1
1 योहान 2:15-16
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतो, तर त्याच्यामध्ये पित्याची प्रीती नाही. जगात जे सर्व आहे, ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व श्रीमंतीचा अहंकार ह्या गोष्टी पित्याकडून नाहीत, तर जगाच्या आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 योहान 2:15-16
2
1 योहान 2:17
जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत. मात्र देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा सर्व काळ जगतो.
एक्सप्लोर करा 1 योहान 2:17
3
1 योहान 2:6
“मी त्याच्याशी एकनिष्ठ राहतो”, असे म्हणणाऱ्याने येशू ख्रिस्त जसा चालला, तसे स्वतःही चालले पाहिजे.
एक्सप्लोर करा 1 योहान 2:6
4
1 योहान 2:1
अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिमान असा येशू ख्रिस्त पित्याजवळ आपला कैवारी आहे
एक्सप्लोर करा 1 योहान 2:1
5
1 योहान 2:4
“मी त्याला ओळखतो”, असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्यामध्ये सत्य नाही.
एक्सप्लोर करा 1 योहान 2:4
6
1 योहान 2:3
आपण देवाच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपल्याला खातरीने कळून येते की, आपण त्याला ओळखतो.
एक्सप्लोर करा 1 योहान 2:3
7
1 योहान 2:9
“मी प्रकाशात आहे”, असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे.
एक्सप्लोर करा 1 योहान 2:9
8
1 योहान 2:22
येशू हा ख्रिस्त आहे, हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे.
एक्सप्लोर करा 1 योहान 2:22
9
1 योहान 2:23
जो कोणी पुत्राला नाकारतो, त्याला पिता लाभला नाही, जो पुत्राला स्वीकारतो त्याला पितादेखील लाभला आहे.
एक्सप्लोर करा 1 योहान 2:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ