनर्स्थापित करेल. तरीही हेे तिथेच थांबणार नाही,कारण तो त्यांचा उपयोग शहरे पुन्हा बांधण्यासाठी आणि राष्ट्राच्या पुनर्निर्मितीसाठी करेल.

आपली वैयक्तिक पुनर्स्थापना ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असताना,पण त्याचवेळी इतरांना त्यांची पुनर्स्थापना शोधण्यात मदत करणे ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी आपण तयार असले पाहिजे. जेव्हा आपण लोकांना आपल्या जीवनात प्रवेश देतो तेव्हा देवाला ते आवडते जेणेकरून त्यांना त्यास आणि तो देत असलेले आरोग्यदान शोधता यावे. त्याला फक्त त्याच्या पुनर्स्थापनेचे सामर्थ्य बाहेर प्रवाहित करण्यासाठी इच्छुक आणि उपलब्ध व्यक्तीची गरज आहे.

तुम्ही विद्यार्थी,काम करणारे व्यावसायिक किंवा गृहिणी असू शकता - काही हरकत नाही. जेव्हा तुम्ही गरजूंना दयाळूपणा आणि औदार्य दाखवता तेव्हा तुम्ही तुटलेल्या भिंतींची दुरुस्ती करणारे आणि घरांसह रस्त्यांचा पुनर्निर्माण करणारे बनता. तुम्ही ज्या लोकांना मदत करता ते कायमचे बदलतील आणि इतकेच नाही तर त्याचा पिढ्यांवर परिणाम होईल.

जेव्हा आपण वैयक्तिकरित्या देवाने आपल्याला दिलेल्या पाचारणानुसार जगतो आणि जेव्हा आपण आपल्या विशिष्ट परिस्थितीत महान आज्ञेचे पालन करतो तेव्हा आपल्याला असे आढळून येते की आपण ज्यांस मागात भेटतो ओलांडतो त्यांच्यासाठी आपण चिरस्थायी पुनर्स्थापन घडवून आणतो.

विचार करा:

तुम्ही तुमची गोष्ट कोणाला सांगू शकता आणि ऐकण्यासाठी किंवा मदतीसाठी हात पुढे करू शकता?

देवाच्या चांगुलपणाचा नुसता संग्रह करणारे भंडार बनण्यापेक्षा तुम्ही पुनर्स्थापनेचे माध्यम कसे होऊ शकता?

एक देतो तसेच घेतो तर दुसरा फक्त साठवतो.

त्यासाठी प्रार्थना करा:

आपल्या सभोवतालच्या गरजांसाठी डोळे उघडण्यास आणि इतरांसाठी आशीर्वाद होण्यास मदत करण्यासाठी देवाला विनंती करा.

दिवस 3दिवस 5

या योजनेविषयी

पुनर्स्थापनेची निवड करणे

देवाचा आत्मा आपल्या दैनंदिन नूतनीकरणात आणि परिवर्तनामध्ये सक्रियपणे सहभागी असतो जेणेकरून आपण येशूसारखे अधिकाधिक प्रकट व्हावे. पुनर्स्थापन हा या नूतनीकरणाच्या कार्याचा एक भाग आहे आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. त्यावाचून, आपण जुन्या पद्धती, वृत्ती, सवयी आणि वर्तनांपासून मुक्त होऊ शकणार नाही. ही बायबल योजना तुम्हाला पुनर्स्थापनाच्या आजीवन प्रवासाची पहिली पावले उचलण्यास मदत करेल.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/christinegershom/