पुनर्स्थापनेची निवड करणेनमुना
पुनर्स्थापन हे देवाचे कार्य आहे - तरीही आपण त्यात सक्रियपणे भाग घेतला पाहिजे
अनेकदा आपण असे समजतो की आपण आपल्या स्वतःच्या जीवनात पुनर्स्थापनेचे कार्य सुरू केले पाहिजे आणि ते पार पाडले पाहिजे. स्वतःची निगा राखण्यासाठी आणि आरोग्यप्राप्तीसाठी सर्व प्रकारचे उपचार आणि पद्धती आहेत जे जग देऊ करते आणि जे दुर्दैवाने दीर्घकाळ टिकत नाही. देवच आहे जो पुनर्स्थापना करतो आणि जेव्हा तो करतो तेव्हा आपले जीवन अगणित मार्गांनी चांगल्यासाठी बदलते. तरीही देवाने आपल्याला पुनर्स्थापित करावे म्हणून आपण आपली भूमिका विश्वासूपणे बजावली पाहिजे ज्यासाठी आपल्याला पुढील तीन गोष्टी करण्याची गरज भासेल:
1. येशू आपला मेंढपाळ आहे हे कबूल करा
ज्याप्रमाणे मेंढपाळाला माहीत असते की त्याच्या मेंढरांसाठी कोणते गवत सर्वात चांगले आहे,त्याचप्रमाणे येशू मोठ्या काळजीने आणि करुणेने आपले मार्गदर्शन करतो. मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्याच्या विश्वासू काठीच्या आणि दांडाच्या मदतीने वन्य प्राण्यांपासून वाचवतो. जेव्हा सैतान आणि त्याचे सैन्य आपल्यावर हल्ला करते तेव्हा येशू हा आपला भयंकर संरक्षक असतो. आमच्या वैयक्तिक गरजांनुसार आम्हाला खऱ्या अर्थाने कोणीही भरवू शकत नाही,आम्हाला प्रत्येक प्रदेशात मार्गदर्शन करू शकत नाही आणि संकटापासून वाचवू शकत नाही. येशू खरोखरच उत्तम मेंढपाळ आहे.
2. पित्याच्या प्रेमात विसावा मिळवा
स्तोत्र 23 वचन 2 चे पॅशन भाषांतर म्हणते“तो मला त्याच्या वैभवी प्रेमात विश्रांतीची जागा देतो..”
आपल्यासाठी देवाच्या प्रेमात विसावा घेणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे कारण जीवन कधीकधी आपल्या शिडामधून वारा काढून घेते किंवा आपल्याला जमिनीवर आपटते. तुमच्यावर असलेल्या चांगल्या देवाच्या प्रेमाची सतत आठवण न मिळाल्यास,तुम्ही उदासीनतेच्या किंवा निराशेच्या गर्तेत डुबून जाल.
3. पवित्र आत्म्याच्या सतत अभिषेकाचा अनुभव घ्या.
वचन 5 चे पॅशन भाषांतर म्हणते“माझ्या शत्रूंनी लढण्याचे धाडस केले तरीही तू माझी स्वादिष्ट मेजवानी बनतोस. तू मला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सुगंधाने अभिषेक कर. माझा प्याला भरून येईपर्यंत मी जे काही पिऊ शकतो ते तू मला दे.”
पवित्र आत्म्याने भरल्याशिवाय आम्ही वैयक्तिक पुनर्स्थापनेचा अनुभव घेऊ शकणार नाही. तुम्हाला बरे होण्याची गरज आहे हे तुम्हाला माहीत व्हावे त्यापेक्षाही सखोल मार्गांनी बरे होण्यास तो तुम्हाला मदत करेल. तुम्ही जिथे जाल तिथे तो तुम्हाला ख्रिस्ताचा सुगंध बाहेर टाकण्यास प्रवृत्त करेल आणि तुम्ही यापुढे पराभवाचा,ध्येयशून्यतेचा,अव्हेराचा किंवा कटुत्वाचा गंध वाहून नेणार नाही!
विचार करा:
तुमचा बचाव,मार्गदर्शन आणि उदरनिर्वाह यासाठी तुम्ही कोणाकडे पाहिले आहे?ते तुमच्या सर्व गरजा पूर्ण करू शकले आहेत का?
त्यासाठी प्रार्थना करा:
येशूला तुमचा उत्तम मेंढपाळ होण्यास सांगा,पित्याच्या तुमच्यावर असलेल्या प्रेमात विसावा घ्या आणि पवित्र आत्म्याला तुमचा अभिषेक करण्यासाठी आमंत्रित करा.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
देवाचा आत्मा आपल्या दैनंदिन नूतनीकरणात आणि परिवर्तनामध्ये सक्रियपणे सहभागी असतो जेणेकरून आपण येशूसारखे अधिकाधिक प्रकट व्हावे. पुनर्स्थापन हा या नूतनीकरणाच्या कार्याचा एक भाग आहे आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. त्यावाचून, आपण जुन्या पद्धती, वृत्ती, सवयी आणि वर्तनांपासून मुक्त होऊ शकणार नाही. ही बायबल योजना तुम्हाला पुनर्स्थापनाच्या आजीवन प्रवासाची पहिली पावले उचलण्यास मदत करेल.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/christinegershom/